सैन्यदल वर्कशॉप – मीरत येथे चार्जमनच्या २१ जागा : अर्जदारांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदविका व फोरमनविषयक पात्रता उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्यांना संबंधित विषयातील कामाचा ३ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ ते ९ नोव्हेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली सेंट्रल एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज हेडक्वार्टर्सबेस वर्कशॉप ग्रुप ईएमई, पोस्ट बॉक्स नं. ५८, मीरत छावणी, मीरत २५०००१ (उत्तर प्रदेश) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०१२.
सैन्यदलाच्या नर्सिग विभागात २०० जागा – अर्जदारांनी बीएससी- नर्सिग पात्रता पूर्ण केलेली असावी, त्यांची नर्सिग कौन्सिल ऑफ इंडियाकडे नोंदणी झालेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोगट २० ते ३४ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली मिलिटरी नर्सिग सव्र्हिसेसची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज इंटिग्रेटेड हेडक्वार्टर्स ऑफ मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स (आर्मी), अॅडज्युटंट जनरल ब्रँच, रूम नं. ४५, ‘एल’ ब्लॉक हटमेंटस्, नवी दिल्ली ११०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०१२.
आरईसी पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअर्सच्या ५ जागा – अर्जदारांनी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर इंजिनीयरिंग यांसारख्या विषयातील पदवी परीक्षा कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित कामाचा सुमारे २ वर्षांचा अनुभव असायला हवा.
वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्जाचा नमुना व इतर तपशिलासाठी आरईसी पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनीच्या http://www.recpdcl.in या संकेत स्थळाला भेट द्यावी अथवा कंपनीच्या दूरध्वनी क्र. ०११-४४१२८७५१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज डेप्युटी जनरल मॅनेजर (ह्य़ुमन रिसोर्सेस), आरईसी पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड, १०१६-१०२३, १० वा मजला, देविका टॉवर, नेहरू प्लेस, नवी दिल्ली ११००१९ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१२.
अॅम्युनेशन डेपो- देहू रोड, पुणे येथे फायरमनच्या ९ जागा – अर्जदार शालांत परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ ते ९ नोव्हेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली अॅम्युनेशन डेपो, देहू रोड, पुणेची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, अॅम्युनेशन डेपो, देहू रोड, पुणे ४१२१०१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१२.
इंडो-तिबेटन सीमा दलात पशु-वैद्यकांसाठी ३२ जागा – अर्जदार पशु-वैद्यक विषयातील पदवीधर असावेत,
त्यांची व्हेटर्नरी कौन्सिल ऑफ इंडियाकडे नोंदणी झालेली
असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा ३२ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ६ ते १२ ऑक्टोबर २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली इंडो- तिबेटन सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक
त्या तपशिलासह असणारे अर्ज दि सीनियर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (पर्सोनेल), डायरेक्टोरेट जनरल, आयटीबीपीएफ, ब्लॉक २, सीजीओ कॉम्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली ११०००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१२.
रोजगार संधी
सैन्यदल वर्कशॉप - मीरत येथे चार्जमनच्या २१ जागा : अर्जदारांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदविका व फोरमनविषयक पात्रता उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्यांना संबंधित विषयातील कामाचा ३ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा २५ वर्षे.
First published on: 18-11-2012 at 10:39 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career chance