महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला एकांकिकांच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे हे तिसरे वर्ष. राज्यातील नाटय़वेडय़ा तरुणाईचे भावविश्व मोहरून टाकण्याची भूमिका या स्पर्धेने दोन वर्षे नेटाने बजावली. सवंग हिंदी सिनेमे आणि तद्दन बॉलीवूडपटांचे गारूड तरुणाईवर असणाऱ्या या दिवसांत ‘लोकसत्ता लोकांकिका’ला याच तरुणांकडून मिळणारा प्रतिसाद हा लक्षणीय आहे. गेल्या तीन वर्षांत ‘लोकांकिकां’मधील ताऱ्यांनी व्यावसायिक रंगभूमीसह आशयघन मराठी चित्रपटांत दर्जेदार अभिनय तर केलाच आहे, पण राज्यभरातील एकांकिका स्पर्धाचे आव्हानही लीलया पेलले आहे. ‘लोकांकिकां’मधून पुढे आलेली ही मंडळी या चांगल्या कामांमुळे नाटय़क्षेत्रातल्या पुढील दमदार वाटचालीसाठी सज्ज झाली असून ‘लोकांकिकां’नी घडवले हीच प्रतिक्रिया सध्या व्यक्त करताहेत..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा