प्रथमेश आडविलकर

itsprathamesh@gmail.com

Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Science and technology as a tool of power
तंत्रकारण : विज्ञान – तंत्रज्ञानातून सत्तेकडे…
how to use data science properly how to learn data science
कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात : डेटा सायन्स
UGC, recruit professors, Instructions UGC,
आयोगामार्फत प्राध्यापक भरतीस नकार; प्रचलित नियमांनुसारच प्रक्रिया राबवण्याच्या ‘यूजीसी’च्या सूचना
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
wardha deoli Shantanu raut
जगातील बारात ‘हा’ एकमेव भारतीय, नोबेल विजेत्याच्या नावे असलेला फेलोशिप सन्मान पटकावला
Loksatta kutuhal Founder of the Paleontological Institute
कुतूहल: पुराजीवविज्ञान संस्थेचे संस्थापक

द नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन रिसर्च अ‍ॅण्ड इन्फॉम्रेशन रिसोर्सेस, नवी दिल्ली.

राजधानी दिल्ली येथे असलेली द नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन रिसर्च अ‍ॅण्ड इन्फॉम्रेशन रिसोस्रेस (एनआयएससीएआयआर) म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान संचार व सूचना स्रोत संशोधन संस्था ही माहिती विज्ञान या विषयामध्ये संशोधन करणारी संस्था आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) अनेक संलग्न संशोधन संस्थांप्रमाणे एनआयएससीएआयआर हीदेखील एक सीएसआयआरशी संलग्न संस्था आहे.

संस्थेविषयी

संस्थेची स्थापना ३० सप्टेंबर २००२ रोजी झाली. ही संस्था नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन (निस्कॉम -एनआयएससीओएम) आणि इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर (आयएनएसडीओसी) या दोन संस्थांच्या विलीनीकरणातून अस्तित्वात आली. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) च्या या दोन्ही प्रमुख संशोधन संस्थांनी (निस्कॉम आणि आयएनएसडीओसी) या सर्व प्रक्रियेच्या दस्तऐवजीकरणासाठी समíपत होऊन काम केले. निस्कॉम ही सहा दशकांपूर्वी स्थापना झालेली संस्था आहे. सुरुवातीच्या काळात निस्कॉम सीएसआयआरचा प्रकाशन विभाग म्हणून कार्यरत होती. नंतर या विभागाचे नाव पब्लिकेशन्स अ‍ॅण्ड इन्फॉम्रेशन डिरेक्टोरेट असे केले गेले. आणि १९९६मध्ये या संस्थेचे नामकरण निस्कॉम असे झाले. या बदलांसह निस्कॉमने आपल्या कृती व एकूण कार्यक्रमांमध्येसुद्धा विविधता आणली. कालांतराने संस्थेने संशोधन आणि लोकप्रिय विज्ञान पत्रके, विश्वकोश प्रकाशन, मोनोग्राफ, पुस्तके आणि माहिती सेवांचा समावेश असलेल्या अनेक माहिती उत्पादनांद्वारे  संशोधक, विद्यार्थी, उद्योजक, शेतकरी, धोरणकत्रे, नियोजक आणि सामान्य माणसांपर्यंत पोचण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

संशोधनातील योगदान

माहितीविज्ञानामध्ये गेली अनेक वष्रे संशोधन करत असलेली ही संशोधन संस्था जागतिक स्तरावर आपली ओळख टिकवून आहे. आधुनिक संवाद तंत्रज्ञानाचा वापर करून विज्ञान संप्रेषण, प्रसार आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माहिती व्यवस्थापन प्रणाली आणि सेवांसाठी ही संस्था समíपत आहे. पारंपरिक आणि आधुनिक माध्यमांच्या मिश्रणाद्वारे संस्थेचे मूलभूत संशोधन कार्य जसे की माहिती एकत्रित वा संग्रहित करणे, माहितीचा प्रसार करणे  मोठय़ा प्रमाणावर समाजाच्या विविध विभागांना लाभ देतात.

