आपल्या देशात व्यवस्थापन शाखेतील सर्वोत्कृष्ट शिक्षण, प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास चालना देणारी संस्था म्हणजे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट. व्यवस्थापनविषयक शिक्षण देणाऱ्या जगातील उत्कृष्ट संस्थांमध्ये भारतातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (अहमदाबाद/ बेंगळुरु/ कोलकाता) या संस्थेचा समावेश होतो. अभियांत्रिकीमधील दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण-प्रशिक्षणासाठी जसे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीने आपले महत्त्व अधोरेखित केले आहे, तद्वतच व्यवस्थापन शाखेच्या क्षेत्रात इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेने आपला दबदबा निर्माण केला आहे. या संस्था जरी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असल्या तरी, त्यांना स्वायतत्ता प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे अभ्यासक्रमांची संरचना ठरवणे, शुल्क आकारणी, पदवी, पदविका प्रदान करणे याबाबत या संस्था पूर्णपणे स्वातंत्र्य घेऊ शकतात. त्यामुळेच या संस्था जगातील काही प्रमुख संस्थांशी स्पर्धाही करतात किंवा त्यांच्यापेक्षा वरचढ ठरतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
* दर्जेदार करिअरचा प्रारंभिबदू
या संस्थेतील प्रवेश म्हणजे दर्जेदार करिअरचा प्रारंभिबदूच ठरतो. या संस्थेतील विद्यार्थ्यांना देश-विदेशातील अनेक नामवंत कंपन्या, कॉर्पोरेट हाऊसेस येथे वरिष्ठ स्तरावरील पदे सहजगत्या मिळू शकतात. शिवाय काही वर्षांच्या अनुभवानंतर वरच्या श्रेणीची पदेही लवकर मिळू लागतात. त्यामुळेच दरवर्षी ५ लाखांहून अधिक विद्यार्थी या संस्थेमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न करतात.
संस्थेचे (१) अहमदनगर (२) अमृतसर
(३) बेंगळुरु (४) बोधगया (५) कोलकाता (६) इंदौर (७) जम्मू (८) काशिपूर (९) कोझिकोड (१०) लखनौ (११) नागपूर (१२) रायपूर (१३) रांची (१४) रोहतक (१५) सोलापूर (१६) शिलाँग (१७) शिरमूर (१८) तिरुचिरापल्ली (१९) उदरपूर (२०) विशाखापट्टणम् अशा २० ठिकाणी कॅम्पसेस आहे. तिथे १० हजारांहून अधिक जागा भरल्या जातात. त्यासाठी अखिल भारतीय स्तरावर, कॉमन एंट्रस टेस्ट (कॅट) घेतली जाते.
यंदा ही चाळणी परीक्षा दिनांक २५ नोव्हेंबर, २०१८ रोजी देशभरातील १४५ शहरांमध्ये घेतली जाईल. या महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अमरावती, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, नांदेड, नाशिक, सातारा, नाशिक, सोलापूर, रायगड आणि नागपूर या केंद्रांवर घेतली जाईल. या परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया ८ ऑगस्टपासून सुरू झाली असून १९ सप्टेंबर २०१८ ला ही प्रक्रिया संपेल.
* प्रवेश प्रकिया
कॅटमध्ये मिळालेल्या गुणांचा आधार घेऊन प्रत्येक आयआयएम ही स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया राबवत असते. कॅटमध्ये मिळालेल्या गुण आणि आयआयएमचा पसंतीक्रम लक्षात घेऊन गुणवत्ता यादी तयार केली
जाते. या यादीतील विद्यार्थ्यांना समूह चर्चा आणि मुलाखती, लेखन कौशल्यचाचणी (रायटिंग अॅबिलिटी टेस्ट) साठी बोलावण्यात यते. त्यानंतर कॅट परीक्षेत मिळालेले गुण, समूहचर्चा, मुलाखतीतील गुण, दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेतील गुण, अनुभव, जेंडर (स्त्री/पुरुष), इतर कामगिरीसाठी राखून ठेवण्यात आलेले गुण अशा बाबींवरील गुण एकत्र करून एका विशिष्ट सूत्रानुसार पस्रेटाईल काढले जाते व त्यानंतर अंतिम यादी तयार केली जाते. या सर्व बाबींमधून व्यवस्थापन शाखेकडचा विद्यार्थ्यांचा कल व त्यासाठी लागणारी कौशल्ये जोखली जातात. केवळ कॅटमध्ये खूप गुण मिळाल्याने प्रवेश निश्चित होत नाही, ही बाब ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.
* राखीव जागा
सर्व आयआयएममध्ये शासकीय नियमानुसार अनुसूचित जाती संवर्गासाठी १५ टक्के, अनुसूचित जमाती संवर्गासाठी ७.५ टक्के, नॉन क्रीमीलेअर इतर मागास वर्गासाठी २७ टक्के आणि दिव्यांगांसाठी ५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. केंद्र सरकारच्या यादीतील संवर्गाचा विचार राखीव जागांसाठी केला जातो. ही यादी कॅट २०१८ च्या नोंदणीच्या शेवटच्या दिनांकापर्यंतच ग्राह्य़ धरली जाते. या तारखेनंतर समजा या यादीत बदल झाले तर ते कॅट २०१८ साठी विचारात घेतले जाणार नाहीत.
* अर्हता
कॅट परीक्षेला कोणत्याही विद्याशाखेतील पदवी परीक्षेत ५० टक्के गुण मिळालेला विद्यार्थीही बसू शकतो. यंदा जे विद्यार्थी पदवीच्या अंतिम वर्षांला आहेत तेसुद्धा या परीक्षेला बसू शकतात. तथापि या विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेत ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांचा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना ४५ टक्के गुण मिळायला हवेत.
* अशी असते परीक्षा
ही परीक्षा संगणक आधारित (कॉम्प्युटर बेस्ट) आहे. परीक्षेचा कालावधी तीन तास असून १०० प्रश्न विचारले जातात.
१) या पेपरमध्ये ३ भाग (सेक्शन) असतात. भाग ‘अ’ मध्ये अॅबिलिटी आणि रीिडग कॉम्प्रिटेंशन यावर ३४ प्रश्न आधारित असतात. यापकी २४ ते २७ बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीचे आब्जेक्टिव्ह प्रश्न आणि ७ ते १० सब्जेक्टिव्ह (एक किंवा दोन ओळींत लिहावयाची उत्तरे) प्रश्न विचारले जातात. प्रत्येक अचूक प्रश्नाला ३ गुण दिले जातात. चुकलेल्या उत्तरासाठी १ साठी गुण कपात केला जातो. या भागात १०२ गुणांचे प्रश्न समाविष्ट असतात. सब्जेटिव्ह प्रश्नांचे गुण कपात केली जात नाही.
२) भाग दोनमध्ये डेटा इंटरप्रिटेशन आणि लॉजिकल रिझिनगवर २४ ऑब्जेटिव्ह आणि ८ सब्जेटिव्ह प्रश्न असे एकूण ९६ गुणांचे प्रश्न विचारले जातात.
३) भाग तीनमध्ये क्वांटिटेटिव्ह अॅबिलिटी या घटकावर एकूण ३४ प्रश्नांचा समावेश असतो. यापकी ऑब्जेटिव्ह २३ ते २७ प्रश्न आणि सब्जेटिव्ह ७ ते ११ पर्यंत असे १०२ गुणांचे प्रश्न विचारले जातात.
अभ्यासक्रम – या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम साधारणत: पुढीलप्रमाणे राहील.
१) व्हर्बल अॅबिलिटी (भाषा आकलन कौशल्य) – यामध्ये उताऱ्यावरील प्रश्न, रिकाम्या जागा भरा, वाक्यातील दुरुस्ती, म्हणी, वाक्प्रचार यांचा उपयोग, विरुद्धार्थी, समानार्थी शब्द, जोडय़ा जुळवणे, भाषेच्या अनुषंगाने तर्कसंगत युक्तिवाद आदी घटकांवर प्रश्न विचारले जातात.
२) तर्कसंगत युक्तिवाद (लॉजिकल रिझिनग) – या भागात दिशेची जाणीव, घडय़ाळे, कॅलेंडर्स, कोडी, बसण्याची व्यवस्था, कोिडग आणि डिकोिडग, रक्ताचे नाते, निष्कर्ष, आधारविधान गृहितके, माहितीची संरचना, तर्कसंगत अनुक्रम,ताíककता या घटकांवर प्रश्न विचारले जातात.
३) दिलेल्या माहितीचा अर्थउकल (डेटा इंटरप्रिटेशन) – या भागात आलेख (रेषा, क्षेत्र), टेबल, मजकूर, तक्ता (स्तंभ, बार, पाय) आकृत्या यावर आधारित माहितीचे विश्लेषण व अर्थउकल यावर प्रश्न विचारले जातात.
४) संख्यात्मक कौशल्य (क्वांटिटेटिव्ह अॅबिलिटी) – या भागात संख्याप्रणाली, लसावी, मसावी, टक्केवारी, नफा-तोटा-सूट, सरळव्याज, चक्रवाढ व्याज, गती-वेळ-अंतर, वेळ-काम, सरसरी, गुणोत्तर आणि प्रमाण, रेखीव सूत्रे, व्यामिश्र संख्या, विषमसंख्या, श्रृंखला, द्विपद सिद्धांत, भूमिती, त्रिकोणमिती, मापनपद्धती मिश्रण, समुच्चय सिद्धांत, संभवनीयता आदी घटकांवर प्रश्न विचारले जातात.
