महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी कशी करावी, याविषयीचे मार्गदर्शन करणारी साप्ताहिक लेखमालिका..
मागच्या लेखात आपण पर्यावरणाचा काही भाग समजावून घेतला आज आपण पर्यावरण रक्षणासाठी १९४८ ते २०१२ पर्यंत जागतिक पटावर झालेले प्रयत्न बघणार आहोत.
१) १९४८- IUCN – ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झव्र्हेशन ऑफ नेचर एॅण्ड नॅचरल रिसोस्रेस’ या संस्थेची स्थापना पॅरिस मध्ये झाली.
२) १९५६ मिनीमाटा दुर्घटना – पाऱ्याच्या विषबाधेमुळे अनेक लोकांचा मृत्यू.
३) १९६१- wwf अर्थात जागतिक वन्य निधी या संस्थेची वन्य जीवन संरक्षण करण्याच्या हेतूने याची स्थापना.
४) १९६२ – रिचल कारसन याने, डीडीटी व त्यासारखी रासायनिक पदार्थाच्या वापरामुळे पर्यावरणाची होत असलेली हानी यावर ‘सायलेंट िस्प्रग’ नामक पुस्तक लिहिले.
५) २२ एप्रिल १९७० – वसुंधरा दिन. अमेरिकेतील जवळ जवळ २० लाख लोकांनी या दिवशी शांततेच्या मार्गाने जगाचे लक्ष पर्यावरण संरक्षणाकडे वेधले.
६) १९७० – यूनेस्कोचा मानव आणि जीवावरण कार्यक्रम MAB – Man and Biosphere programme..
७) १९७२ – स्टॉकहोम येथे जागतिक पर्यावरण परिषद
८) १९७४ – जागतिक अन्नपरिषद.
९) १९७७ – केनियात, वंगाई मथाई यांनी झाडे लावण्यासठी व पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी ग्रीन बेल्ट चळवळ सुरू केली.
१०) १९७९ – जिनिव्हा येथे भरलेल्या जागतिक वातावरणसंबंधीच्या परिषदेत ग्रीनहाऊस इफेक्टवर चर्चा घडून आली. सूर्यापासून पृष्ठभागाकडे येणारी सौर किरणे वातावरणाकडून शोषून घेतली जात नाहीत, मात्र पृथ्वीकडून परावर्तित व उत्सर्जित करण्यात आलेली उर्जा काही प्रमाणात वातावरणात ते वायू शोषून घेतात व उष्णतेच्या रूपाने पुन्हा पृथ्वीकडे फेकतात. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते, यालाच ग्रीनहाऊस इफेक्ट (हरितग्रह परिणाम) म्हणतात.
हरितग्रह वायू – जलबाष्प, कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफ्युरो कार्बन (CFC), नायट्रोजन ऑक्साईड, हायड्रोक्लोरोफ्युरोकार्बन (HCFCs), परफ्योरो मिथेन (CF4), ओझोन इ.
१९८४ – भोपाळ वायू दुर्घटना युनियन कार्बाइड या कीटकनाशकाच्या कारखान्यात, मिथेल आयसोसायनेट (Methyl Isocyanate) या वायू गळतीमुळे शेकडो लोकांचे प्राण गेले.
१९८५ – ब्रिटिश शास्त्रज्ञांना अंटाíक्टकावर ओझोन छिद्र आढळून आले.
१९८६ – चर्नोबाईल दुर्घटना
१९८७ – मॉन्ट्रियल प्रोटोकॉल
विकसित तसेच विकसनशील राष्ट्रांवर CFCs चा वापर टप्प्याटप्प्याने कमी करण्याबाबत बंधने.
१९९२ – पहिली वसुंधरा परिषद – रिओ दि जानेरो (ब्राझील) येथे जानेवारी १९९२ मध्ये वातावरणीय प्रदूषणाच्या प्रश्नावर उपाययोजना सुचविण्यासाठी.
