महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषद व संशोधन परिषद, पुणे तर्फे राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ- राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ- अकोला, मराठवाडा कृषी विद्यापीठ- परभणी व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ- दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने या विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या पदवी परीक्षांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
अभ्यासक्रम – बीएस्सी (कृषी), बीएस्सी (उद्यानविद्या), बीएससी (वनशास्त्र), बीएफएस्सी, बीएस्सी (कृषी जैवतंत्रज्ञान).
अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र व इंग्रजी या विषयांसह पूर्ण केलेली असावी.
बीटेक् (फूड टेक्नॉलॉजी), बीबीए (कृषी), बीटेक (कृषी अभियांत्रिकी) अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी वर नमूद केल्याप्रमाणे पात्रता पूर्ण केलेली असावी.
बीएस्सी (गृहविज्ञान) अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा कला, वाणिज्य, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांसह पूर्ण केलेली असावी.
प्रवेश पद्धती : वरील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया कल्प टेक्नॉलॉजीज प्रा. लि., पुणे (केटीपीएल) यांच्यामार्फत पूर्ण केली जाणार आहे.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जदारांनी आपल्या अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून ६०० रु. रोखीने व चलनद्वारे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुठल्याही शाखेत भरावेत.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या http://www.mcaer.org किंवाmaha-agriadmission.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने maha-agriadmission.in या संकेतस्थळावर अर्ज करून त्याची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांसह कल्प टेक्नॉलॉजीज प्रा. लिमिटेडच्या पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, बोरिवली (पूर्व), कुडाळ येथील कार्यालयात सादर करण्याची शेवटची तारीख २५ जून २०१३ आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा