यूपीएससीची तयारी : श्रीकांत जाधव

प्रस्तुत लेखात सामान्य अध्ययन- पेपर तीनमधील नमूद घटकांची थोडक्यात माहिती घेणार आहोत. यामध्ये तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन या घटकांचा अभ्यास करावा लागतो.

sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
review of ramachandra guha s speaking with nature book
दखल : मानवी भविष्यासाठी…
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
artificial intelligence to develop ability to create substances with specific qualities
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतून हव्या त्या गुणधर्मांचा पदार्थ
Where a giant animal like a dinosaur was destroyed, what happened to microscopic organisms! Man should take the initiative to protect biodiversity know more about
जैवविविधतेच्या संरक्षणासाठी माणसानेच पुढाकार घ्यावा
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
  • आर्थिक विकास घटक

भारतीय अर्थव्यवस्था संबंधित मुद्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये अर्थव्यवस्थेशी निगडित आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास, नैसर्गिक साधनसंपत्ती व या संपत्तीच्या वापराचे नियोजन, सर्वसमावेशक वाढ साध्य करण्यासाठी सरकारमार्फत राबविले जाणारे महत्त्वाचे उपक्रम, देशातील बजेट प्रक्रिया (इ४ॠिी३ं१८ स्र्१ूी२२), कृषी आणि कृषी संबंधित संलग्न असणारी क्षेत्रे तसेच कृषी क्षेत्राची उत्पादकता आणि स्थूल देशांतर्गत उत्पादनातील वाटा वाढविण्यासाठी सरकारमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना आणि या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या, त्या सोडविण्यासाठी सरकारने आखलेली ध्येयधोरणे, औद्योगिक क्षेत्र, सेवाक्षेत्र यांसारख्या आर्थिक विकासाला आणि आर्थिक वृद्धीला अधिक गती देणाऱ्या क्षेत्रासाठी सरकारमार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम, योजना, करण्यात आलेले कायदे, भारतामध्ये परकीय गुंतवणूक वाढविण्यासाठी आखण्यात आलेली रणनीती याचबरोबर भारताचे परकीय व्यापार धोरण व निर्यात वाढीसाठी आखलेल्या विविध उपाययोजना, दळणवळण क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सरकारमार्फत केले जाणारे विशेष प्रयत्न, १९९१ मध्ये भारताने अवलंबिलेले आर्थिक उदारीकरणाचे धोरण, त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, जागतिकीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम. या मुद्यांचा समावेश होतो.

  • तंत्रज्ञान घटक

भारत सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये विकास घडवून आणण्यासाठी कोणत्या प्रकारच्या धोरणाची आखणी केलेली आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास व व्यवहार, उपयोगितता, तसेच याचा सर्वसामान्याच्या जीवनावर होणारा परिणाम, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि दिलेले योगदान तसेच माहिती तंत्रज्ञान, संगणक, अवकाश संशोधन, नॅनो तंत्रज्ञान, जैव-तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा अधिकार संबंधित मुद्दे इत्यादी बाबींचा यामध्ये समावेश आहे आणि या संबंधित दररोज काहीना काही महत्त्वाच्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे हा घटक अभ्यासताना उपरोक्त नमूद केलेल्या प्रत्येक बाबीची मूलभूत अर्थात संकल्पनासह योग्य समाज असावी लागते. थोडक्यात, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा घटक अभ्यासताना विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये लावले जाणारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नवनवीन शोध आणि या शोधामुळे होणारे फायदे आणि तोटे, संबंधित बौद्धिक संपदा अधिकार तसेच याचे होणारे परिणाम इत्यादी महत्त्वपूर्ण पैलूंवर भर देण्यात येतो.

  • जैवविविधता व पर्यावरण घटक

पर्यावरण संवर्धन, पर्यावरण आणि जैवविविधतेचा होणारा ऱ्हास आणि या ऱ्हासासाठी जबाबदार असणारे घटक, जैवविविधतेला निर्माण झालेला धोका, पर्यावरणीय प्रदूषण, नदी प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व यामुळे उत्पन्न झालेल्या समस्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर  जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना, भारत सरकारमार्फत जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षित करण्यासाठी पारित करण्यात आलेले विविध कायदे व त्यांची उपयुक्तता याचबरोबर पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन इत्यादी मुद्दे यामध्ये अभ्यासावे लागतात.

  • आपत्ती व्यवस्थापन घटक

आपत्तीचे प्रकार (ज्यामध्ये नैसर्गिक आणि मानवनिर्मित प्रकारांचा अंतर्भाव होतो), आपत्तीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, तसेच आपत्ती निवारणासाठी सरकारमार्फत आखण्यात आलेली आपत्ती व्यवस्थापन योजना व कायदे इत्यादी मुद्दे अभ्यासावे लागणार आहेत.

  • सुरक्षा घटक

भारताच्या बा आणि अंतर्गत सुरक्षासंबंधी मुद्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. डाव्या विचारसरणीचा दहशतवाद अर्थात नक्षलवाद, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी, दहशतवाद, वाढता प्रादेशिकवाद, पूर्वेकडील राज्यामध्ये होणारी घुसखोरी व वांशिक चळवळी, जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद, आंतरराष्ट्रीय सीमासंबंधी असणारे वादविवाद, संघटित गुन्हेगारी, अवैध पैसा हस्तांतरण, सीमेवर अवैधरित्या होणारी नशिल्या पदार्थाची तस्करी आणि याचे असणारे संघटित स्वरूप, सततचे होणारे भाषिक वाद, राज्य-राज्य अंतर्गत असणारे वाद, धार्मिक दंगे, सायबर सुरक्षा संबंधित मूलभूत माहिती, माध्यमे आणि सोशल नेट्वर्किंग साइटस याचा  होणारा वापर, ज्याद्वारे देशातील सामाजिक सलोख्याला निर्माण होणारा धोका, सुरक्षेला निर्माण होणारे आव्हाने इत्यादी बाबी आणि याच्या जोडीला या आव्हानांना सामोरे जाताना भारत सरकारने आखलेली रणनीती, ज्यामध्ये सीमा सुरक्षा आणि व्यवस्थापन अधिक सक्षमरीत्या राबविणे, सीमेलगतच्या भागाचा विकास घडवून आणणे, याच बरोबर सागरी सुरक्षा अबाधित राखणे इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा समावेश होतो. देशाची बा आणि अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी सरकारमार्फत स्थापन करण्यात आलेल्या विविध सरकारी संस्था आणि संघटना व त्यांना नेमून दिलेले कार्य याचबरोबर सरकारमार्फत वेळोवेळी केल्या जाणाऱ्या उपाययोजना व कायदे इत्यादी अभ्यासावे लागणार आहे.

यापुढील लेखामध्ये या पेपरमध्ये नमूद केलेल्या आर्थिक विकास या घटकाची तयारी करण्यासाठी लागणाऱ्या उपयुक्त संदर्भ ग्रंथांचा तसेच गतवर्षीय मुख्य परीक्षेत या घटकावर कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते याची चर्चा करणार आहोत.