१९९७ – क्योटो प्रोटोकॉल (Kyoto Protocol) प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र १६ फेब्रुवारी २००५ पासून. २००४ ते २०१२ या कालावधीत जागातिक हरितग्रह वायूंची निर्मिती त्यांच्या १९९० मधील प्रमाणापेक्षा ५.२ टक्क्य़ांनी कमी करणे हे उद्दिष्टय़ होते. (मात्र २०१२ ची मर्यादा वाढवण्यात येऊन ती २०२० पर्यंत करण्यात आली आहे.)
२००२ दुसरी वसुंधरा परिषद – २००२ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे शाश्वत विकासावर जागतिक परिषद भरविण्यात आली. (World Conference of sustainable Development)
२००७ – बाली परिषद. ३-१४ डिसेंबर २००७ साली UNFCCC अंतर्गत बाली (इंडोनेशिया) परिषद पार पडली. त्यात हरितगृह वायुंमुळे निर्माण होणाऱ्या जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलावर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आणि त्यावरील उपाययोजनांवर व्यापक चर्चा करण्यात आली. या परिषदेचे नाव UNFCCC Conference of Parties-13 असे होते.
२००५ – कोपेनहेगन परिषद – डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन येथे ७ ते १८ डिसेंबर, २००९ दरम्यान UNFCCC ची १५ वी परिषद (Conference of Parties-15) पार पडली. २००५ पासून अंमल सुरू झालेल्या हवामान बदलावरील क्योटो कराराचा कार्यक्रम २०१२ मध्ये संपुष्टात येणार आहे. त्याच्या जागेवर एका नवीन करारास अंतिम रूप देण्यासाठी ही परिषद घेण्यात आली होती. मात्र, विकसित व विकसनशील देशांमधील मतभेदांमुळे कार्बन डायॉक्साईडच्या उत्सर्जनावर निश्चित बंधने घातला जाणारा अंतिम करार संमत होऊ शकला नाही.
२०१० – कॅनकून परिषद – मेक्सिकोमधील कॅनकून या शहरात २९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर, २०१० दरम्यान UNFCCC ची १६ वी परिषद (Conference of Parties-16) पार पडली. या परिषदेत कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने एका संतुलित पॅकेजचा स्वीकार करण्यात आला.
२०११ – दरबान परिषद – दरबान (दक्षिण आफ्रिका) येथे २८ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०११ दरम्यान UNFCCC ची १७ वी परिषद (उल्लऋी१ील्लूी Conference of Parties-17) पार पडली या परिषदेत क्योटो प्रोटोकॉल, बाली अॅॅक्शन प्लॅन (२००७), कॅन्कून करार (२०१०) यांच्या अंमलबजावणीवर चर्चा घडून आली.
महत्त्वाचे मुद्दे :
१) मिनामाटा दुर्घटना सुमारे ५७ वर्षांपूर्वी मिनामाटा खाडीत पाऱ्यामुळे विषबाधा झाली. एका प्लॅस्टिक कारखान्याद्वारे प्लॅस्टिक तयार करण्यासाठी पाऱ्याच्या रसायनांचा वापर केला जात असे. प्रक्रियेदरम्यान तयार होणारा औद्योगिक कचरा मिनामाटा नदीच्या खाडीत टाकला जात होता. पाण्यात मिसळल्या गेलेल्या औद्योगिक कचऱ्यातील पाऱ्याचे सेंद्रिय तयार झाले. ही सेंद्रिय रसायने खाडीतील माशांच्या शरीरात शिरून त्यामुळे माशांच्या उतीत पारद रसायनांची मात्रा वाढली. ही मासळी स्थानिक लोकांद्वारे अन्न म्हणून वापरल्याने अनेक लोक विषबाधेमुळे मृत्युमुखी पावले. त्याला मिनामाटा दुर्घटना म्हणून ओळखले जाते.
२) वायुप्रदूषण प्रतिबंधक व नियंत्रण कायदा -सरकारद्वारे १९८१ साली प्रदूषणाची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी अमलात आणला.
