नवी दिल्ली येथील ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे देशांतर्गत १७० व्यवस्थापन शिक्षण संस्थांमध्ये एमबीए, व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका व तत्सम व्यवस्थापन विषयक अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी येत्या सप्टेंबर महिन्यात मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट (एमएटी) ही प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
शैक्षणिक अर्हता
अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी उत्तम शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.
निवड पद्धती
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना निवड पात्रता परीक्षा द्यावी लागेल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर ६ सप्टेंबर २०१५ रोजी तर संगणकीय स्वरुपात १२ सप्टेंबर २०१५ रोजी
घेण्यात येईल.
उमेदवारांच्या पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित महाविद्यालयात अथवा संस्थेतील व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क
उमेदवारांनी आपल्या प्रवेश अर्जासह १,२०० रु. प्रवेश शुल्क म्हणून भरणे आवश्यक आहे. हे प्रवेश शुल्क ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या apps.aima.in/matsept15 या संकेतस्थळावर संगणकीय पद्धतीने, नेट-बँकिंगद्वारे भरावे अथवा १,२०० रुपयांचा ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या नावे असणारा आणि नवी दिल्ली येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट प्रवेश अर्जासह पाठवून
भरता येईल.
अधिक माहिती
अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहितीसाठी ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या http://www.aima.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची मुदत
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन मॅनेजमेंट हाऊस, १४, इन्स्टिटय़ूशनल एरिया, लोधी रोड, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर २२ ऑगस्ट २०१५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत. ल्ल ल्ल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा