भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत सीमॅट म्हणजेच कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट घेतली जाते. अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाने मान्यता प्रदान केलेल्या देशातील साधारणत: ४०० हून अधिक शासकीय, विद्यापीठातील व्यवस्थापन अभ्यासक्रम शिकवणारे विभाग, संलग्नित महाविद्यालये आणि महत्त्वाच्या खासगी व्यवस्थापन शिक्षण (एमबीए किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट- पीजीडीएम) देणाऱ्या संस्थांमधील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीमॅटमधील गुण ग्राह्य धरले जातात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यंदा ही परीक्षा नॅशनल टेिस्टग एजन्सीद्वारे घेतली जाणार आहे. गेल्या वर्षीपर्यंत ही परीक्षा अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेतली जायची. या परीक्षेची प्रारंभिक प्रवेश प्रकियेची सुरुवात १ नोव्हेंबर २०१८ पासून होणार असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर आहे. यंदा ही परीक्षा २७ जानेवारी २०१९ रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेद्वारे २०१९-२०२१ या शैक्षणिक वर्षांसाठी प्रवेश दिला जाईल. ही परीक्षा देशातील साठ शहरांमध्ये घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड, अमरावती, औरंगाबाद, ठाणे, नाशिक, सोलापूर, नवी मुंबई, धुळे, अहमदनगर, कोल्हापूर या शहरांचा समावेश आहे.
अर्हता
ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही विद्याशाखेतील पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळवायला हवेत. जे विद्यार्थी यंदा पदवीची अंतिम परीक्षा देणार असतील तेसुद्धा या परीक्षेला बसू शकतात. मात्र पदवी परीक्षेत ५० टक्के गुण मिळाले नाही तर, त्यांना या परीक्षेत चांगले गुण मिळवूनही काहीही उपयोग होणार नाही.
सीमॅट परीक्षेत कमी गुण मिळाले तरी संबंधित उमेदवारास अनुत्तीर्ण केले जात नाही. ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांमधून मेरिटनुसार सुयोग्य उमेदवार निवडण्याची संधी मान्यताप्राप्त व अधिकृत संस्थेला देणे हा या परीक्षेचा मुख्य हेतू आहे.
अशी असते परीक्षा
या परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असतो. ही ऑनलाइन परीक्षा असून सर्व प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे असतात. पेपरमध्ये
१) क्वांटिटेटिव्ह टेक्निक अॅण्ड डेटा इंटरप्रिटेशन (काठिण्य पातळी – क्वांटिटेटिव्ह टेक्निक (संख्यात्मक किंवा परिणात्मक कल तपासणी तंत्र)- उच्च,
२) डाटा इंटरप्रिटेशन (दिलेल्या माहितीचे विश्लेषन किंवा अर्थउकल)- मध्यम),
३) लॉजिकल रिझिनग (तर्कसंगत कार्यकारणभाव ) – काठिण्य पातळी- मध्यम ते उच्च,
४) लँग्वेज कॉम्प्रिहेंशन(इंग्रजी भाषेचं आकलन)- काठिण्य पातळी- मध्यम, तीन ते चार प्रश्न उच्च काठिण्य पातळीचे विचारले जातात.), आणि जनरल अवेअरनेस (सामान्य अध्ययन)- काठिण्य पातळी- सोपे ते मध्यम श्रेणी ) या चार घटकांवर १०० प्रश्न विचारले जातात. प्रत्येक घटकाचे प्रत्येकी २५ प्रश्न विचारले जातात. या परीक्षेत अचुक उत्तरासाठी चार गुण दिले जातात. चुकलेल्या उत्तरासाठी एक गुण कपात केला जातो.
सीमॅटमध्ये अधिक गुण प्राप्त करायचे असल्यास आतापासूनच दररोज किमान तीन ते चार तास सराव सुरु करणे आवश्यक आहे. या परीक्षेत सर्व प्रश्न सोडवता आले तर उत्तमच आहे. मात्र अचुकतेची खात्री असल्याशिवाय प्रश्न सोडवू नयेत. अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी सर्व प्रश्न सोडवण्याऐवजी अधिकाधिक अचुक प्रश्न वेळेच्या बंधनात सोडवणं आवश्यक ठरतं.
सीमॅटचं महत्व
सीमॅट परीक्षेचे गुण महाराष्ट्रातील सर्व खासगी संस्था त्यांच्या अखिल भारतीय स्तरावरील राखीव कोटय़ातील जागा भरण्यासाठी ग्राह्य धरतात. या विद्यार्थ्यांना कॅप राऊंडमधून एमएमएस/एमबीए अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेश दिला जातो. महाराष्ट्रातील संस्था त्यांच्या पीजीडीएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पहिल्या टप्याच्या (मुलाखत/समूह चर्चा) निवडीसाठी हे गुण ग्राह्य धरतात. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, हरयाणा, कर्नाटक आदी १३ राज्यातील विद्यापीठे कॅट- कॉमन अॅडमिशन टेस्टच्या गुणांसोबतच सीमॅटचेही गुण ग्राह्य धरतात. कॅट नंतरची ही देशातील दुसऱ्या क्रमाकांची सर्वात मोठी व महत्वाची परीक्षा समजली जाते. दरवर्षी साधारणत: साठ हजारच्या आसपास विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. कॅट, झेवियर अॅडमिशन टेस्ट- झॉट, सिॅम्बायसिस नॅशनॅल अॅप्टिटयूड टेस्ट – स्नॅप यांसारख्या परीक्षांमध्ये चांगले गुण मिळू शकले नाही तर सीमॅट परीक्षेतील गुणांवरही विद्यार्थ्यांना बऱ्यापकी चांगल्या संस्थामधील एमबीए किंवा पीजीडीएमला प्रवेश मिळणे सुलभ जाऊ शकते.
