Bank Of Maharashtra Recruitment 2022: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काही जागांसाठी भरती होणार आहे. मुख्य सुरक्षा अधिकारी CSO या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ एप्रिल २०२२ असणार आहे.
पदाचा तपशील
मुख्य सुरक्षा अधिकारी (CSO)
शैक्षणिक पात्रता काय?
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Computer Science / Computer / Information Technology / Electronics & Communication / Equivalent Courses related to Cyber Security Field या ब्रांचेसमधून डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
(हे ही वाचा: MMRCL Recruitment 2022: मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या अधिक माहिती)
अनुभव किती हवा?
IT क्षेत्रात काम करण्याचा किमान १५ वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसेच डोमेन सेक्युरिटी क्षेत्रात काम करण्याचा किमान १० वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
(हे ही वाचा: ESIC Recruitment 2022: नोकरीची सुवर्णसंधी! बंपर भरती, पगार १ लाखांहून अधिक)
कोणती कागदपत्रं आवश्यक
बायोडेटा, दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र, पासपोर्ट साईझ फोटो ही कागदपत्रं आवश्यक आहेत.
(हे ही वाचा: Indian Navy Recruitment 2022: भारतीय नौदलात दहावी पाससाठी नोकरीची संधी, १५३१ रिक्त जागा)
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
जनरल मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे ४११००१