केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या बायोटेक्नॉलॉजी विभागातर्फे बायोटेक्नॉलॉजी व लाइफ सायन्सेसमध्ये विशेष संशोधनपर असोसिएटशिपसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत-
शैक्षणिक अर्हता- अर्जदारांनी विज्ञान, तंत्रज्ञान- अभियांत्रिकी विषयातील पीएच.डी किंवा एमडी, एसएस (मेडिसिन्स) यांसारखी पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते संबंधित पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत. याशिवाय त्यांना बायोटेक्नॉलॉजी- लाइफ सायन्सेस क्षेत्रातील संशोधनामध्ये विशेष रूची असावी.
वयोमर्यादा- उमेदवारांचे वय ४० ते ४५ वर्षांच्या दरम्यान असावे. वयोमर्यादेची अट महिला आणि सेवारत अर्जदारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.
निवड पद्धती- अर्जदारांपैकी अर्हताप्राप्त उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल. मुलाखत एप्रिल अथवा मे २०१६ मध्ये इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरू येथे घेण्यात येईल व त्यानुसार उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल.
असोसिएटशिपचा तपशील- रिसर्च असोसिएटशीप योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांची निवड सुरुवातीला २ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात येईल. नंतर हा कालावधी ५ वर्षांपर्यंत वाढवता येईल.
वरील संशोधन काळासाठी संशोधक उमेदवारांना दरमहा ३६००० ते ४०००० रु.ची शिष्यवृत्ती व वार्षिक आकस्मिक खर्चापोटी दरवर्षी ५०,००० रु. देण्यात येतील.
अर्ज पाठविण्याची मुदत- विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले आणि आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज को-ऑर्डिनेटर डीबीटी- रिसर्च असोसिएटशीप प्रोग्रॅम डिपार्टमेंट ऑफ बायोकेमिस्ट्री, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स कॅम्पस, बंगळुरू- ५६००१२ या पत्त्यावर ४ मार्च २०१६ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
अधिक माहिती
योजनेच्या संदर्भात अधिक तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीची जाहिरात पाहावी अथवा biochem.iise.crnet.in/distra.html या संकेतस्थळाला भेट द्यावी.