एमपीएससी मंत्र : रोहिणी शहा

मुख्य परीक्षा पेपर एकमधील भूगोल घटकाच्या तयारीबाबत या आणि पुढील लेखांमध्ये चर्चा करण्यात येत आहे. यातील प्राकृतिक व पर्यावरणीय घटकाबाबत या लेखामध्ये पाहू.

Education Institute Quality, Education Institute ,
अशा वातावरणात कशी वाढणार शिक्षणाची गुणवत्ता?
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
indian tectonic plate
तिबेट खालील भारतीय टेक्टोनिक प्लेट दुभंगणार? भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली चिंता; याचा काय परिणाम होणार?
Wildlife scientists and animal researchers claim about the golden fox thane news
मानवी वस्तीत येणारे सोनेरी कोल्हे निवासीच! वन्यजीव शास्त्रज्ञ, प्राणी अभ्यासकांचा दावा
Global Warming, Chandrapur , International Conference on Climate Change-2025,
‘ग्लोबल वॉर्मिंग’विरोधात शंखनाद, चंद्रपुरात पर्यावरण बदलावर…
Forest Minister Ganesh Naik announced to develop tiger and leopard habitat
वन्य प्राणी अनुभव, वाघ बिबट्या सफारी, वन्यजीव पर्यटन महाराष्ट्र, प्राणी वस्ती संरक्षण, वाघ – बिबट्यांचे अधिवास क्षेत्र विकसित करणार
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?

भूरूपशास्त्र

या घटकामध्ये समाविष्ट असलेले मुद्दे हे भूरूप निर्मितीशी संबंधित घटक म्हणून अभ्यासणे आयोगाला अपेक्षित आहे. त्यामुळे या घटकांची ‘भूरूप निर्मितीमधील भूमिका’ तयारी करताना जास्त महत्त्व देऊन अभ्यासावी लागणार आहेच. पण त्यांचा मूलभूत अभ्यासही तेवढाच महत्त्वाचा आहे. या घटकांचा व्यवस्थित संकल्पनात्मक अभ्यास झाल्याशिवाय त्यांची ‘भूरूप निर्मितीमधील भूमिका’ समजून घेता येणार नाही हे लक्षात घ्यायला हवे.

पृथ्वीचे अंतरंग – रचना आणि घटना –

अंतर्गत व बहिर्गत शक्ती, खडक व खनिजे हे मुद्दे भूमीस्वरूपांच्या उत्क्रांतीवर परिणाम करणारे घटक म्हणून अभ्यासायचे आहेत. पृथ्वीचे अंतरंग अभ्यासताना तिच्या अंतर्भागाची रासायनिक व भौतिक रचना, त्यांची वैशिष्ट्ये, वितरण आणि त्यामुळे तयार होणाऱ्या अंतर्गत शक्ती असे मुद्दे यामध्ये पाहायला हवेत. खडक, खनिजे यांचा परिणामही व्यवस्थितपणे समजून घ्यायला हवा.

याव्यतिरिक्त भूमीस्वरूपांच्या विकासावर ज्या घटकांचा परिणाम होतो, ज्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. यामध्ये मूळ स्रोताचा उठाव/ उंची, खडकांची भौगोलिक रचना, हवामान, ऊर्जा, जैविक क्रिया आणि मानवी क्रिया यांचा समावेश होतो. या घटकांचा भूरूप निर्मितीवरील परिणाम समजून घ्यायला हवा.

भूरूपचक्रांची संकल्पना हा मुद्दा बहिर्गत शक्तींचे कार्य या घटकांतर्गत येईल. यामध्ये नदी, हिमनदी, वारा व सागरी लाटांशी संबंधित भूमीस्वरूपे अभ्यासायची आहेत. या कारक घटकांच्या विदरण आणि संचयनाच्या कार्यातून विकसित होणारी भूरूपे आणि त्यामध्ये समाविष्ट भूरूपिकीय प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.

भारतीय उपखंडाची उत्क्रांती कशी झाली याचा भूरूपशास्त्रीय मुद्द्यांच्या आधारे अभ्यास करायला हवा. भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग- हिमालयीन प्रदेश, उत्तरेकडील मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठार, वाळवंट, किनारी प्रदेश व बेटे यांचे स्वरूप, विस्तार, रचना, वैशिष्ट्ये, भौगोलिक व हवामानशास्त्रीय महत्त्व, आर्थिक महत्त्व हे पैलू अभ्यासायला हवेत. यामध्ये नदी प्रणाली व पर्वत प्रणालींचा अभ्यासही महत्त्वाचा आहे.

ल्ल महाराष्ट्र राज्याची प्राकृतिक रचना आणि येथील भूरूपिकीय वैशिष्ट्ये अभ्यासताना नदी व पर्वत प्रणालींचा उत्तर ते दक्षिण अशा क्रमाने सलगता लक्षात घेऊन अभ्यास करावा. या ठळक भूरूपांनंतर महाराष्ट्रातील नैसर्गिक भूदृश्ये/ भूमीस्वरूपे – टेकड्या, कटक, पठारी  प्रदेश, कुंभगर्ता, धबधबे, उष्ण पाण्याचे झरे, पुळण यांचा आढावा घ्यावा. यामध्ये अशा भूरूपांचे स्थान, वैशिष्ट्ये, भौगोलिक तसेच पर्यटनातील महत्त्व असे मुद्दे लक्षात घ्यावेत.

