भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी आहे. त्यासाठी एएआयने वरिष्ठ सहाय्यक पदासाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार एएआयच्या अधिकृत वेबसाइटवर aai.aero वर भेट देऊन एएआय भरती २०२१ साठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२१ आहे. एएआय भर्ती २०२१ अंतर्गत एकूण २९ पदे भरली जातील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एएआय भरती २०२१ साठी महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची प्रारंभ तारीख: २९ जुलै २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ ऑगस्ट २०२१

एएआय भरती २०२१च्या रिक्त जागांचा तपशील

वरिष्ठ सहाय्यक (ऑपरेशन्स) – १४ पदे

वरिष्ठ सहाय्यक (वित्त) – ०६ पदे

वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स) – ०९ पदे

एएआय भरती २०२१ साठी पात्रता निकष

वरिष्ठ सहाय्यक (ऑपरेशन्स) – एलएमव्ही (LMV) परवानासह पदवीधर. उमेदवारांनी व्यवस्थापनाचा डिप्लोमा देखील केलाला हवा.

वरिष्ठ सहाय्यक (वित्त) – उमेदवारांनी ०३ ते ०६ महिन्यांच्या संगणक प्रशिक्षण कोर्सच्या प्रमाणपत्रासह B.Com असणे आवश्यक आहे.

वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स)- उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक्स/ दूरसंचार/ रेडिओ अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा केलेला असावा.

एएआय भरती २०२१ साठी वयोमर्यादा

वरिष्ठ सहाय्यक (ऑपरेशन्स) – उमेदवारांची वयोमर्यादा ३० जून २०२१ रोजी ५० वर्षे असावे.

वरिष्ठ सहाय्यक (वित्त) – उमेदवारांची वयोमर्यादा ३० जून २०२१ रोजी ५० वर्षे असावे.

वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स) – ३० जून २०२१ रोजी ५० वर्षे असावे.

एएआय भरती २०२१ साठी पगार

वरिष्ठ सहाय्यक (ऑपरेशन्स) – रु. ३६,००० ते रु. १,१०,०००

वरिष्ठ सहाय्यक (वित्त) – रु. ३६,००० ते रु. १,१०,०००

वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स) – रु. ३६,००० ते रु. १,१०,०००

लिंकवर क्लिक करून उमेदवार या पदांसाठी (AAI Recruitment 2021) थेट अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी त्यांना या लिंकद्वारे एएआय भर्ती 2021 च्या अधिकृत अधिसूचनेतून जाण्याची विनंती केली आहे.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai recruitment 2021 airport authority of india job offer 2021 more than 1 lakh salary check last date eligibility criteria ttg