बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) ने सल्लागार, बालरोगतज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, मानसोपचार तज्ज्ञ या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) भरती मंडळ, मुंबई द्वारे एप्रिल २०२२ च्या जाहिरातीत एकूण १० रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ६ मे २०२२ आहे.
पदांची नाव: सल्लागार (Consultant), बालरोगतज्ञ (Pediatrician), सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (Public Health Manager), मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist).
रिक्त पदांची संख्या: १० पदे.
(हे ही वाचा: टाटा मेमोरियल सेंटर ACTREC मुंबई, येथे नोकरीची संधी! बारावी उत्तीर्णही करू शकतात अर्ज)
नोकरीचे ठिकाण: मुंबई.
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ मे २०२२.
(हे ही वाचा: District Court Akola Bharti 2022: जिल्हा सत्र न्यायालयात भरती, दहावी उत्तीर्णांना संधी; पगार ५६ हजारपर्यंत)
अर्ज पाठवण्याचा पत्ता: संयुक्त-कार्यकारी आरोग्य अधिकारी (NUHM) कार्यालय एफ/दक्षिण विभाग १ ला मजला रूम. नं. १३ दो. बाबासाहेब रोड, परेल.
पगार किती मिळणार?
सल्लागार – ७३,५०० /- रुपये प्रतिमहिना
बालरोगतज्ञ – ७५,०००/- रुपये प्रतिमहिना
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक – ३२,०००/- रुपये प्रतिमहिना
मानसोपचारतज्ज्ञ – ७५,०००/- रुपये प्रतिमहिना