साहित्य संशोधनासारख्या सोप्या विषयापासून ते  विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रकाशन, छपाईपर्यंत ही संस्था विस्तृत माहिती पुरवते. तसेच ग्रंथालय आणि माहिती विज्ञान, दस्तऐवजीकरण, विज्ञान संप्रेषण आणि हर्बरीयम तंत्रज्ञानातील प्रशिक्षणासाठी संस्थेकडे अत्युत्कृष्ट मनुष्यबळ आहे. ही संस्था इतर संस्थांसाठीसुद्धा टर्नकी आधारावर संशोधन प्रकल्प घेते. प्रकल्पाची रचना, विकास आणि ग्रंथालयांचे आधुनिकीकरण, जर्नल्स, पुस्तके, कॉन्फरन्स कार्यवाही, वार्षकि अहवाल इ. सारख्या विविध प्रकाशनांचे संपादन व उत्पादन करणे इत्यादी बाबींचा या प्रकल्पात समावेश आहे. संस्था इ- पब्लिशिंग, एडिटिंग, इंडेक्सिंग, पिट्र अ‍ॅण्ड प्रोडक्शन, हर्बेरियम टेक्निक्स, टेक्सॉनॉमीकल आयडेंटीफिकेशन ऑफ प्लॅंट्स, आयडेंटीफिकेशन ऑफ क्रूड प्लॅंट्स-बेस्ड प्रोडक्ट्स, कंटेंट्स, अ‍ॅबस्ट्रॅक्ट्स अ‍ॅण्ड फोटोकॉपी सर्व्हिस, डॉक्युमेंट कॉपी सप्लाय सर्व्हिस, लिटरेचर सर्च सर्व्हिस, आयएसएसएन, शॉर्ट टर्म कोस्रेस इन सर्व्हिस कम्युनिकेशन, डिजिटल लायब्ररीज, इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड लायब्ररी ऑटोमेशन, ट्रान्सलेशन सíव्हसेस, ट्रेिनग प्रोग्रॅम्स इत्यादी सेवा बहाल केल्या जातात. याव्यतिरिक्त रीडर्स सर्व्हिस, टेक्निकल क्वेअरी सर्व्हिस, कॉिपग सर्व्हिस, इंटर लायब्ररी लोन सर्व्हिस, इ-जर्नल्स अ‍ॅक्सेस, ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी इत्यादी सेवा संस्थेकडून पुरवल्या जातात. संस्थेने प्रकाशित केलेल्या एकूण अठरा जर्नल्स तर तीन लोकप्रिय विज्ञान मासिके विद्यार्थ्यांना संस्थेने सहज उपलब्ध करून दिलेली आहेत.

विद्यार्थ्यांसाठी संधी

सीएसआयआरच्या तत्त्वप्रणालीनुसार एनआयएससीएआयआरमध्ये Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत पदव्युत्तर, पीएच.डी. व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. एनआयएससीएआयआरने विद्यार्थ्यांसाठी ‘इन्फॉम्रेशन सायन्स’ म्हणजेच माहिती विज्ञान या विषयातील एक संशोधन अभ्यासक्रम तयार केलेला आहे. हा अभ्यासक्रम म्हणजे संस्थेची प्रमुख ओळख आहे असे निश्चितच म्हणता येईल. हा अभ्यासक्रम पूर्ण करून संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवा देत आहेत. संस्थेकडून ‘असोसिएटशिप इन इन्फॉम्रेशन सायन्स’ या विषयात पदवी बहाल केली जाते. दरवर्षी विविध शाखांमधील विद्यार्थी त्यांचे पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी. स्तरावरील संशोधन पूर्ण करण्यासाठी संस्थेची मदत घेत असतात.

संपर्क

मुख्य कॅम्पस  – द नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन रिसर्च अ‍ॅण्ड इन्फॉम्रेशन रिसोस्रेस (एनआयएससीएआयआर), डॉ. के. एस. कृष्णन मार्ग, पुसा कॅम्पस, नवी दिल्ली – ११००१२.

दूरध्वनी +९१-२५८४६३०१

सत्संग विहार मार्ग कॅम्पस – द नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन रिसर्च अ‍ॅण्ड इन्फॉम्रेशन रिसोस्रेस (एनआयएससीएआयआर),१४ सत्संग विहार मार्ग, स्पेशल इन्स्टिटय़ूटशनल एरिया, न्यू मेहरोली रोड, नवी दिल्ली – ११००६७.

दूरध्वनी  +९१-२६५६०१४१.

ई-मेल  – director@niscair.res.in

संकेतस्थळ  – http://www.niscair.res.in

Story img Loader