योगेश बोराटे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
संस्थेची ओळख – भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इंग्रजांनी सुरू केलेल्या विद्यापीठांपकी मद्रास विद्यापीठ हे आणखी एक. जॉर्ज नॉर्टन यांच्या अध्यक्षतेखाली १८४० मध्ये विद्यापीठ मंडळ स्थापन झाले, त्यानंतर १४ वर्षांनी ५ सप्टेंबर १८५७ रोजी मद्रास विद्यापीठाची कायदेशीर स्थापना झाली. लंडन युनिव्हर्सटिीच्या धर्तीवर या विद्यापीठाची रचना करण्यात आली. मद्रास विद्यापीठ ही दक्षिणेकडील बहुतांश जुन्या विद्यापीठांची मातृसंस्था आहे. अलीकडेच विद्यापीठाचे कार्यक्षेत्र तमिळनाडूतील चेन्नई, थिरुवल्लूर व कांचीपुरम या तीन जिल्ह्य़ांपुरते मर्यादित करण्यात आले आहे. ‘नॅक’ या विद्यापीठाला ‘ए’ दर्जा दिला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील ‘युनिव्हर्सटिी विथ पोटेन्शिअल फॉर एक्सेलेन्स’ म्हणूनही या विद्यापीठाला गौरवले आहे. शैक्षणिक संस्थांच्या राष्ट्रीय पातळीवरील मूल्यांकनामध्ये यंदा हे विद्यापीठ देशभरातील विद्यापीठांमध्ये अठराव्या स्थानी आहे.
संकुले आणि सुविधा – मद्रास विद्यापीठाचे कामकाज एकूण सहा संकुलांमधून चालते. त्यापकी चेन्नईमधील चेपॉक परिसरात असलेल्या संकुलामधून विद्यापीठाचे मुख्य प्रशासकीय कामकाज चालते. विद्यापीठाच्या गुंडी येथील संकुलामध्ये विज्ञानाच्या विविध विषयांना वाहिलेले बहुतांश विभाग चालतात. तारामणी हाऊस परिसरातील संकुलामध्ये आरोग्यशास्त्राशी निगडित अध्यापन आणि संशोधन कार्य चालते. मरिना परिसरातील संकुलामध्ये भारतीय भाषांचे शिक्षण, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठीची वसतिगृह आणि विद्यापीठाच्या अतिथीगृहाच्या सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या विभागांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विभागीय ग्रंथालयांच्या जोडीने विद्यापीठाने या चारही संकुलांमध्ये स्वतंत्र ग्रंथालयांच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय चेटपेट आणि मदुरव्हॉयल संकुलांमध्येही विद्यापीठाने अनुक्रमे क्रीडा, शिक्षण आणि वनस्पतिशास्त्र उद्यानाच्या सुविधा विकसित केल्या आहेत. विद्यापीठाच्या सर्व संकुलांमध्ये विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट सेंटरच्या सुविधा उपलब्ध आहेत. गरजू विद्यार्थ्यांना विद्यापीठाने वसतिगृहाच्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. चेपॉक, मरिना, गुंडी आणि तारामणी संकुलांमध्ये या सुविधा उपलब्ध आहेत. चेपॉक, गुंडी आणि तारामणी संकुलांमध्ये विद्याíथनींसाठी, तर मरिना, गुंडी आणि तारामणी संकुलांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अशा एकूण सहा वसतिगृहांच्या सुविधांचा लाभ विद्यार्थी घेऊ शकतात.
दूरस्थ शिक्षणासाठी कार्यरत असलेला स्वतंत्र विभागही या विद्यापीठाचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ ठरते. विद्यापीठ गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ या विभागाच्या माध्यमातून दूरशिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. सध्या या विभागामार्फत २२ पदवीपूर्व, १४ पदव्युत्तर अभ्यासक्रम, ९ पदव्युत्तर शास्त्र अभ्यासक्रम, ५ व्यावसायिक अभ्यासक्रम, १६ पदविका, तसेच १२ प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविले जात आहेत.
विभाग आणि अभ्यासक्रम
विद्यापीठामध्ये १८ स्कूल्समधून पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधनाला वाहिलेले ८७ विभाग विभागण्यात आले आहेत. त्यामध्ये हिस्टॉरिकल स्टडिज, सोशल सायन्सेस, पॉलिटिकल अॅण्ड इंटरनॅशनल स्टडिज, इकोनॉमिक्स, इन्फम्रेशन अॅण्ड कम्युनिकेशन स्टडिज, फिलॉसॉफी अॅण्ड रिलिजियस थॉट्स, फाइन अॅण्ड परफॉर्मिग आर्ट्स, इंग्लिश अॅण्ड फॉरेन लँग्वेजेस, बिझनेस अॅण्ड मॅनेजमेंट स्टडिज, मॅथेमॅटिक्स- स्टॅटिस्टिक्स अॅण्ड कॉम्प्युटर सायन्स, तमिळ अॅण्ड अदर द्रविडियन लँग्वेजीस, संस्कृत अॅण्ड अदर इंडियन लँग्वेजीस, अर्थ अॅण्ड अॅटमॉस्फेरिक सायन्सेस, केमिकल सायन्सेस, फिजिकल सायन्सेस, लाइफ सायन्सेस, बेसिक मेडिकल सायन्सेस, नॅनो सायन्स अॅण्ड फोटोनिक्स, फिजिकल एज्युकेशन अॅण्ड स्पोर्ट्स या स्कूल्सचा समावेश होतो. त्याआधारे चालणाऱ्या विभागांमधून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी, संशोधनासाठीचे एमफिल आणि पीएचडी अभ्यासक्रम चालतात. त्याशिवाय अनेक विभागांमधून पदव्युत्तर पदविका, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमही चालवले जातात.
* स्कूल ऑफ सोशल सायन्सेसच्या अंतर्गत सेंटर फॉर सायबर फॉरेन्सिक अॅण्ड इन्फम्रेशन सिक्युरिटी आणि काऊन्सेिलग सायकॉलॉजी हे दोन वेगळे विभाग चालतात. त्यामध्ये विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.
* स्कूल ऑफ पॉलिटिकल अॅण्ड इंटरनॅशनल स्टडिजच्या अंतर्गत यूजीसी सेंटर फॉर साऊथ अॅण्ड साऊथ ईस्ट एशियन स्टडिजची निर्मिती करण्यात आली आहे.
* स्कूल ऑफ बिझनेस अॅण्ड मॅनेजमेंट स्टडिजच्या अंतर्गत सेंटर फॉर इन्फ्रास्ट्रक्चरल मॅनेजमेंट स्टडिज हे वेगळे केंद्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.
* स्कूल ऑफ अर्थ अॅण्ड अॅटमॉस्फेरिक सायन्सेसच्या अंतर्गत सेंटर फॉर नॅचरल हझार्ड्स अॅण्ड डिझास्टर स्टडिज, तसेच सेंटर फॉर वॉटर रिसोर्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
* स्कूल ऑफ नॅनोसायन्सेस अॅण्ड फोटोनिक्सच्या अंतर्गत नॅशनल सेंटर फॉर अल्ट्राफास्ट प्रोसेसेस आणि नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्स अॅण्ड नॅनो टेक्नॉलॉजी ही दोन स्वतंत्र केंद्रे चालतात.
* अण्णा सेंटर फॉर पब्लिक अफेअर्स विभागांतर्गत पोस्ट मॉडर्न डेव्हलपमेंट अॅडमिनिस्ट्रेशन या विषयामधील पाच वर्षांचा इंटिग्रेटेड एम. ए. अभ्यासक्रम चालतो. तसेच पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन आणि पब्लिक अफेअर्स या दोन विषयांमधील दोन वर्षांचे एम. ए. अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत.
* क्रिमिनोलॉजी विभागांतर्गत एम. एस्सी. क्रिमिनॉलॉजी अॅण्ड क्रिमिनल जस्टिस सायन्स या विषयातील एम. एस्सी. अभ्यासक्रम चालतो. शिक्षणशास्त्र विभागांतर्गत पॅरेन्ट काऊन्सेिलग या विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. प्रौढ आणि निरंतर शिक्षण विभागांतर्गत ब्लॉिगग, टीव्ही न्यूज रीडिंग अॅण्ड कॉम्पेरिंग, वेबपेज डिझाइन, एनजीओ मॅनेजमेंट आदी विषयांमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविले जातात. ख्रिश्चन स्टडिज विभागांतर्गत एम. ए., एम. फिल., पदव्युत्तर पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. मेडिकल बायोकेमिस्ट्री विभागामध्ये त्याच विषयामधील एम. एस्सी. अभ्यासक्रम चालतो. याशिवाय विद्यार्थ्यांना पारंपरिक मार्गानी शिक्षण घेण्याची संधीही हे विद्यापीठ देते.
borateys@gmail.com