३) पर्यावरणाविषयक जागृती निर्माण करण्यासाठी जागतिक स्तरावर साजरे केले जाणारे दिवस :
* २ फेब्रुवारी – जागतिक दलदलीचा प्रदेश दिन : इराणमधील रामसर येथे २ फेब्रुवारी १९७१ रोजी दलदलीच्या प्रदेशांसबंधी आंतरराष्ट्रीय करारावर सह्य़ा करण्यात आल्या. म्हणून दलदलीच्या प्रदेशाची जागृती वाढविण्यासाठी व या प्रदेशाची मानवासाठी असलेली उपयुक्तता लोकांना पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. २ फेब्रुवारी १९७१ – (Ramser Convention)
* २१ मार्च – जागतिक वन दिन
* २२ मार्च – जागतिक जल दिन
* ७ एप्रिल – जागतिक आरोग्य दिन
* १८ एप्रिल – जागतिक वारस दिन
* २२ एप्रिल – पृथ्वी दिन / जागतिक वसुंधरा दिन (अमेरिकेतील काही नागरिकांना १९७० साली मानवाद्वारे निसर्गाला होत असणाऱ्या हानीबाबत हा पृथ्वी दिन सर्वप्रथम साजरा केला.)
* ३ मे – जागतिक सौर दिन
* ५ जून – जागतिक पर्यावरण दिन (विकास प्रक्रियेमुळे पर्यावरणाला होणाऱ्या हानीचा आढावा घेण्यासाठी ५ जून १९७२ साली स्वीडन येथील स्टॉकहोम येथे पर्यावरणाविषयक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो.)
* १६ सप्टेंबर – जागतिक ओझोन दिन (संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे ओझोन थराचे रक्षण करण्यासाठी हा दिवस घोषित करण्यात आला. १९८७ साली मॉन्ट्रियल येथे ओझोन थराचा नाश करणाऱ्या वायूंची मात्रा कमी करण्यासंबंधी एका महत्त्वपूर्ण करारावर सह्य़ा करण्यात आल्या).
* २८ सप्टेंबर – हरित ग्राहक दिवस
* १ ते ७ ऑक्टोबर – वन्यजीव सप्ताह
* २५ नोव्हेंबर – जागतिक जैवविविधता दिन
४) सुंदरलाल बहुगुणा – चिपको आंदोलन
५) आम्लवर्षां किंवा अॅसिड रेन वातावरणात मिसळणाऱ्या सल्फर, नायट्रोजन, कार्बन यांच्या संयुगांचा बाष्प व ऑक्सिजन यांचा संयोग होऊन निरनिराळी आम्ल तयार होतात. हे आम्ल पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येते, यालाच आम्लजन्य किंवा अॅसिड रेन असे म्हणतात.
६) मादागास्कर बेटावरील डोडो पक्षी व भारतीय वनातील चित्ता ही नष्ट झालेल्या प्रजातींची उदाहरणे ओहत.
७) १९९८ साली जागतिक संसाधन संस्थेद्वारे स्पष्ट करण्यात आले की, एक अमेरिकन नागरिक एका भारतीय नागरिकापेक्षा सरासरी २४ पट ऊर्जेचा वापर करतो.
८) एवझॉन वॉल्डेझ हे तेलवाहू जहाज १९८९ साली अलास्का येथील प्रिन्स साऊंड येथे दुर्घटनाग्रस्त झाले. या जहाजाच्या तेलगतळतीमुळे आजूबाजूच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण झाले.
९) पश्चिम घाटाच्या अधिक पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात सदाहरित वने आढळतात.
१०) भारताच्या पूर्वेतर भागात तसेच अंदमान व निकोबार द्वीपसमूहात सदाहरित वने आढळून येतात.
११) सदाहरित जंगले ही कीटकांच्या या अनेक प्रजातींनी समृद्ध असतात.