दहावी-बारावीपर्यंतच्या शिक्षणातील गणित, भूमिती, बिजगणिताच्या संकल्पना स्पष्ट असल्यास या घटकांमधील प्रश्न सोडवणे सुलभ जाऊ शकते. भाषा विषय कौशल्यचाचणीसाठी इंग्रजीचे भरपूर वाचन, शब्दसंग्रह, व्याकरणाच्या मूलभूत बाबींची स्पष्टता असणे आवश्यक आहे.
हा पेपर वेळ आणि अचूकता यांची परीक्षा घेणारा आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेत अधिकाधिक अचूक प्रश्न सोडवणे अत्यंत आवश्यक आहे. शिवाय या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विभागात स्वतंत्ररीत्या उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. उदा. गेल्या वर्षी साधारणत: सर्वच आयआयएमच्या प्राथमिक निवडीसाठी प्रत्येक विभागात किमान ८० पर्सेटाईल आवश्यक होते. एखाद्या गटात ७८ टक्के पर्सेटाईल असेल. इतर दोन गटांत ९८ पर्सेटाईल असेल तरी प्राथमिक निवडीसाठी असे विद्यार्थी अपात्र समजले जातात.
स्मार्ट शिक्षणाकडे..
गेल्या दशकभरामध्ये शिक्षण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठा वापर होऊ लागला आहे. आता तर यंत्रमानवाचा शिक्षणाच्या प्रक्रियेत समावेश होऊ लागला आहे. पारंपरिक शिक्षकाची जागा या यंत्रमानवाने घेतल्यामुळे शिक्षण अधिक स्मार्ट होईल असा अंदाज अनेकजण व्यक्त करतात, पण तो खोटा ठरवत प्लेमाऊथ विद्यापीठातील संशोधकांनी शिक्षकाची जागा यंत्रमानव घेऊ शकत नाही असा निष्कर्ष काढला आहे. असे असले तरीही अध्ययन – अध्यापनाची परिणामकारकता वाढण्यासाठी यंत्रमानव महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
अमेरिका, जपान, ब्रिटन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, जर्मनी, नेदरलँड, तुर्कस्तान, इराण, स्वित्र्झलड, इस्राएल, स्वीडन, स्पेन, तैवान, इटली, डेन्मार्क आदी प्रगत आणि प्रगतीशील राष्ट्रांनी आपल्या शिक्षण प्रक्रियेत यंत्रमानवांचा वापर करण्यास सुरुवात केली, त्या वेळी विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेत आणि अभ्यासप्रक्रियेत आमूलाग्र बदल झाला. मात्र भावनिकदृष्टय़ा शिक्षकाऐवजी यंत्रमानवाशी जुळवून घेणे विद्यार्थ्यांना तुलनात्मकदृष्टय़ा अवघड ठरते. या अभ्यासानुसार तंत्रज्ञान, विज्ञान, गणित, सांख्यिकी अभ्यास अशा विषयांच्या अध्यापनासाठी यंत्रमानवाचा वापर हा चांगला करता येऊ शकतो. मात्र समाजशास्त्रासारखे विषय शिक्षकांबरोबरील संवादातून पक्के होतात. औपचारिक शिक्षण प्रक्रियेत नुकत्याच आलेल्या मुलांना ‘निओ’सारख्या यंत्रमानवाकरवी दिलेल्या प्रशिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात. मात्र त्यालाही मर्यादा असल्याचे दिसत आहे. यंत्रमानवाचा वापर हा विद्यार्थ्यांना संकल्पना स्पष्ट करून देण्यासाठी उपयुक्त ठरत असला तरी तो शिक्षकांच्या बरोबरीने असावा असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. हा शैक्षणिक बदल प्रयोगापुरता आत्यंतिक आरंभिक अवस्थेत असल्यामुळे सध्या यावर आणखी संशोधन सुरू असून भविष्यात शिक्षकाची जागा यंत्रमानव पूर्ण सक्षमपणे घेऊ शकतील का याचा अभ्यास सुरु झाला आहे. मात्र असे असले तरी शिक्षणतज्ज्ञांमध्ये यावर वेगवेगळे मतप्रवाह आहेत.
संपर्क- संकेतस्थळ – http://www.iimcat.ac.in
हेल्पडेस्क क्रमांक- १८००२०९०८३०
ई-मेल- cathelpdesk@iimcat.ac.in