राजकीय, सामाजिक आणि आर्थिक नेतृत्वाची बिजे महाविद्यालयीन जीवनातच पेरली जातात. हे बीज सकस पद्धतीने रोवल्यास त्याचे एका मोठय़ा वृक्षात रुपांतर होऊन पुढे देशाला विविध क्षेत्रात भक्कम नेतृत्व मिळू शकते. मुंबईत विविध महाविद्यालयांचे महोत्सव येऊ घातले आहेत. त्याच्या तयारीला विद्यार्थी लागले आहेत. त्यांच्या या तन–मन–धन ओतून काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या धडपडीविषयी..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
डिसेंबर, जानेवारी महिना उजाडल्यावर मुंबईच्या महाविद्यालयीन वर्तुळावर महोत्सवांचा रंग चढलेला दिसतो. आजपासूनच डिसेंबर महिना उजाडल्यामुळे महाविद्यालयांमध्ये फेस्टिव्हलच्या तयारीची नांदी झालेली पाहायला मिळत आहे. साधारण डिसेंबरच्या मध्यापासून मुंबईतल्या प्रमुख महाविद्यालयांचे ‘फेस्टिव्हल’ सुरू होणार असून त्याचा तयारीसाठी विद्यार्थी झटत आहेत. मुंबईतल्या महाविद्यालयीन महोत्सवांचे गेल्या काही वर्षांतील बदललेले स्वरूप पाहता त्याला फारच चकचकीतपणा आला आहे. स्वत:च्या महाविद्यालयाचा महोत्सव इतर सगळ्या महाविद्यालयांच्या महोत्सवांहून कसा वेगळा दिसेल आणि यशस्वी होईल, यासाठी विद्यार्थी जिवाचे रान करतात. महोत्सव म्हटल्यावर त्याचा श्रीगणेशा संकल्पना निवडीपासून होतो. त्यानंतर सर्जनशीलता व्यावसायिक आणि बाजारपेठेचे ज्ञान असणारे मेंदूही कामाला लागतात. वेगवेगळ्या गटांत विद्यार्थी स्वत:ला विभागून कामाला लागतात. महाविद्यालयाने दिलेल्या पैशावर फेस्टिव्हलच्या रंगमंचही उभारणे कठीण असल्याने बाहेरच्या मार्गाने विद्यार्थ्यांना पैसा उभारावा लागतो. त्यासाठी आर्थिक बाजू सांभाळणाऱ्या गटातील विद्यार्थी प्रायोजकांचे उंबरठे झिजवतात. त्यात मालिकांना असणाऱ्या मुख्य आणि सहप्रयोजक असा प्रकार महाविद्यालयीन महोत्सवातही आल्याने त्यासाठीही प्रायोजकांबरोबर रस्सीखेच करताना विद्यार्थी दिसतात. शिवाय यंदा पाचशे हजार नोटांच्या चलनबंदीचा फटका महाविद्यालयांच्या प्रायोजकांकडून मिळणाऱ्या रकमेला बसला आहे. महोत्सव गाजविण्यासाठी विद्यार्थी प्रसिद्ध कलाकारांचीही मदत घेताना दिसतात. त्यामुळे अनेक नव्या-जुन्या कलाकारांची रेलचेल अशा महाविद्यालयीन महोत्सवांमधून दिसून येते. प्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीत त्या संदर्भात माहिती माध्यमांसमोर जाहीर करणे, परीक्षक म्हणून बोलावणे, कलाकारांच्या तोंडून कार्यक्रमाला भेट द्या, असा संदेश तयार करणे, असे नानाविध प्रयोग विद्यार्थी करतात.
जनसंपर्क गटाद्वारे समाजमाध्यमांचाही यात आलाच. तो उत्तम प्रकारे करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रत्येकाने प्राधान्यक्रम दिलेला असतो. समाजमाध्यमावर स्वत:चे स्वतंत्र ‘पेज’ वा खाते उघडून त्याद्वारे लोकांशी संपर्क वाढवला जातो. याशिवाय जनसंपर्क संस्थांच्या मदतीने जाहिराती करून महोत्सव मोठा करण्यात विद्यार्थी व्यग्र असतात. या सर्वामधून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चांगले काय घडत असेल तर ते म्हणजे संघभावना. काम करण्याची गुणवत्ता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते तसेच कार्यक्रम व्यवस्थापनाचा अनुभवही गाठीशी बांधला जातो. याशिवाय प्रतिनिधित्व करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये तयार होते. येत्या काही काळात मुंबईतल्या प्रसिद्ध महाविद्यालयांमध्ये रंगणाऱ्या महोत्सवांवर नजर टाकता येईल.
