सुरेश वांदिले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नावीन्यपूर्ण अभिकल्प (डिझाइन)चा विचार आणि अशा कल्पना प्रत्यक्षात साकारू शकण्याची क्षमता व कौशल्यप्राप्त केलेल्या उमेदवारांना गेल्या काही वर्षांत करिअरच्या उत्तमोत्तम संधी कॅम्पसच्या माध्यमातून मिळाल्या आहेत.

अहमदाबाद/गांधीनगरस्थित नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन येथे अ‍ॅनिमेशन फिल्म डिझाइन (जागा १५), एक्झिबिशन डिझाइन- (जागा १०), फिल्म अँड व्हिडीओ कम्युनिकेशन डिझाइन (जागा १०), ग्राफिक डिझाइन- (जागा १५), सिरॅमिक अँड ग्लास डिझाइन- (जागा १०), फíनचर अँड इंटेरिअर डिझाइन (जागा १०), प्रॉडक्ट डिझाइन- (१५, टेक्स्टाइल डिझाइन एकूण जागा १५)

या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. या स्पशेलयाझेशनमध्ये बॅचलर ऑफ डिझाइन ही पदवी दिली जाते. एनआयडी कुरुक्षेत्र आणि विजयवाडा येथील कॅम्पसमध्ये इंडस्ट्रिअल डिझाइन, कम्युनिकेशन डिझाइन, टेक्स्टाइल अँड अ‍ॅपेरल डिझाइन या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते.

भोपाळ येथे २०१९च्या शैक्षणिक सत्रापासून  नवे कॅम्पस उघडले जाणार आहे. या कॅम्पसमध्येही इंडस्ट्रिअल डिझाइन, कम्युनिकेशन डिझाइन, टेक्स्टाइल अँड अ‍ॅपेरल डिझाइन या विषयांमध्ये स्पेशलयाझेशन करण्याची सुविधा आहे. या तिन्ही संस्थांतील जागा – प्रत्येकी ६०

*  प्रवेश प्रक्रिया –

या संस्थेतील प्रवेश परीक्षेची प्रक्रिया १ ऑक्टोबर २०१८ सुरू झाली आहे. अर्ज ऑनलाइन  भरावा लागतो. विलंब शुल्कासहित २२ नोव्हेंबपर्यंत अर्ज भरता येऊ शकतो. ६ जानेवारी २०१९ रोजी प्राथमिक परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेचा निकाल १९ मार्च २०१९ रोजी संस्थेच्या संकेतस्थळावर घोषित केला जाईल. १ मे २०१९ रोजी मुख्य परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेचा निकाल ३१ मे २०१९ रोजी संस्थेचा संकेतस्थळावर घोषित केला जाईल.

प्राथमिक परीक्षेसाठी महाराष्ट्रातील केंद्रे- नागपूर आणि मुंबई.

*   अशी असते परीक्षा –

ही परीक्षा डिझाइन अ‍ॅप्टिटयूड टेस्ट (डीएटी) या नावाने ओळखली जाते. त्याचे प्राथमिक आणि मुख्य असे दोन भाग असतात. प्राथमिक परीक्षेच्या पेपरचा कालावधी तीन तास. या पेपरमध्ये १०० गुणांचे प्रश्न विचारले जातील. प्रश्नपत्रिका इंग्रजी भाषेत असेल.

*   प्राथमिक परीक्षा –

या पेपरमध्ये दोन भाग असतात. पहिल्या भागात बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पतीचे ६४ प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांचे सामान्यज्ञान व अवतीभवतीच्या घटनांचे आकलन, तार्किक क्षमता, उताऱ्यावरील प्रश्न, संख्यात्मक चाचणी, आकृत्या, कार्यकारण भाव, तपासण्यासाठी प्रश्नाची रचना केली जाते.

पहिल्या १ ते २४ प्रश्नांना अर्धा गुण, २५ ते ४७ प्रश्नांना एक गुण, ४८ ते ४९ प्रश्नांना दीड गुण, ५० ते ६२ प्रश्नांना दोन गुण, ६३ ते ६४ प्रश्नांना तीन गुण दिले जातात.

भाग दोन हा निबंधात्मक स्वरूपाचा असतो. ६५व्या प्रश्नाला १० गुण, ६६व्या प्रश्नाला १४ गुण आणि ६७व्या प्रश्नाला ६ गुण दिले जातात. या भागात वेगवेगळ्या परिस्थितीचे वर्णन करणारे उतारे दिले जातात. त्यावर आधारित चित्र काढावी लागतात. उमदेवारांच्या चित्रांकनाचे कौशल्य तपासणीसाठी या भागाचा उपयोग केला जातो.

मुख्य परीक्षा – प्राथमिक परीक्षेतील गुणांवर आधारित विशिष्ट संख्येत मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना निवडले जाते. त्या निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी  admissions.nid.edu या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. परीक्षा गांधीनगर/अहमदाबाद किंवा इतर कॅम्पसमध्ये दोन दिवस चालेल. ही चाळणी कॅम्पसमधील स्टुडिओमध्ये घेतली जाते. अभिकल्प शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची कलचाचणी करणाऱ्या विविध प्रकारच्या चाळणीचा यात समावेश असतो. या चाळणीसाठी १०० गुण ठेवण्यात येतात. चाळणी परीक्षेची भाषा इंग्रजी राहील.

 *   गुणवत्ता यादी तयार करण्याची पद्धती

प्राथमिक आणि मुख्य परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित अंतिम निवड केली जाते. प्राथमिक परीक्षेला ३० टक्के वेटेज आणि मुख्य परीक्षेला ७० टक्के वेटेज दिले जाते. प्राथमिक आणि मुख्य परीक्षेला बसलेल्या उमेदवारांचाच विचार अंतिम गुणवत्ता यादीसाठी केला जातो.

प्राथमिक परीक्षेत दोन विद्यार्थ्यांना समान गुण मिळाल्यास अंतिम गुणानुक्रम देताना पुढील कार्यपद्धतीचा अवलंब केला जातो –

(१) प्राथमिक परीक्षेच्या पेपरमधील पार्ट बीमध्ये ज्या विद्यार्थ्यांला अधिक गुण मिळालेले असतील त्याला वरचा क्रमांक दिला जातो.  (२) अशा स्थितीतही दोन्ही उमेदवारांना समान गुण मिळाले असतील तर प्राथमिक परीक्षेतील पार्ट एमध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवारास वरची श्रेणी/गुणानुक्रम दिला जातो. (३) याही स्थितीत दोन्ही उमेदवारांचे समान गुण राहिल्यास दोघांनाही एकच गुणानुक्रम दिला जातो.

प्राथमिक आणि मुख्य परीक्षेतील पेपरच्या पुनर्तपासणीची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाते. एकूण जागांच्या तुलनेत प्रत्येक संवर्गात ३ पट अधिक विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी निवडले जातात.

*  अंतिम गुणवत्ता यादी –

ही यादी प्रत्येक संवर्गनिहाय (खुला/अनुसूचित जाती/जमाती/एनसीएल-ओबीसी/ दिव्यांग) तयार केली जाते. ही यादी तयार करताना प्राथमिक आणि मुख्य परीक्षेतील गुणांचे एकूण वेटेज लक्षात घेतले जाते. अशा पद्धतीने तयार केलेल्या गुणवत्ता यादीत समजा दोन उमेदवारांना समान गुण मिळाल्यास पुढील पद्धतीनुसार अशा उमदेवारांचा गुणानुक्रम ठरविण्यात येतो – (१) मुख्य परीक्षेत दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास मुख्य परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवारास वरचा गुणानुक्रम दिला जातो.(२) या स्थितीतही अनिर्णित अवस्था संपुष्टात आली नाही तर डिझाइन अ‍ॅपिटय़ूड टेस्टच्या पहिल्या टप्प्यात सर्वाधिक गुण मिळालेल्या उमेदवारास वरचा क्रमांक दिला जातो. (३) या स्थितीतही दोन्ही उमेदवारांना समान गुण राहिल्यास ज्या उमेदवाराला प्राथमिक परीक्षेच्या पार्ट बीमध्ये अधिक गुण मिळाले असतील, त्याला वरचा गुणानुक्रम दिला जातो. (४) या स्थितीतही दोन्ही उमेदवारांना समान गुण राहिल्यास ज्या उमेदवाराला प्राथमिक परीक्षेच्या पार्ट एमध्ये अधिक गुण मिळाले असतील त्याला वरचा गुणानुक्रम दिला जातो. (५) या स्थितीतही दोन्ही उमेदवारांना समान गुण राहिल्यास मुख्य परीक्षेतील ज्या प्रश्नांसाठी सर्वाधिक गुण असतील, त्यात सर्वोच्च गुण ज्या उमेदवाराने मिळवले असतील त्याला वरचा गुणानुक्रम दिला जातो. या परीक्षेत मिळालेले गुण एनआयडीच्या परवानगीशिवाय कोणत्याही संस्थेला वापरता येणार नाही.

या परीक्षेत प्रत्येक संवर्गासाठी पुढीलप्रमाणे पात्रता पर्सेटाइल निर्धारित करण्यात आले आहेत.

खुला संवर्ग – ५०, ओबीसी- एनसीएल- ४५, इतर सर्व संवर्ग- ४०.

ओबीसी एनसीएल उमेदवारांना अधिकृत प्रमाणपत्र सादर करता आले नाही तर त्या उमेदवारास मुख्य परीक्षेसाठी खुल्या संवर्गातील समजले जाते. ओबीसी एनसीएल संवर्गातील उमेदवारास प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यातही संबंधित प्रमाणपत्र सादर करता आले नाही, तर त्याचा प्रवेश रद्द केला जातो. ओबीसी एनसीएल संवर्गातील जागा कोणत्याही कारणांमुळे खाली राहिल्यास त्या खुल्या संवर्गाला दिल्या जातात. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील खाली राहिलेल्या जागा तशाच ठेवल्या जातात. अर्जामध्ये ज्या संवर्गात उमेदवाराने नाव नोंदवले असेल तोच संवर्ग शेवटपर्यंत कायम राहतो. त्यात बदल करता येत नाही.

*  संपर्क –

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन पालडी अहमदाबाद- ३८०००७,

ईमेल-  admissions@nid.edu,

प्रवेश प्रक्रिया संकेतस्थळ- http://www.admissions.nid.edu

मुख्य संकेतस्थळ – http://www.nid.edu

एनआयडी विजयवाडा- http://nid.ac.in/