BSF Recruitment 2022: सीमा सुरक्षा दल (BSF) ने कॉन्स्टेबल ट्रेडसमन पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार सीमा सुरक्षा दल कॉन्स्टेबल ट्रेडसमन भरती २०२२ साठी अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर १ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी १६ जानेवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पदांचा तपशील
अधिकृत अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे कॉन्स्टेबल ट्रेड्समनच्या एकूण २७८८ रिक्त पदांची भरती केली जाईल. त्यामध्ये पुरुष हवालदाराच्या २६५१ आणि महिला हवालदाराच्या १३७ पदांचा समावेश आहे.
(हे ही वाचा: RBI SO Recruitment 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती, जाणून घ्या तपशील)
पगार किती?
या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल ३ अंतर्गत २१७०० रुपये ते ६९१०० रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.
पात्रता काय?
सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल भरतीसाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय संबंधित ट्रेडमध्ये २ वर्षांचा अनुभव असावा.
(हे ही वाचा: Railway Recruitment 2022: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे गट सी पदांसाठी भरती; जाणून घ्या संपूर्ण तपशील)
वायोमार्यदा किती?
भरतीसाठी, उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २३ वर्षे असे निश्चित केले आहे. तथापि, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. शैक्षणिक पात्रता वयोमर्यादेशी संबंधित तपशीलवार माहितीसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.