हवामानशास्त्र

वातावरण – वातावरणाची संरचना, घटना व विस्तार अभ्यासताना त्याचे ऋतू व हवामानावरील परिणाम समजून घ्यायला हवेत.

हवा व हवामानाची अंगे ((Elements of weather and climate)  अभ्यासताना तापमान, आद्र्रता, पर्जन्यमान, वायुदाब, वारे हे महत्त्वाचे घटक व त्यांचा हवामानावरील परिणाम यांतील संकल्पनात्मक भाग महत्त्वाचा आहे. कार्यकारण संबंध जोडून या संकल्पनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

सौर ऊर्जा – पृथ्वीपृष्ठावरील उष्णतेचे संतुलन, तापमान- पृथ्वीपृष्ठावरील तापमानाचे ऊध्र्व व क्षितिजसमांतर वितरण या मुद्द्यांचा अभ्यास उष्णतेच्या संतुलनावर परिणाम करणारे घटक, संतुलनाचा परिणाम, तापमानाच्या वितरणास कारक घटक व त्याचा परिणाम समजून घेऊन करावा.

हवेचा दाब, वारे, ग्रहीय व स्थानिक वारे यांचे कारक घटक व परिणाम समजून घ्यावेत.

मोसमी वारे (मान्सून), पर्जन्याचे वितरण, अवर्षण व पूर व त्यांच्याशी निगडित समस्या यांचा महाराष्ट्रापुरता भाग अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असला तरी भारतीय पर्जन्याचा आढावा घेणे या मुद्द्याच्या आकलनासाठी आवश्यक आहे.

मान्सूनची निर्मिती, ॠतूंची निर्मिती, समुद्री प्रवाह, भूकंप, ज्वालामुखी इ. वेगवेगळ्या घटकांमध्ये समाविष्ट भौगोलिक प्रक्रियांच्या अभ्यासामध्ये पुढील मुद्दे समजून घ्यायला हवेत. –

भौगोलिक व वातावरणीय पार्श्वभूमी; घटना घडू शकते/ घडते ती भौगोलिक ठिकाणे प्रत्यक्ष घटना/ प्रक्रियेचे स्वरूप; घटनेचे/ प्रक्रियेचे परिणाम; पर्यावरणीय बदलांमुळे घटनेवर/ प्रक्रियेवर होणारे परिणाम; असल्यास आर्थिक महत्त्व; भारतातील, महाराष्ट्रातील उदाहरणे; नुकत्याच घडलेल्या महत्त्वाच्या घटना/ प्रक्रिया (current events)

पर्यावरण भूगोल

या घटकातील संकल्पनांचा बारकाईने अभ्यास आवश्यक आहे. या संकल्पना समजून घेऊन केलेला अभ्यास हा विश्लेषणात्मक व उपयोजित प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

परिसंस्था घटक अभ्यासताना त्यातील जैविक आणि अजैविक घटक कोणते व त्यांचे एकमेकांवरील अवलंबित्व व परिसंस्थेतील भूमिका समजून घ्यायला हवी.

ऊर्जा प्रवाह, ऊर्जा मनोरा, अन्न साखळी, अन्न जाळे हे घटक एकत्रितपणे अभ्यासायचे आहेत. परिसंस्थेमधील ऊर्जेचा प्रवाह, अन्न साखळी/ जाळ्यातील विविध घटकांमध्ये होणारे ऊर्जेचे हस्तांतरण आणि त्यातून तयार होणारा ऊर्जेचा पिरॅमिड अशा प्रकारे परस्परसंबंध लक्षात घेऊन हा मुद्दा अभ्यासावा.

पर्यावरणीय ऱ्हासाची कारणे, त्यावर परिणाम करणारे घटक, स्वरूप, त्यातून उद््भवणाऱ्या समस्या व त्यांवरील उपाय व पर्यावरणाच्या संधारणाची गरज, त्यासाठीचे उपाय, होणारे प्रयत्न असे मुद्दे लक्षात घ्यावेत.

जागतिक पारिस्थितिकीय असंतुलन, जैवविविधतेतील ऱ्हास यांचा अभ्यास कारणे, स्वरूप, परिणाम, समस्या आणि संभाव्य उपाय अशा मुद्द्यांच्या आधारे करावा.

जागतिक तापमानवाढ, हरितगृह परिणाम या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. त्यांचा अभ्यास पुढील मुद्द्यांच्या आधारे करावा – कारणे- विशेषत: CO, COs, CH4, CFCs, NO यांची वातावरणातील पातळी, स्वरूप, परिणाम, समस्या, संभाव्य उपाययोजना

जैवविविधतेचा ऱ्हास व जागतिक तापमानवाढ यांच्यामुळे उद््भवलेल्या समस्या म्हणून मानव व वन्यजीव संघर्ष, निर्वनीकरण, आम्ल पर्जन्य, महाराष्ट्रातील ऊष्मावृद्धी केंद्रे (Heat Islands) या अभ्यासक्रमातील घटकांचा विशेष अभ्यास आवश्यक आहे. यांचा अभ्यासही कारणे, स्वरूप, समस्या आवश्यक उपाययोजना या मुद्द्यांच्या आधारे करावा.

पर्यावरण संरक्षणाबाबत कायदे अभ्यासताना महत्त्वाच्या व्याख्या, तरतुदी, शिक्षेच्या तरतुदी, अपवाद असे मुद्दे लक्षात घ्यावेत.

पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन (EIA) व कार्बन क्रेडिट्स या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात व त्यांचा वापर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर कशा प्रकारे होतो हे समजून घ्यावे.

Story img Loader