१२) युट्रोफिकेशन सांडपाण्यामुळे मोठय़ा प्रमाणात होणारे जलप्रदूषण व घनकचऱ्याच्या अयोग्य व्यवस्थापन यामुळे हा कचरा तलाव, नद्या यांच्यामध्ये मिसळला जातो. या प्रक्रियेमुळे पाण्यातील विद्राव्य प्राणवायूचे प्रमाण घटून परिसंस्थेतील प्राणी प्रजाती नष्ट होतात. या प्रक्रियेला युट्रोफिकेशन असे म्हणतात. ग्रामीण भागात खतांच्या अधिक वापरांमुळे युट्रोफिकेशनचा धोका जास्त प्रमाणात होतो.
१३) व्याघ्रप्रकल्प दुर्मिळ व अस्तंगत होऊ घातलेल्या वाघांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारमार्फत १९७३ ला हा कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आला.
१४) मगर संवर्धन कार्यक्रम- मगरांचे संरक्षण करण्यासाटी १९७५ सालापासून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला.
१५) हत्ती प्रजनन कार्यक्रम १९९२
१६) ओरिसातील ऑलिव्ह रीडले कासवे दरवर्षी डिसेंबर ते एप्रिल महिन्यात ओरिसातील गहिरमाथा व इतर दोन स्थळांवर लाखोंच्या संख्येने समुद्र कासव प्रजननासाठी समुद्रकिनारी जमा होतात.
१७) या कासवांच्या अंडय़ांचे संरक्षण व्हावे यासाठी हा प्रदेश अभयारण्य प्रदेश घोषित करण्यात आला व यासाठी शिकारीसाठी बंदी घालण्यात आली. या संरक्षित क्षेत्रास भित्तरकनिका अभयारण्य असे नामकरण करण्यात आले.
१८) बीज बचाव आंदोलन- हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या बीज बचाव आंदोलनास सुरुवात झाली.
१९) तेहरी प्रकल्प- उत्तरांचल प्रदेशातील हिमालयातील क्षेत्रातील तेहरी धरण प्रकल्पामुळे अनेक गावे बुडण्याची भीती आहे. या धरणामुळे लोकांचे विस्थापन होऊन पर्यावरणाची जी हानी होईल, त्यासाठी पर्यावरण शास्त्रज्ञ आणि जनता या विरोधात आंदोलन करत आहे.
२०) भारतात ३९ व्याघ्र प्रकल्प असून त्यात महाराष्ट्रातील चार प्रकल्पांचा समावेश आहे.
२१) जागतिक तापमानवाढीला कारणीभूत ठरणारे सहा वायू कार्बनडायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साइड, हायड्रोक्युरो कार्बन, परप्युरो कार्बन, सल्फर हेक्झाक्लोराईड.
२२) इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज या संस्थेत जागतिक तापमानवाढीचा अभ्यास केला जातो.
२३) जागतिक हवामान बदलावर डिसेंबर २०११ मध्ये दरबान (दक्षिण आफ्रिका) येथे परिषद पार पडली.
२४) ‘अजेंडा २१’ हा शाश्वत विकासासाठी संबंधित असून तो १९९२ साली रियो दि जेनेरियो या परिषदेत हाती घेण्यात आला.
२५) युनेस्को २०१२ च्या जागतिक वारसा यादीत भारतातल्या पश्चिम घाटाचा समावेश करण्यात आला.
२६) राष्ट्रीय हरित न्यायालय पर्यावरणविषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी अणि पर्यावरणविषयक अधिकारांच्या सुरक्षिततेसाठी दिल्ली येथे करण्यात आली.
२७) या न्यायालयांना उच्च न्यायालयाचा दर्जा असे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडनंतर भारत हा तिसरा असा देश आहे की, तेथे पर्यावरणविषयक अपराधाबद्दल स्वतंत्र न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे.
२८) ७५ ते ८० डेसिबलपेक्षा कमी तीव्रतेचा ध्वनी श्रवण क्षमतेवर विपरीत परिणाम घडवून आणत नाही, मात्र ८० डेसिबलपेक्षा जास्त डेसिबल तीव्रतेचा ध्वनी प्रतिदिन ८ तासांपेक्षा जास्त काळ ऐकण्यात आला तर व्यक्तींची श्रवणक्षमता बिघडू शकते.
