प्रवीण चौगले

प्रस्तुत लेखामध्ये आपण सामान्य विज्ञान या अभ्यासघटकाच्या तयारीविषयी जाणून घेऊ या. हा अभ्यासघटक इतिहास, राज्यव्यवस्था, भूगोल इ. सामान्य अध्ययनातील विषयांप्रमाणेच पूर्वपरीक्षेकरीता महत्त्वाचा आहे. कारण २०११ ते २०१९ या दरम्यान या घटकावर सुमारे ८ ते २० प्रश्न विचारले गेले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे – वर्ष आणि कंसात विचारल्या गेलेल्या प्रश्नांची संख्या दिली आहे.

wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र :  राज्य सेवा मुख्य परीक्षा – मानवी हक्क विकासात्मक मुद्दे
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
PET, LLM, Admit Card, Pre-Entrance Exams,
‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, विविध केंद्रावर १७ नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन

२०११ (२०), २०१२ (१६),

२०१३ (१५), २०१४ (२०),

२०१५ (८), २०१६ (१२),

२०१७ (६), २०१८ (१५),

आणि २०१९ (१५) इ.

सामान्य विज्ञान या अभ्यासघटकामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, कृषिशास्त्र या पारंपरिक शास्त्र विषयांबरोबरच जैवतंत्रज्ञान, अवकाश संशोधन, जेनेटिक्स, नॅनो तंत्रज्ञान, दूरसंचार तंत्रज्ञान इ. घटकांचा समावेश होतो. या अभ्यासघटकाची व्याप्ती अधिक असल्याने बहुतांश विद्यार्थी या घटकाकडे दुर्लक्ष करताना दिसतात. मात्र सामान्य विज्ञानातील मूलभूत संकल्पना अवगत केल्यास या विषयावर पकड मिळविता येईल.

सामान्य विज्ञानाच्या तयारीचा प्रारंभ कोठून करावा, याविषयी परीक्षार्थीमध्ये संभ्रमावस्था आढळते. याकरिता मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधून या घटकावर आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण करावे. या विश्लेषणांनी एक बाब आपल्या ध्यानात येईल ती म्हणजे, सामान्य विज्ञानाच्या तयारीकरिता कोणत्याही विशेष ज्ञानाची आवश्यकता नसते. खास करून कला व वाणिज्य शाखांमधून पदवी घेतलेल्या परीक्षार्थीनी याची नोंद घ्यावी. ही बाब पुढील प्रश्नामधून स्पष्ट होईल.

प्र. खालीलपैकी रासायनिक बदलांचे उदाहरण/उदाहरणे कोणती?

अ) सोडियम क्लोराइडचे स्फटिकीकरण

ब) बर्फाचे वितळणे.

क) दूध आंबणे.

अशा प्रश्नांवरून स्पष्ट होते की, या अभ्यासघटकावर येणारे प्रश्न मूलभूत संकल्पनांवर आधारित असतात. आपण शालेय जीवनात असताना रासायनिक क्रिया कोणत्या हे जाणून घेतलेले आहे. याकरिता आपल्याला कोणतेही विशेष पुस्तक अथवा संदर्भग्रंथ वाचण्याची आवश्यकता पडली नाही.

या अभ्यासघटकावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये पारंपरिक घटकांवरील प्रश्नांसोबतच चालू घडामोडी व तंत्रज्ञानविषयक प्रश्न विचारण्यात येतात. अशा प्रश्नांची काही उदाहरणे पाहूयात.

काही वर्षांपूर्वी स्वाइन फ्लू या रोगाचा मोठय़ा प्रमाणावर प्रसार झाला होता. या पार्श्वभूमीवर २०१५ मध्ये H1N1हा विषाणू सध्या चर्चेमध्ये आहे.

खालीलपैकी तो कोणत्या रोगाशी संबंधित आहे? असा प्रश्न विचारला होता. याला पर्याय होते-

अ) एड्स

ब) बर्ड फ्लू

क) डेंग्यू

ड) स्वाइन फ्लू

सध्या ‘करोना’ विषाणू जगभर धुमाकूळ घालत आहे. तर या विषाणूची सविस्तर माहिती करून घ्यावी. करोनाप्रमाणेच एबोला, झिका, मार्स, सार्स इ. विषाणूंचीही आपल्याला माहिती असावी.

