करिअर कोर्सेस, आमोद प्रकाशन, पृष्ठे- १६८, मूल्य- १५० रु.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नाझी छळछावणीतून तावूनसुलाखून बाहेर पडलेले डॉ. व्हिक्टर फ्रँकल यांच्या तत्त्वांवर हे पुस्तक बेतले आहे. डॉ. अॅलेक्स पॅटाकोस यांनी लिहिलेले हे पुस्तक आजच्या काळातही व्यावसायिक आणि व्यक्तिगत जीवनात दिशादर्शक ठरते. आपल्याला जीवनाबद्दल, व्यवसायाबद्दल जे मूलभूत प्रश्न पडतात, त्या संदर्भात अर्थ शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकात व्हिक्टर फ्रँकल यांच्या तत्त्वांच्या आधारे केला आहे. यात आयुष्य आपोआप घडत नाही, अर्थाचे चक्रव्यूह, दृष्टिकोन निवडण्याच्या स्वातंत्र्याची अंमलबजावणी, अर्थमय जीवन जगण्याची इच्छा आणि तळमळ साकार करा, आयुष्याच्या क्षणाक्षणातील अर्थ ओळखा. स्वत:कडे अलिप्ततेने पाहा, स्वत:पलीकडे विचार करा, या फ्रँकल यांच्या तत्त्वांविषयी सविस्तर विवेचन केले आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी वाचकांसाठी एक अर्थपूर्ण प्रश्न विचारण्यात आला आहे. त्याचे उत्तर प्रत्येकाने शोधणे अभिप्रेत आहे.
प्रिझनर्स ऑफ अवर थॉट्स- अॅलेक्स पॅटाकोस, अनुवाद- डॉ. विजया बापट, पृष्ठे- १४६, किंमत- १४० रु.
कार्यसंस्कृती, नेतृत्वगुण आणि
बरंच काही..
आयआयटी, दिल्लीचे माजी विद्यार्थी आणि आयआयएम, अहमदाबादचे सुवर्णपदक विजेते सचित जैन यांनी लिहिलेल्या या पुस्तकात नेतृत्व कसं करावं, कार्यसंस्कृती सकारात्मकपणे कशी सुधारावी याचं मार्गदर्शन या पुस्तकात मिळतं. मनुष्यबळ व्यवस्थापन, क्वॉलिटी सर्कल, परस्परविरोधी गटाचे व्यवस्थापन, मूल्यरहित कामं, नेतृत्वगुण अशा व्यवस्थापकीय गुणांविषयी दृष्टिकोन व्यक्त केला आहे.
अनुराग अमर सचदेव या आयआयएम, अहमदाबादचा माजी विद्यार्थी आजारी स्टील कंपनीचा प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारतो. त्याला ही अवघड वाटचाल पार करता येते का, हे सांगणारा त्याचा उद्यम प्रवास या पुस्तकात रेखाटला आहे.
रेडी फॉर टेक ऑफ- नेतृत्वकलेची कथा- सचित जैन, अनुवाद- शुभदा पटवर्धन, पृष्ठे- २६१, मूल्य- २५० रु.
निवडलेल्या करिअरमध्ये उत्तम यश संपादन करण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या गुणांचा ऊहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे. यात साहसाची किमया, यश तुमच्या हातात, ताणयुक्त जगा, प्रगतीसाठी व्यवस्थापन आवश्यक, मार्केटिंगची तंत्र, गटकार्य, ग्राहकसेवा, सेवकसंबंध, यश मिळविण्यासाठी आत्मपरीक्षण, स्वयंविकास, आत्मसंयम, आनंदी जीवनासाठी देहबोली, स्पर्धापरीक्षा : यशाचे साधन, व्यक्तिमत्त्व विकासातील अडसर, पर्यटन क्षेत्रातील संधी, व्यवस्थापकाची कार्यकौशल्ये, कार्यालयीन शिष्टाचार, शाळेपासूनच करिअरचा विचार कसा करावा ही प्रकरणे बेतली आहेत.
करिअरवेध : मंत्र व तंत्र- बसवेश्वर चेणगे, आमोद प्रकाशन, पृष्ठे- १५२, मूल्य- १५० रु.
दैनंदिन आयुष्यातील ताणतणाव, मानसिक अस्वस्थता दूर करून सकारात्मक विचारांना प्रवृत्त करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरतं. तणावपूर्ण प्रसंगांमुळे जीवनातील आनंद हरपू नये, यासाठी काही साधेसोपे उपाय या पुस्तकात सांगितले आहेत. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ख्रिश्चन श्रायनर यांनी दैनंदिन जीवनातील ताण दूर करण्यासाठी केलेले मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त ठरते.
श्वासोच्छ्वास, साधी सकारात्मक वाक्ये, सौम्य विचार, शरीर रिलॅक्स करणे, स्वत:ला प्रश्न विचारणे, लक्ष दुसरीकडे वळवणे, आनंदाचे स्वागत करणे यासारख्या ३० वेगवान तंत्रांची सविस्तर माहिती यात नमूद करण्यात आली आहे.
तणावमुक्त जगण्यासाठी- डॉ. ख्रिश्चन श्रायनर, अनुवाद- डॉ. अरुण मांडे, रोहन प्रकाशन, पृष्ठे – १४८, मूल्य १०० रु.
अलीकडे प्रत्येक क्षेत्रात काम करणारी व्यक्ती एका अदृश्य दबावाखाली जगत असते. हा दबाव म्हणजे वेगवेगळे ताणतणाव. ज्यामुळे जगणं असाहाय्य होऊ लागतं. तणावमुक्तीसाठी जीवनातील आनंद शोधणं आणि आनंदी होणं आवश्यक असतं. त्यासंबंधीचे साधेसोपे उपाय या पुस्तकात सुचवले आहेत. यात मनाचा शरीरावर होणाऱ्या परिणामाबाबत लिहिले आहे. तणावाला समजून घ्या, तणावरहित आयुष्यासाठी काय करता येईल ते पाहा, तणावमुक्तीचे सकारात्मक मार्ग, तणावाच्या नियोजनासाठी मन:शक्तीचा उपयोग या विषयक सविस्तर माहिती दिली आहे.
स्ट्रेस मॅनेजमेन्ट : तणावातून मन:शांतीकडे- डॉ. गिरीश पटेल, अनुवाद- राजश्री खाडिलकर, साकेत प्रकाशन, पृष्ठे- १६६, मूल्य- १४० रु.