|| दत्तात्रय आंबुलकर
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, औरंगाबाद येथे खाली नमूद केलेल्या विविध अभ्यासक्रमांसाठी खालीलप्रमाणे प्रवेश उपलब्ध आहेत.
आणखी वाचा
- डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्शन अॅण्ड मेंटेनन्स – उपलब्ध जागांची संख्या ६०.
- आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदारांनी १० वीची शालान्त परीक्षा उत्तीर्ण करून ते औद्योगिक शिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत अथवा त्यांनी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड सिस्टिम्स इंजिनीअरिंगमधील पदवी अभ्यासक्रम- उपलब्ध जागांची संख्या ६०
आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदारांनी इलेक्ट्रॉनिक्स वा संबंधित विषयातील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
- एमटेक इन इलेक्ट्रॉनिक्स डिझाइन टेक्नॉलॉजीचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम- उपलब्ध जागांची संख्या- नियमित अभ्यासक्रमासाठी २५ तर अंशकालीन अभ्यासक्रमासाठी २४.
- आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदारांनी इलेक्ट्रॉनिक्समधील बीई/बी.टेक पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी ‘गेट’ प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
- अर्जासह भरावयाचे शुल्क- अर्जदारांनी अर्जासह भरावयाचे प्रवेश शुल्क म्हणून ५०० रु. भरणे आवश्यक आहे.
- अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९ ते १५ जून २०१८ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, औरंगाबादची जाहिरात पहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://nielit.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर प्रवेश अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०१८ आहे.