तयारीसाठी साहाय्य
या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी नॅशनल टेिस्टग एजन्सी मार्फत प्रत्येक महिन्याला एक मॉक – प्रतिरुप सीमॅट चाळणी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. ही परीक्षा दिल्याने या परीक्षेचे स्वरुप, काठिण्य पातळी याची कल्पना संबंधित उमेदवारांना येऊ शकते. या शिवाय संगणकाचे स्क्रीन, पेपरची मांडणी आणि माऊसद्वारे पेपर साडवण्याचा सराव होऊ शकतो. या मॉक टेस्ट देण्यासाठी नॅशनल टेिस्टग एजन्सीद्वारे देशभरात विविध शहरांमध्ये सीमॅट चाळणी केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. या केंद्रावर नोंदणी केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला कॉम्प्युटर टर्मिनल दिला जाईल. http://www.nta.ac.in या संकेतस्थळावर आणि ठळअ र३४ीिल्ल३ या अॅपवरसुद्धा ही सोय उपलब्ध करुन दिली जाईल. त्याला गुगल प्लेस्टाअर जाऊन हा अॅप डाऊनलोड करावा लागेल. संकेतस्थळावर जाऊन संबंधित उमेदवारास मॉक टेस्टसाठी नोंदणी करावी लागेल. ही मॉक टेस्ट उमेदवार कितीही वेळा देऊ शकतो. पहिली मॉक टेस्ट संपली की त्याला दुसऱ्या मॉक टेस्टची तारीख निवडावी लागेल. टेस्ट प्रॅक्टिस सेंटरवर शनिवारी दुपारी अडीच ते संध्याकाळी साडेपाच आणि रविवारी सकाळी अकरा ते दुपारी दोन आणि दुपारी अडीच ते संध्याकाळी साडेपाच अशा दोन सत्रात घेतली जाईल.
९० टक्केच्यावर पर्सेटाईल स्वीकारणारी महाविद्यालये
१) यंदा सिडनहॅम इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॅण्ड रिसर्च अॅण्ड आंत्रप्रिन्युरशीप एज्युकेशन या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेतील अखिल भारतीय कोटय़ातील २७ जागा ९९.९९ ते ९९.९६ या पर्सेटाईलमध्ये भरल्या गेल्या आहेत. या विद्यार्थ्यांना कॅप राऊंडमधून एमएमस आणि पीजीडीएम या अभ्यासक्रमांना थेट प्रवेश देण्यात आला. (२) के.जे.सोमय्या इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॅण्ड रिसर्च मुंबई या संस्थेत ९९.९९ ते ९९.९८ या पर्सेटाईलमधील विद्यार्थ्यांना कॅप राऊंडमधून एमएमएस अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात आला.
३) वेलिंगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च या संस्थेतील १८ जागा ९९.९९ ते ९९.९३ या पर्सेटाईलमध्ये भरल्या गेल्या आहेत.
४) डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्स, युनिव्हर्सटिी ऑफ पुणे या संस्थेतील २७ जागा ९९.९६ ते ९९.६३ या पर्सेटाईलमध्ये भरल्या गेल्या आहेत.
उपरोक्त नमूद संस्थांच्या अखिल भारतीय कोटय़ातील जागांसाठी कॅट आणि सीमॅटचे गुण ग्राह्य धरले जातात. तथापी कॅटमध्ये ९९ पर्सेटाईल असणारे विद्यार्थी हे आयआयएम व इतर टॉपच्या संस्थामध्ये प्रवेश मिळवतात. त्यामुळे सीमॅटमध्ये इतके पर्सेटाईल महाराष्ट्रातील प्रमुख संस्थांमध्ये थेट प्रवेशासाठी उपयुक्त ठरतात, हे स्पष्ट व्हावं.
५) ग्रेट लेक्स इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, चेन्नई- ९५,
६) इन्स्टिटय़ूट फॉर फायनान्शिअल मॅनेजमेंट रिसर्च चेन्नई- ९०,
७) गोवा इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट गोवा – ९३,
८० टक्केच्या वर पर्सेटाईल स्वीकारणारी महाविद्यालये
एसआयईएस कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई- ८४, इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक एंटरप्राईज हैदराबाद- ८०, जयपुरा इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट,लखनौ – ८०, इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझिनेस अॅण्ड मीडिआ पुणे – ८०, आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स- ८०, झेवियर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट बेंगळुरु – ८०
७० टक्केच्या वर पर्सेटाईल स्वीकारणारी महाविद्यालये
आयईएस मॅनेजमेंट कॉलेज अॅण्ड रिसर्च सेंटर मुंबई – ७०, एससीएमएस स्कूल ऑफ बिझिनेस कोचीन – ७० , इंटरनॅशल स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज – ७०
संपर्क – सी २०, १ ए/८, सेक्टर ६२, आयआयटी-के आउटरिच सेंटर, नॉयडा- २०१३०९,
संकेतस्थळ – nta.ac.in/Managementexam