२९) बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (BOD) पाण्याची साधारण गुणवत्ता अणि त्यांच्या प्रदुषणाचे प्रमाण मोजण्यासाठी वापरण्यात येणारी एक चाचणी आहे.
३०) त्याद्वारे पाण्याच्या नमुन्यातील जैवऱ्हास योग्य सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण मोजले जाते. हे प्रमाण जेवढे जास्त तेवढी पाण्याची BOD जास्त. BOD जेवढी जास्त तेवढे पाणी जास्त प्रदूषित असते. पाण्यातील BOD तीन मिली गॅ्रमपेक्षा कमी असल्यास ते आंघोळीसाठी योग्य मानले जाते अणि दोन मिलीगॅ्रमपेक्षा कमी असेल तर ते पिण्यासाठी योग्य मानले जाते.
३१) युरो निकष- वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी वाहने तयार करणाऱ्या अणि इंधन तयार करणाऱ्या कंपन्यांना युरो निकष लागू करण्यात आले आहेत. वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरांमधली प्रदूषणाचे प्रमाण ठरावीक टप्प्यापर्यंत कमी करण्याबाबतचे हे निकष आहेत. भारतात लागू करण्यात आलेल्या युरो निकषांना भारत स्टेज निकष असे संबोधले जाते.
३२) पुणे येथील अॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) या संस्थेकडून प्राप्त करावे लागतात. हे निकष रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑटो इंधनविषयक समितीने तयार केले आहेत.
३३) इको मार्क : लेबल १९९१ मध्ये ही योजना तयार करण्यात आली. पर्यावरणाशी सुसंगत असलेल्या उपभोग्य वस्तूंना हे लेबल दिले जाते. ‘इको मार्क’चा लोगो मातीचे भांडे आहे.
३४) मूलस्थानी संरक्षण (IN Situ CONSERVATION) म्हणजे सजीव ज्या जंगलात राहतात, त्यांच्या अधिवासात त्यांना वाढवले जाते, जपले जाते, संरक्षण केले जाते. उदा. गुजरातमधील गीर हे अभयारण्य आशियातील सिंहासाठी नावाजलेले आहे.
३५) इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अॅण्ड नॅचरल सोर्स यांच्याद्वारे ‘रेड डाटा बुक’ प्रकाशित केले जाते. या यादीत ज्या प्राणी अणि वनस्पतींना धोका झाला आहे, त्यांची यादी तयार केली जाते.
३६) गिधाडे हा देशातील ग्रामीण भागात आतापर्यंत मोठय़ा प्रमाणात आढळत असलेला पक्षी होता. गेल्या १० वर्षांत त्यांची संख्या कमी झाली आहे. कारण पशुसंगोपन उद्योगात आजारी जनावरांना बरे करण्यासाठी वापरण्यात येत असलेले डायक्लोफेनॅक हे औषध होय.
३७) पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेले भरतपूर अभयारण्य हे राजस्थानच्या भरतपूर शहराजवळ आहे.
३८) रेहरकुरी हे अहमदनगर जिल्ह्य़ात असून ते काळवीटांसाठी प्रसिद्ध आहे.
३९) जैवविविधता हा शब्द प्रामुख्याने १९९२ च्या रियो दि जेनेरियो येथे संपन्न झालेल्या वसुंधरा परिषदेपासून प्रचलित झाला.
(पुढच्या अंकात जागतिक भूगोल या विषयासंदर्भात मार्गदर्शन)
स्पर्धापरीक्षेच्या रिंगणात : घटक पर्यावरण – जागतिक पटावरील महत्त्वाच्या नोंदी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी कशी करावी, याविषयीचे मार्गदर्शन करणारी साप्ताहिक लेखमालिका.. मागच्या लेखात आपण पर्यावरणाचा काही भाग समजावून घेतला आज आपण पर्यावरण रक्षणासाठी १९४८ ते २०१२ पर्यंत जागतिक पटावर झालेले प्रयत्न बघणार आहोत.
First published on: 21-01-2013 at 12:43 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spardhaparikshetchya ringanat component of environment important notes of international fold