आ जच्या इंटरनेट युगात प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आपल्याला शिक्षकांकडे किंवा त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तीकडे जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही. कारण आता एक तर आपण ती माहिती इंटरनेटवर पाहू शकतो किंवा शिक्षकांशी वा त्या व्यक्तीशी थेट घरबसल्या व्हिडीओ चॅट करून ती समजून घेऊ शकतो. यातूनच ई-लìनग ही संकल्पना उदयास आली असून सध्या अनेक छोटे-मोठे अभ्यासक्रम या माध्यमातून करता येणे शक्य बनले आहे. पुढील काही लेखांमधून आपण अशा काही वेबसाइट्सची माहिती घेणार आहोत.nptel.ac.in
ई-लìनगच्या वेबसाइट्सपकी एक चांगली वेबसाइट म्हणजे nptel.ac.in ही होय. ही वेबसाइट केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे, तर विज्ञान आणि तंत्रज्ञानात विशेष रुची असणाऱ्या जिज्ञासू व्यक्तींनीही पाहावी अशी आहे. ती देशातील वेगवेगळ्या आयआयटी संस्थांकडून चालवली जाते आणि त्यात कार्यरत व्यक्तींची प्रेझेन्टेशन्स आणि व्हिडीओज या वेबसाइटवर पाहायला मिळतात, शिवाय पाठ असलेले वेगवेगळे अभ्यासक्रम हे या वेबसाइटचे खास वैशिष्टय़ आहे. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ खात्याने ही वेबसाइट स्थापन केलेली आहे. यात प्रामुख्याने अभियांत्रिकी, विज्ञान आणि मानव्यशास्त्र या शाखांचे लहान अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ऑनलाइन माध्यमांचा वापर करून लहान अभ्यासक्रमांच्या माध्यमातून देशात अभियांत्रिकी शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यास प्रयत्न करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे.
या वेबसाइटवर तुम्ही गेलात तर तुम्हाला उजव्या दिशेला न्यू कोस्रेसमध्ये नव्याने अपलोड केलेले व्हिडीओज किंवा प्रेझेन्टेशन्सच्या पीडीएफ दिसतील. हे तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तिथेच पाहू शकता. हा लेख लिहीत असताना त्यावर फंक्शनल प्रोग्रॅिमगचा एक व्हिडीओ अपलोड केलेला होता, याशिवाय विमानाबद्दलची माहिती असलेली सचित्र पीडीएफ फाइल होती, याशिवाय कवितावाचनावर एक पेपर होता. असे आणखी शोधत गेल्यास अनेक विषयांवरचे व्हिडीओ आणि पीडीएफ तिथे डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट होते. वेबसाइटच्या खाली तळाकडे गेल्यास त्यात असलेले विषय आणि अभ्यासक्रमांची यादी दिसते. त्यात एरोस्पेस इंजिनीअिरग, कॉम्प्युटर सायन्स, टेक्स्टाइल, मेटॅलर्जी यांसारखे अनेक विषय समाविष्ट केलेले आहेत. या विषयातला एखादा अभ्यासक्रम तुम्हाला करायचा असल्यास त्याचे वाजवी शुल्क भरून तुम्ही ते करू शकता. तुम्हाला त्याचे प्रमाणपत्रही मिळते.www.nielit.gov.in
ही आणखी एक सरकारी वेबसाइट आहे. NIELIT म्हणजेच National Institute of Eletronics and Information technology. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी खात्याचे पाठबळ या वेबसाइटला लाभले आहे.
शिकण्याची प्रक्रिया अधिक मुक्त व्हावी या हेतूने या वेबसाइटची निर्मिती करण्यात आली आहे.
या वेबसाइटमधली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यात मराठीसोबतच बंगाली, आसामी, तमीळ, कानडी, मल्याळम अशा
२५ भारतीय भाषा शिकण्यासाठी
ई-लìनगचे मटेरिअल मोफत देण्यात आलेले आहे. त्या त्या भाषेच्या िलकवर जाऊन तुम्ही ते मटेरिअल डाउनलोड करून घेऊ शकता. याशिवाय यावरच्या ऑनलाइन सव्र्हिसेस या टॅबवरती तुम्हाला काही महत्त्वाच्या िलक्सही दिसतील. तसेच या संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची माहिती आणि ते कोठे घेतले जातात याचीही माहिती मिळेल. या िलक्समध्ये या संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती किंवा प्लेसमेंटसाठी वेबसाइट इत्यादी महत्त्वपूर्ण िलक्स दिल्या आहेत. त्याचा लाभ तुम्हाला घेता येऊ शकतो.