म. फुले कृषी विद्यापीठ, राहुरी जि. नगर येथे खालील कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत-

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्र् कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम –  कालावधी दोन वर्षे (मराठी माध्यम)
स्र् कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम – कालावधी तीन वर्षे  (सेमी इंग्रजी माध्यम)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थी शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत.
निवड पद्धती : अर्जदार विद्यार्थ्यांपैकी पात्रताधारक विद्यार्थी- उमेदवारांना महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, पुणेतर्फे संगणकीय पद्धतीवर आधारित प्रवेशपरीक्षा द्यावी लागते.
संबंधित विद्यार्थ्यांची दहावीच्या पद्धतीतील गुणांची टक्केवारी व संगणकीय निवड पद्धतीच्या गुणांकावर आधारित जिल्हानिहाय प्रवेश देण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक २५ रु. रोखीने भरल्यास महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या संबंधित जिल्ह्य़ातील अधिकृत केंद्रावर उपलब्ध होईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी ३०० रु. (राखीव गटातील उमेदवारांनी १५० रु.) रोखीने महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या अधिकृत केंद्रावर भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिकाऱ्यांशी दूरध्वनी क्र. ०२१६७-३०४२०४ वर संपर्क साधावा अथवा महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या http:oasis.mkcl.org/ agridiploma   या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची पद्धत व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र, तपशील आणि शुल्कासह असणारे अर्ज महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या अधिकृत केंद्रावर जमा करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०१३.
दहावी उत्तीर्ण ज्या विद्यार्थ्यांना कृषी तंत्रज्ञान विषयातील पदविकेसह आपले करिअर करायचे असेल अशा विद्यार्थ्यांना हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतात.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agriculture technology diploma