केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संस्था, लखनौ

लखनौ येथे स्थित असलेली सेन्ट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिसिनल अ‍ॅण्ड अरोमॅटिक प्लँट्स (सीआयएमएपी) म्हणजेच केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संस्था ही देशातील एक महत्त्वाची संशोधन संस्था आहे. औषधी व सुगंधी वनस्पतींचे संशोधन व तंत्रज्ञान निर्मिती करणारी ही देशातील एकमेव संस्था आहे. तिचे मुख्यालय लखनौ शहरात आहे. तर चार विस्तार केंद्र आहेत. ती अनुक्रमे बेंगळूरु, हैदराबाद, पंतनगर आणि पुरारा (बागेश्वर, उत्तराखंड) या शहरांमध्ये स्थित आहेत.

chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
artificial intelligence to develop ability to create substances with specific qualities
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतून हव्या त्या गुणधर्मांचा पदार्थ
maharashtra pollution control board to submit report to ngt on noise pollution
सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे
New Spider Species Baner Hill, Baner Hill,
कोळ्याच्या नवीन प्रजातीचा बाणेर टेकडी येथे शोध, काय आहे वेगळेपण?
nisargalipi pot gardening
निसर्गलिपी : हंडीतली बाग

*    संस्थेविषयी

केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संस्था या संशोधन संस्थेची स्थापना १९५९ साली झालेली आहे. सुरुवातीला सेन्ट्रल इंडियन मेडिकल प्लँट्स ऑर्गनायझेशन (सीआयएमपीओ) या नावाने स्थापन झालेली ही संस्था तेव्हा फक्त औषधी वनस्पतींच्या संशोधनामध्ये कार्यरत होती. काही कालावधीनंतर संस्थेने सुगंधी वनस्पतीसंबंधित संशोधन सुरू केले. त्यामुळे या दोन्ही बाबींना एकत्रित करून संस्थेचे नाव बदलून ते सेन्ट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिसिनल अ‍ॅण्ड अरोमॅटिक प्लँट्स (सीआयएमएपी) असे करण्यात आले. केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संस्था ही वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेशी (सीएसआयआर) संलग्न आहे. संस्था आपल्या संशोधन विषयांतील उच्च दर्जाच्या संशोधनाबरोबरच औषधी आणि सुगंधी वनस्पतींचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना विस्तारित तंत्रज्ञान आणि सेवा पुरवते आहे. औषधी आणि सुगंधी वनस्पतींचे उत्पादन एकाच वेळी देशातील वेगवेगळ्या ठिकाणी तिथल्या हवामानाच्या अंदाजानुसार घेता यावे व त्यातून या विषयांतील अभ्यास व संशोधनास चालना मिळावी या हेतूने संस्थेने आपली विस्तार केंद्रे देशातील वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन केली आहेत. गेल्या पन्नासपेक्षा अधिक वर्षांमध्ये सीआयएमएपीने देशांतर्गत तसेच देशाबाहेरसुद्धा आपले पंख विस्तारले आहेत. संस्थेने मलेशियाबरोबर वैज्ञानिक आणि संशोधन सहकार्यात्मक करार केलेला आहे. सीआयएमएपीने औषधी आणि सुगंधी वनस्पतीशी संबंधित तंत्रज्ञानाच्या संशोधन, विकास आणि व्यवसायीकरणामध्ये भारत आणि मलेशिया यांच्यातील द्विपक्षीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी दोन करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये औषधी आणि सुगंधी वनस्पतींमधील संशोधनाच्या माध्यमातून सीआयएमएपीने  दिलेले योगदान सर्वज्ञात आहे.

*    संशोधनातील योगदान

देशातील सुगंधी व औषधी वनस्पतींवर संशोधन करणे आणि तत्सम कामाचे समन्वय व एकत्रीकरण यासाठी त्वरित गरजांची पूर्तता करणे यासाठी सीआयएमएपी भारतीय कृषी संशोधन परिषद, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, ट्रॉपिकल स्कूल ऑफ मेडिसिन तसेच केंद्र सरकारबरोबर विज्ञान व औद्योगिक संशोधन परिषदेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांसह आपले संशोधन कार्य करत आहे. सीआयएमएपीने विकसित केलेल्या आणि लोकप्रिय झालेल्या पुदिन्याच्या विविध प्रजातींमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला पुदिना व त्याच्याशी संबंधित औद्योगिक उत्पादनांमध्ये जागतिक आघाडी मिळवून दिली. सीआयएमएपीने आतापर्यंत अनेक औषधी व सुगंधी वनस्पती विकसित केल्या आहेत. या सर्व प्रजाती विकसित करत असतानाच संस्थेने त्या वनस्पतींची लागवड, संपूर्ण शेती-तंत्रज्ञान आणि वनस्पतीच्या उत्पादनानंतर कापणी व तत्सम इतर प्रक्रियांवर प्रचंड संशोधन करून मुबलक स्रोत उपलब्ध व प्रकाशित केले ज्यामुळे या क्षेत्रातील देशाच्या व्यावसायिक व आर्थिकपरिस्थितीमध्ये निश्चितच क्रांती घडलेली आहे. संस्था सध्या आपल्या संशोधन क्षेत्रातील अ‍ॅग्रिकल्चर, जेनेटिक्स अ‍ॅण्ड प्लँट ब्रीिडग, मॉलिक्युलर टॅक्सॉनॉमी, मॉलिक्युलर अ‍ॅण्ड स्ट्रक्चरल बायोलॉजी, प्लँट बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, बायो एनर्जी, केमिकल सायन्सेस इत्यादी विषयांवरती विपुल संशोधन करत आहे. तसेच संस्थेने अनेक हर्बल उत्पादनांची निर्मितीही केली आहे. संस्थेने नॅशनल जीन बँक ऑफ मेडिकल अ‍ॅण्ड अरोमॅटिक प्लँट्स म्हणजे सुगंधी व औषधी वनस्पतींच्या जनुकांची राष्ट्रीय बँकेची स्थापना केलेली आहे. तसेच सीड, टिश्यू आणि डीएनए बँकांची सुविधाही संस्थेमध्ये तयार करण्यात आलेली आहे.

*    विद्यार्थ्यांसाठी संधी

सीआयएमएपीमध्ये शास्त्रज्ञ आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांशिवाय सध्या पीएच.डी.चे संशोधन करणारे संशोधक विद्यार्थी आहेत. कुशल मनुष्यबळाच्या जोरावर सीआयएमएपी परदेशातील अनेक खासगी उद्योगांना वैज्ञानिक व संशोधन सेवा पुरवते. सीएसआयआरच्या मार्गदर्शनानुसार संस्थेने आंतरविद्याशाखीय संशोधनाला (Interdisciplinary research) नेहमीच चालना दिलेली आहे. जीवशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांसह संस्थेच्या संशोधन क्षेत्रांतील विषयांमध्ये बहुविद्याशाखीय (Multidisciplinary) संशोधन चालते. चांगल्या आणि दर्जेदार संशोधनासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा आणि जागतिक विद्यापीठांच्या तोडीचा अनुभवी संशोधक-प्राध्यापकवर्ग या बहुमोल गोष्टी संशोधक विद्यार्थ्यांना इथे मिळतात. संस्थेने आपल्या संशोधन विषयांतील अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्सचे सदस्यत्व घेतलेले आहे.

*    संपर्क 

केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संस्था (सीआयएमएपी),

लखनौ, उत्तर प्रदेश – २२६०१५

दूरध्वनी  ९१-५२२ २७१९० ८३.

ई-मेल  director@cimap.res.in

संकेतस्थळ  http://www.cimap.res.in/