सुनील शेळगावकर

व्याकरणकार कृष्णशास्त्री गोडबोले म्हणतात; परभाषा शिकण्यासाठी स्वभाषेचे व्याकरण उपयोगी पडते. मराठी भाषेचे व्याकरण अवगत झाल्यास इंग्रजीचे व्याकरण सहज शिकता येईल, म्हणून लेखास इंग्लिश-मिग्लिश हे शीर्षक दिले आहे.

Education Institute Quality, Education Institute ,
अशा वातावरणात कशी वाढणार शिक्षणाची गुणवत्ता?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
article about social and political polarization facing by american media
वृत्तवाळवंट सुफलाम करण्यासाठी…
foreign universities loksatta news
दूरदेशीच्या ज्ञानवाटा: देशोदेशीच्या प्रवेश परीक्षा
CM Devendra Fadnavis Nagpur Interview
Devendra Fadnavis : कठोर राजकारणी कोण मोदी की अमित शाह? देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं?
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “मागच्या दहा वर्षांत २०१९ हे वर्ष आलंच नसतं तर…”
committee has been formed under chairmanship of sub-divisional officer of Daryapur to investigate after Kirit Somaiyas allegations
किरिट सोमय्यांच्‍या आरोपानंतर खळबळ… अमरावतीत आता बांगलादेशींच्या…
neet pg 2024 percentile reduced to 15 percent
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पात्रता निकष शिथिल, पर्सेंटाईल १५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा राष्ट्रीय परीक्षा मंडळाचा निर्णय

लिपिक व टंकलेखक, कर सहायक, उपनिरीक्षक उत्पादनशुल्क या पदांसाठीच्या परीक्षेतील अनिवार्य पेपर क्र. एक (मुख्य परीक्षा) यातील इंग्रजी या घटकावर आपण चर्चा करू.

परीक्षा योजनेचा विचार करता परीक्षेत एक प्रश्न एक गुणास आहे. मराठी विषयांच्या प्रश्नापेक्षा इंग्रजीच्या प्रश्नांची काठिण्यपातळी जास्त असणार आहे. कारण मराठीचा प्रश्नदर्जा बारावी आहे, तर इंग्रजीचा प्रश्नदर्जा पदवी आहे..

*   अभ्यासक्रम –

Common Vocabulary ( (सर्वसामान्य शब्दसंग्रह) Sentence Structure (वाक्यरचना), Grammar  (व्याकरण) Use of Idioms and Phrases and their meaning (म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ व वाक्यातील उपयोग), Comprehension of Passage (उताऱ्यावरील प्रश्न).

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विषयांचा अभ्यासक्रम या परीक्षेसाठी तंतोतंत सारखा दिला आहे, पण प्रश्नांच्या दर्जात फरक राहील असे सूचित केले आहे! मराठीची प्रश्नसंख्या साठ इतकी आहे, तर इंग्रजीची प्रश्नसंख्या चाळीस इतकी आहे.

*  अभ्यासक्रमातील घटक व उपघटक :

Common Vocabulary – या घटकांतर्गत पुढील उपघटकांचा समावेश होतो  Words often confused, one word substitution, synonyms, Antonyms, formation of words, spelling of words, cries of Animals, words that go in pairs, Homonyms, foreign words and phrases, diminutives etc.

Sentence Structure – या घटकांतर्गत पुढील उपघटकांचा समावेश होतो – Tranformation of sentences –

2     Interchanging of the sentences:

Affirmative and Negative

Assertive and Interrogative.

Exclamatory and Assertive etc.

2     Interchanging the Degree of comparison :  Superlative, comparative, positive degree

2     Different ways of expressing condition.

2     Different ways of expressing a concession or contrast.

2     The substitution of one part of speech for another.

2     Conversions of sentence to simple, complex and compound sentences. (Clause)

Synthesis of sentences – Combining two or more sentences.