२०१९ च्या पूर्वपरीक्षेत तंत्रज्ञानविषयक प्रश्न विचारला होता.

दूरसंचार तंत्रज्ञानाच्या संदर्भात LTE (Long Term Evolution) आणि VoLTE (Voice Over Long Term Evolution) यांच्यामध्ये कोणता फरक आहे?

अ) LTE साधारणपणे t G स्वरूपात विपणीत (marketed) केला जातो व VoLTE साधारणपणे प्रगत t G स्वरूपात विपणीत करण्यात येतो.

AF)LTE हे डेटा ओन्ली तंत्रज्ञान आहे आणि VoLTE हे व्हॉइस ओन्ली तंत्रज्ञान आहे.

वरील तंत्रज्ञान हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या मोबाइल फोनशी संबंधित आहे. बऱ्याचदा आपल्या फोनच्या स्क्रीनवर LTE आणि VoLTE लिहिलेले आढळते. अशा प्रश्नांमधून तंत्रज्ञानविषयक अवेरनेस तपासाला जातो.

सामान्य विज्ञानाचे स्वरूप लक्षात घेता यामध्ये समाविष्ट विषयातील घटकांचे प्राधान्याने अध्ययन करावे. उदा. भौतिक शास्त्रातील विविध नियम जसे, ऑप्टिकल, विद्युत, ध्वनी, चुंबकत्व, घनता इ. बाबी, तर जीवशास्त्रामध्ये पचनसंस्था, प्रजननसंस्था, विविध प्रकारचे रोग, पेशींचे प्रकार, वनस्पतींचे वर्गीकरण, जनुकीय अभियांत्रिकी, जीवनसत्त्वे या बाबींविषयीची माहिती घ्यावी. रसायनशास्त्रामध्ये महत्त्वाची रासायनिक संयुगे, खनिजे व त्यांचा आढळ, धातू व त्यांचे गुणधर्म, कार्बन व त्यांची संयुगे, रोजच्या आयुष्यामध्ये होणारा रसायनशास्त्राचा वापर यांचा प्रामुख्याने अभ्यास करावा. यासोबतच जैवतंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, ऊर्जा संरक्षण या क्षेत्रांतील चालू घडामोडींचा मागोवा घेत राहावे.

२०१९ च्या पूर्वपरीक्षेमध्ये digital signature, RNAi  B. तंत्रज्ञानावर आधारित प्रश्न विचारले गेले होते. सामान्य विज्ञानाच्या अभ्यासासोबत विज्ञान—तंत्रज्ञानाशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. उदा. दरवर्षी नोबेल पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर त्यातील शास्त्र शाखेशी संबंधित संशोधनाविषयी अधिक जाणून घेणे श्रेयस्कर ठरेल.

सामान्य विज्ञान या घटकावरील प्रश्नांचे स्वरूप पाहता या घटकासाठी सर्वप्रथम ८ वी ते १२ वीपर्यंतची एनसीईआरटीची क्रमिक पुस्तके अभ्यासावीत, कारण या पुस्तकांमधूनच मूलभूत संकल्पना स्पष्ट होतात. यासोबतच ‘सायन्स रिपोर्टर’, ‘डाऊन टू अर्थ’ इ. मासिके; ‘द हिंदू’ हे वर्तमानपत्र वाचणे आवश्यक आहे. याशिवाय एखाद्या संकल्पनेविषयी अधिक जाणून घ्यायची असेल तर इंटरनेटचा वापर करावा. याशिवाय इस्रो, डीआरडीओ, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय यांची संकेतस्थळे पाहावीत. मानवी शरीरासंबंधीच्या माहितीकरिता एनबीटी प्रकाशनाचे ‘ह्य़ुमन मशीन’ हे पुस्तक उपयुक्त आहे.