आर्थिक वर्ष २०२३ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मागील सलग तीन वर्षे निव्वळ खरेदीदार राहिल्यानंतर अमेरिकन डॉलरची आता निव्वळ विक्रेता बनली आहे. स्पॉट फॉरेन एक्स्चेंज मार्केटमध्ये आरबीआयने निव्वळ आधारावर २५.५२ अब्ज डॉलरची विक्री केली आहे. रशिया-युक्रेन संघर्ष आणि यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्यामुळे प्रचंड दबावाखाली आलेल्या रुपयातील अस्थिरतेला आळा घालण्यासाठी आरबीआयने डॉलरची विक्री सुरू केल्याची चर्चा आहे.

आरबीआय अमेरिकन डॉलरची निव्वळ विक्रेता का बनली?

आरबीआयकडून परकीय चलनाच्या होल्डिंग्सचा ऐतिहासिक सरासरी खरेदी खर्च ६२-६५ रुपये प्रति डॉलरच्या घरात ठरवण्यात आला. याचदरम्यान अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा सरासरी मासिक विनिमय दर २०२२-२३ मध्ये ७६ ते ८२ च्या दरम्यान राहिला. अशाच पद्धतीने वर्षभरात डॉलरची विक्री केल्याने आरबीआयला मोठा लाभ झाला होता.

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
butter theft in russia amid ukrain war
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात बटरची चोरी; नेमकं प्रकरण काय?
How to check daily Petrol And Diesel rates
Petrol Diesel Rates In Maharashtra : पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधनाचा दर
rupee falls for fourth consecutive session
रुपयाचे ८-१० टक्क्यांपर्यंत अवमूल्यनाचा अंदाज; सलग चौथ्या सत्रात घसरण; रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपाने मोठे नुकसान टळले

गेल्या वर्षी युक्रेन युद्धामुळे आणि इतर चलनांच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्यामुळे तेलाच्या किमती वाढल्या होत्या. डॉलर मजबूत झाल्याने रुपयाचे मूल्य घसरत होते. त्याच काळात आरबीआयने डॉलरची विक्री केली, ” असे बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस म्हणाले. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने चलनवाढ रोखण्यासाठी व्याजदर वाढवल्यानंतर विदेशी गुंतवणूकदारांनी देशांतर्गत बाजारातून पैसा काढून घेतल्याने रुपयाही घसरला. NSDL डेटानुसार, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी इक्विटी मार्केटमधून ३७,६३२ कोटी रुपये आणि डेट मार्केटमधून ८,९३७ कोटी रुपये काढले.

सीआर फॉरेक्स ॲडव्हायझर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि संस्थापक अमित पाबारी यांच्या मते, जर आरबीआयने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये डॉलरची विक्री केली नसती तर अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन ८४-८५ च्या पातळीवर राहिले असते.

RBI ने विकलेल्या डॉलरचे मूल्य काय होते?

ढोबळ आधारावर आरबीआयने स्पॉट मार्केटमध्ये २१२.५७ अब्ज डॉलर विकले आणि त्याच वेळी त्यांनी १८७.०५४ अब्ज डॉलरची खरेदीही केली. त्यामुळे निव्वळ आधारावर आरबीआयने स्पॉट मार्केटमध्ये २५.५१६ अब्ज डॉलर विकले. जुलै २०२२ मध्ये RBI ने स्पॉट मार्केटमध्ये १९.०५ बिलियन डॉलरची विक्री केली, जी मागील आर्थिक वर्षातील सर्वात जास्त होती. मार्च २०२३ मध्ये केंद्रीय बँकेने ६.९१ अब्ज डॉलरची खरेदी केली आणि ६.१६ अब्ज डॉलरची स्पॉट मार्केटमध्ये विक्री केली, त्यात ७५० दशलक्ष डॉलरसाठी निव्वळ खरेदीदार होते.

हेही वाचाः अदाणी समूहातील एलआयसीच्या शेअर्समध्ये वाढ; मूल्य ४४,६७० कोटींवर पोहोचले

डॉलरच्या विक्रीतून RBI ला किती उत्पन्न मिळाले?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०२३ मध्ये डॉलरची विक्री करून मोठा नफा कमावला, कारण ते कमी किमतीत विकत घेतले गेले आणि उच्च पातळीवर विकले गेले. RBI ने मोठा नफा कमावल्यामुळे आर्थिक वर्ष २०२३ मध्ये केंद्र सरकारला दिलेला लाभांशदेखील जास्त होता. गेल्या आठवड्यात RBI सेंट्रल बोर्डाने २०२२-२३ लेखा वर्षासाठी केंद्र सरकारला ८७,४१६ कोटी रुपये सरप्लस म्हणजेच लाभांश हस्तांतरित करण्यास मान्यता दिली. गेल्या वर्षीच्या (२०२१-२२) ३०,३०७ कोटी रुपयांच्या सरप्लस ट्रान्सफरच्या तुलनेत ही १८८ टक्के वाढ आहे, जी दहा वर्षांतील सर्वात कमी होती. खरे तर आरबीआयने डॉलर अशा वेळी विकत घेतले जेव्हा ते रुपया ६०-७० च्या श्रेणीत होते आणि RBI ने डॉलरची ८० रुपयांच्या आसपास विक्री केली होती. त्यामुळे त्यांनी डॉलर विकून आर्थिक वर्ष २०२३मध्ये मोठा नफा कमावला आणि त्यामुळे जास्त लाभांश मिळाला,” असेही बँक ऑफ बडोदाच्या सबनवीस यांनी सांगितले.

हेही वाचाः गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्यामुळे सेन्सेक्समध्ये २०० अंशांची घसरण

आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ट्रेण्ड काय होता?

आरबीआय ही आर्थिक वर्ष २०२२ मध्ये डॉलरची निव्वळ खरेदीदार होती. स्पॉट मार्केटमधून निव्वळ आधारावर १७.३१२ अब्ज डॉलर खरेदी केले गेले. खरे तर केंद्रीय बँक आर्थिक वर्ष २०२१ मध्ये (६८.३१५ अब्ज डॉलर) आणि आर्थिक वर्ष २०२० मध्ये (४५.०९७ अब्ज डॉलर) निव्वळ खरेदीदार होती. आर्थिक वर्ष २०१९ मध्ये RBI ने स्पॉट मार्केटमध्ये $१५.३७७ बिलियन डॉलरची निव्वळ विक्री केली.

आरबीआयने फॉरवर्ड मार्केटमध्येही डॉलरला विकले का?

नाही. फॉरवर्ड मार्केटमध्ये मार्च २०२३ अखेर RBI ची थकबाकी नेट फॉरवर्ड खरेदी २३.६ अब्ज डॉलर होती.