2     By using preposition with a gerund or a noun or by using prepositional phrase.

2     By using participle

2     By using the nominative absolute construction etc.

2     By using the conjunctions, relative pronoun, adverb etc.

2     By using various types of clauses.

यासारख्या व्याकरणीय अभ्यासाचा या घटकांतर्गत समावेश होतो.

वरील उपघटक वाचल्यानंतर इंग्रजीची मनात भीती बसल्यास त्याचा मराठीतून अर्थ समजून घ्या. सदरील घटक मराठी व्याकरणासाठी अभ्यासा. या घटकांचे मराठी व्याकरणाशी साम्य-भेद लक्षात घेऊन स्वत:च्या अभ्यासाची दिशा ठरवा.

Grammar- या घटकांतर्गत पुढील उपघटकांचा समावेश होतो.

2     Parts of Speech : The Nouns (Gender, Number, Case) Verbs : (Conditionals, forms, agreements, moods).

2  Tenses

2  Articles

2  Direct and Indirect speech.

2   Active voice and Passive voice

2   Question Tag etc.

Comprehension of passage  – फक्त इंग्रजी भाषेतून दिलेल्या एका उताऱ्यावरील पाच वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे आपणांस द्यावी लागतात. हा उतारा पदवी दर्जाचा अभ्यासक्रम असल्यामुळे थोडा कठीण आणि कमी शब्दांचा असण्याची शक्यता संभवते. ( वरील उपघटक हे सर्वसमावेशक विश्लेषणासाठी दिले आहेत. अधिक अभ्यासासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून उप-घटक निश्चिती आणखी चांगल्या प्रकारे व वैयक्तिक पातळीवर करता येईल.)

*   अभ्यास पद्धती – माझ्या मते अभ्यासपूर्व नियोजन खूप महत्त्वाचे आहे. इंग्रजी हा विषय अवघड भासत असल्यास सर्वप्रथम अभ्यासक्रमातील घटक व उपघटक समजून घ्या. नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे प्रश्नप्रकार अभ्यासा. Common vocabulary हा घटक रोजच्या रोज समजून घेणे व पाठांतरासाठी ठेवा. हा भाग पहिल्यांदा टॉपिकनुसार समजून घ्या. पहिलया टॉपिकचा अभ्यास करून व सरावाचे प्रश्न सोडवून झाल्याशिवाय नवीन टॉपिक अभ्यासाला घेऊ नका. शेवटी entence Structure हा टॉपिक अभ्यासायला घ्या. परीक्षेच्या पुढे-पुढे रोज दोन इंग्रजी उतारे सोडविण्याचा सराव वेळ न लावता सुरू करा. उतारे सोडविण्याची तुमची शैली विकसित झाल्यास घडय़ाळी वेळ लावून उतारे सोडवा. उताऱ्यांचे योग्य आकलन होण्यासाठी इंग्रजी ‘शब्दधन’ वाढवा.

*   अभ्याससाहित्य  – इंग्रजी व्याकरणासाठी पॉल आणि सुरी तसेच व्रेन अ‍ॅण्ड मार्टनि ही पुस्तके पिढय़ान्पिढय़ा वापरली जातात. यात समृद्ध Common vocabulary सुद्धा आढळते. ही पुस्तके आकलनास जड जात असल्यास मराठीतील इंग्रजी पुस्तक कोणत्याही लेखकाचे घ्या. परंतु त्यातील छपाईच्या झालेल्या चुका लक्षात घेऊन अभ्यासपद्धती ठरवा.

*    व्यूहरचना – पहिल्यांदा किमान गुण घेण्यासाठीचा अभ्यास करा. नंतर कोणत्या घटकात आपणांस जास्त गुण मिळविणे सोपे आहे ते पाहा व शेवटी न जमणाऱ्या घटकांशी संवाद साधा.

मराठी व्याकरणाशी इंग्रजी व्याकरणाचा मेळ घालून अभ्यास करा. यश तुमचेच असेल!

Story img Loader