Stock Market Today : तेलगू देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएबरोबर राहणार असल्याचे सांगितल्यानंतर शेअर बाजारात तेजी आल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. माध्यम प्रतिनिधींनी चंद्राबाबू नायडूंना पुढील राजकीय धोरणाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “मी या देशात अनेक राजकीय बदल पाहिले आहेत. आम्ही एनडीएसोबत आहोत. मी एनडीएच्या बैठकीला जात आहे. यादरम्यानच्या काळात जर काही असेल तर आम्ही तुम्हाला कळवू.” लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजपा २४० जागांवर मर्यादीत राहिल्यामुळे त्यांना आणखी ३२ जागांची गरज आहे. अशा परिस्थितीत चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएबरोबर राहणार असल्याचे सांगताच शेअर बाजाराने सकारात्मक प्रतिक्रिया दिली.

काल निकालाच्या दिवशी शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. एक्झिट पोलच्या विरुद्ध असे निकाल हाती येत असताना शेअर बाजाराचा निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांक खाली पडलेला दिसला. सेन्सेक्सने तब्बल ६,००० अंशांहून अधिक घसरण अनुभवली. तर निफ्टी दिवसअखेर प्रत्येकी जवळपास ६ टक्क्यांच्या घसरणीसह स्थिरावले.

ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
What Ashok Chavan Said About Congress?
Ashok Chavan : “रेवंथ रेड्डींकडे भोकर विधानसभेची जबाबदारी दिली होती, प्रचंड पैसा…”; श्रीजया यांच्या विजयानंतर काय म्हणाले अशोक चव्हाण?
rbi monetary policy rbi keeps repo rates unchanged reserve bank predicts rising inflation
व्याज दरकपात नाहीच!‘जीडीपी’वाढीच्या अपेक्षांना कात्री; महागाईचा ताप चढण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज
devendra fadnavis vidhan sabha election bjp
BJP Victory in Vidhan Sabha: महाराष्ट्रातील निकालांमुळे भाजपासाठी काय बदललं? स्पष्ट बहुमत, युतीवर वर्चस्व की आणखी काही?
cm devendra fadnavis mns chief raj thackeray
Raj Thackeray: राज ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत म्हणाले, “लोकसभेत त्यांनी…”
political journey Devendra Fadnavis, Mayor, Chief Minister
फडणवीसांचा थक्क करणारा राजकीय प्रवास, महापौर ते मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल; पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार

आज चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएबरोबर राहण्याचा विश्वास व्यक्त केल्यानंतर निफ्टीमध्ये दोन टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. निफ्टीचा निर्देशांक २२,४४५ पर्यंत पोहोचलेला दिसला. तर सेन्सेक्सनेही दोन टक्क्यांहून अधिकची उसळी घेतली. सेन्सेक्समध्ये आज १८०० अंकाची उसळी पाहायला मिळाली. त्यामुळे निर्देशांक पुन्हा एकदा ७४ हजारांवर पोहोचला. तसेच बँक निफ्टी निर्देशांकही काही मिनिटांतच वर गेल्याचे दिसले.

“…म्हणून आम्ही भाजपाला नाकारले”, अयोध्यावासियांची नाराजी ते दलित उमेदवाराची बाजी, अयोध्येत नक्की काय घडले?

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडीया यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितले की, निफ्टीच्या निर्देशांकात तात्काळ तेजी दिसत असली तरी हाच कल कायम राहिल का? हे आताच ठामपणे सांगता येत नाही. कदाचित बाजार थोडा वर गेल्यानंतर त्यात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळू शकते.

भाजपा बहुमतापासून किती दूर?

लोकसभा निवडणुकीत भाजपाला केवळ २४० जागा मिळवता आल्या आहेत. बहुमतासाठी आणखी ३२ जागांची आवश्यकता आहे. भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या टीडीपीचे आंध्र प्रदेशमध्ये १६ खासदार निवडून आले आहेत. तर नितीश कुमार यांच्या जेडीयूचे बिहारमध्ये १२ खासदार निवडून आले आहेत. भाजपाचा आणखी एक मित्रपक्ष लोक जनशक्ती पार्टीचे ५ खासदार निवडून आले आहेत. तर महाराष्ट्रात शिंदे गटाचे ७ खासदार आहेत. या चारही पक्षांची भाजपाला साथ राहिली तर एनडीएचा आकडा २८० पर्यंत सहज पोहोचतो, जेणेकरून त्यांना सत्ता स्थापन करता येऊ शकते.

Story img Loader