पुस्तकोत्सव
पाल्र्यातील साठय़े महाविद्यालयाचा ‘बीएमएम’ विभाग दरवर्षी माध्यम महोत्सवांतर्गत वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित तीनदिवसीय महोत्सव साजरा करतो. गेली सहा वर्षे सातत्याने माध्यम महोत्सव साजरा होत असून यंदाही साठय़ेचा बीएमएम विभाग ‘पुस्तकोत्सव’ संकल्पना घेऊन सज्ज झाला आहे. १५, १६ आणि १७ डिसेंबर असे तीन दिवस महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘पुस्तकोत्सव’ साजरा केला जाणार आहे. तरुणांमध्ये पुस्तक आणि वाचनाविषयी असलेली उदासीनता लक्षात घेऊन या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. त्याद्वारे वाचनसंस्कृती टिकविण्यासाठी आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी अनेक स्पर्धा तथा चर्चासत्र आणि व्याख्याने होणार आहेत. गेल्या वर्षी विभागाच्या ‘माध्यमगड’ महोत्सवाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता, यंदा विद्यार्थ्यांनी कंबर कसली आहे. महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या हस्ते होणार आहे. साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ या महोत्सवात पाहायला मिळतील. याशिवाय महोत्सव तरुणांपर्यंत प्रभावीरीत्या पोहोचावा यासाठी कलाकारांच्या आयुष्यातील वाचनाचे महत्त्व या विषयावर प्रसिद्ध कलाकारांचे अनुभव चित्रित करून ते प्रसिद्ध केले जाणार आहेत.
तारांगण
‘दि ग्रँड कार्निवल’ या संकल्पनेवर आधारित ठाकूर महाविद्यालयांचा तारांगण महोत्सव आपल्या भेटीला येणार आहे. तारांगणचे यंदा नववे वर्ष आहे. १५, १६ आणि १७ डिसेंबर रोजी तारांगण साजरा होणारा आहे. या तीनदिवसीय महोत्सवात फॅशन, फिटनेस, फॅन्टसी यांवर आधारित स्पर्धा होणार आहेत. तारांगण आणखीन एका कारणासाठी ओळखला जातो तो म्हणजे तिथे हजेरी लावणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीतीतील कलाकारांनी. यंदाही अक्षयकुमार, अर्जुन रामपाल, रेमो डिसुजा, भारती सिंग, वरुण धवन, नर्गिस फक्री यांसारख्या बडय़ा चेहऱ्यांची उपस्थिती तारांगणला लाभणार आहे.
ब्रुहाहा..
सिडनीहॅम महाविद्यालयाचा ‘ब्रुहाहा’ महोत्सव यंदा ९ ते १६ डिसेंबरदरम्यान साजरा केला जाणारा जाणारा आहे. ‘दि मॅजिशियन हॅट’ या संकल्पनेवर आधारित महोत्सवाची मांडणी विद्यार्थ्यांनी केली आहे. महोत्सवाचे यंदाचे हे ३१ वे वर्ष असून ‘जादू’ ही संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून साहित्य, सादरीकरण, फाइन आर्ट, व्यवस्थापन यात स्पर्धाची बांधणी केली आहे.
आमोद
सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे मराठी मंडळ मुंबईतील महाविद्यालयांमधील सर्वात जुने मंडळ म्हणून ओळखले जाते. मंडळाला ९३ वर्षांची मराठी संस्कृती जोपासण्याची परंपरा लाभली आहे. या मंडळाच्या वतीने दर महिन्याला उपक्रम राबवले जातात. यात अंतरंग, गोष्ट तुमची-आमची, क्लिक उत्सव ही छायाचित्र स्पर्धा, ‘तेजोमय’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन अशा उपक्रमांचा समावेश यात असतो. मराठी अस्मितेचा उत्सव म्हणून ‘आमोद’ हा आंतरमहाविद्यालयीन महोत्सव मंडळाकडून साजरा केला जातो. या महोत्सवात मराठी साहित्य, नृत्य, संगीत आणि ललित कला स्पर्धाचा समावेश आहे. यंदा १९, २० आणि २१ जानेवारी २०१७ रोजी ‘आमोद’ महोत्सव साजरा होणार आहे. लोकनृत्य स्पर्धा, कार्टून फॅक्टरी, काव्य नाटुकली, चार ओळींची गोष्टचे आयोजन करण्यात आले आहे.
आरोहण– उत्सव (वॉक्स पॉप्युली)
रुईया महाविद्यालयाचा आरोहण उत्सव हा आंतरमहाविद्यालयीन महोत्सव नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाकडून आरोहण उत्सव साजरा केला जातो. साहित्य, सादरीकरण, फाइन आर्ट या प्रकारात वेगळ्या स्वरूपांतील स्पर्धा घेतल्या जातात. यंदा २०, २१ आणि २२ डिसेंबर रोजी ‘आरोहण उत्सव’ची धमाल असेल. ‘टर्न दि क्लॉक बॅक’ या संकल्पनेवर आधारित स्पर्धाची मांडणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
आरोहण उत्सवातील साहित्य गटाचा ‘वॉक्स पॉप्युली’ हा कार्यक्रम विशेष आहे. ‘वॉक्स पॉप्युली’ या लॅटिन वाक्प्रचारचा अर्थ जनमानसाचा आवाज वा त्यांची मते असा होतो. साधारण साहित्य गटातील स्पर्धाचा विचार केला असता सर्जनशील लेखन, प्रश्नमंजूषा, वादविवाद अशा पद्धतीने स्पर्धाची मांडणी असते; मात्र यंदा प्रथमच या स्पर्धाबरोबरच साहित्य आणि कला क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर व्यक्तींची भाषणे, मुलाखती, चर्चासत्र होणार आहे. ‘वॉक्स पॉप्युली’च्या संघाने २० डिसेंबर रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल.