जागतिक बँकेने भारताच्या वाढीचा अंदाज पुन्हा एकदा कमी केला आहे. मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारताचा जीडीपी ६.३ टक्क्यांवर खाली येण्याचा अंदाज आहे, जो सध्या ६.६ टक्क्यांपर्यंत आहे. जागतिक बँकेने आपल्या इंडिया डेव्हलपमेंट अपडेटमध्ये सांगितले की, आर्थिक स्थितीची मंद वाढ आणि आव्हानात्मक बाहेरील परिस्थितीमुळे भारतातील विकासाला बाधा येण्याची शक्यता आहे.
भारताचा विकासदर कमीच राहणार
जागतिक बँकेने अहवालात म्हटले आहे की, कर्ज घेण्याच्या वाढत्या खर्चामुळे आणि संथ उत्पन्न वाढीमुळे लोकांच्या खासगी आयुष्यावर दबाव वाढेल. कोरोना महामारीशी लढताना संबंधित सरकारची वित्तीय स्थिती डळमळीत झाली असल्यानं आर्थिक परिस्थिती फारशी उत्साहवर्धक नाही, असंही अहवालात म्हटले आहे.
हेही वाचाः राजीव सिंघल आता टाटा इंटरनॅशनलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर
चालू खात्यातील तूट कमी होणार
आर्थिक वर्ष २४ मध्ये चालू खात्यातील तूट २.१ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा अंदाज आहे, असे अहवालात म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षात महागाई दर ६.६ टक्क्यांवरून ५.२ टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते, असंही अहवालात म्हटलं आहे.
हेही वाचाः बँकांमध्ये जमा असलेले ३५ हजार कोटी तुमचे तर नाहीत ना, रक्कम परत कशी मिळवाल?
सेवा क्षेत्राची वाढती भूमिका महत्त्वाची
विश्लेषक आणि अर्थतज्ज्ञांच्या मते, भारताच्या सेवा निर्यातीत वाढ झाली, जी ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत विक्रमी उच्चांकावर पोहोचली. यामुळे अर्थव्यवस्थेला बाहेरून असलेला धोका टळण्याची अपेक्षा वाढली आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, सेवा निर्यात यापुढे केवळ आयटी सेवांद्वारे चालविली जात आहे, परंतु सल्लागार आणि संशोधन आणि विकास यांसारख्या गोष्टींद्वारे भारताची सेवा निर्यात ऑक्टोबर-डिसेंबर २०२२ मध्ये २४.५% ने वाढून या तिमाहीत विक्रमी ८३.४ अब्ज डॉलर झाली.