SBI Clerk Prelims Result 2022 Out: स्टेट बँक ऑफ इंडियाने एसबीआय क्लर्क प्रीलिम्स २०२२ चे निकाल जाहीर केले आहेत. उमेदवार sbi.co.in किंवा ibps.in. या अधिकृत वेबसाईट्सवर निकाल पाहू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्लर्क विभागातील ज्युनिअर असोसिएट (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) या पदासाठी १२ नोव्हेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेद्वारे देशभरातील एसबीआयच्या विविध शाखांमध्ये ५,००८ रिक्त पदांसाठी भरती होणार आहे.

आणखी वाचा- CBSE 2023 Date Sheet: सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; १२ वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील टप्प्यासाठी निवडले जातील. पुढील टप्प्यात उमेदवारांनी निवडलेल्या स्थानिक भाषेतून परीक्षा घेतली जाईल. ही मुख्य परीक्षा असणार आहे.

निकाल जाणून घेण्यासाठी पुढील स्टेप्स वापरा

  • एसबीआयच्या sbi.co.in. या वेबसाईटवर जा.
  • त्यामध्ये करीअर सेक्शनमध्ये जा.
  • त्यामधील प्रीलिम्सच्या निकालाची लिंक ओपन करा.
  • त्यामध्ये डिटेल्स सबमिट करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर उपलब्ध होईल.
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank exam sbi clerk prelims result 2022 are out know where to check results pns