या लेखाद्वारे एमपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेची माहिती आपण करून घेऊयात.
पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालय साहाय्यक पदांकरता परीक्षा स्वतंत्रपणे राबवल्या जातात. या परीक्षांचा पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम आणि मुख्य परीक्षेतील पेपर क्रमांक १चा अभ्यासक्रम सारखाच आहे, परंतु मुख्य परीक्षेतील पेपर क्रमांक २च्या अभ्यासक्रमाचा आकृतिबंध संबंधित पदाच्या जबाबदारीनुसार आणि कामाच्या स्वरूपानुसार वेगवेगळा आखलेला आढळून येतो. विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेतील पेपर क्रमांक २ मध्ये अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर विशेष भर दिल्याचे जाणवते.
मुख्य परीक्षा अभ्यासक्रमाचा आकृतिबंध
आयोगाच्या संकेतस्थळावर मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम सविस्तर दिलेला आहे.
पेपर क्रमांक १ :
मराठी व इंग्रजी अभ्यासक्रम –
सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार, उताऱ्यावरील प्रश्न.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा