• माझा मुलगा दहावीच्या परीक्षेला बसला आहे. त्याला व्यवस्थापन शाखेत करिअर करायचे आहे. इंदोरमध्ये असलेल्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेमधील इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट म्हणजेच आयपीएम हा अभ्यासक्रम कसा आहे? एमबीएच्या आधी आणखी काय पर्याय आहेत? उमेश नागापूरकर

उमेशजी, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेने सुरू केलेला आयपीएम अभ्यासक्रम अतिशय चांगला आहे. थेट बारावीनंतर व्यवस्थापन विषयाची पदव्युत्तर पदविका हा अभ्यासक्रम केल्यावर मिळते. उत्तम प्लेसमेंट मिळते, मात्र या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी खूप स्पर्धा असते. त्यासाठी तयारीही तशीच करावी लागते. बारावीनंतर वेगवेगळया विषयांमधील बीबीए करण्याचा चांगला पर्याय सध्या उपलब्ध झाला आहे. मात्र असे अभ्यासक्रम नामवंत व दर्जेदार शिक्षणसंस्थेमधूनच करणे उचित ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

  • मी बीएस्सी स्टॅटिस्टिक्सच्या तिसऱ्या वर्षांची परीक्षा दिली आहे. पदव्युत्तर शिक्षणासाठी एमएस्सीव्यतिरिक्त कोणते अभ्यासक्रम आहेत? डिप्लोमा इन अप्लाइड स्टॅटिस्टिक्स हा अभ्यासक्रम कुठून करता येईल? – संतोषी रायगुरू

डिप्लोमा इन अप्लाइड स्टॅटिस्टिक्स हा अभ्यासक्रम पुढील संस्थामधून करता येऊ  शकतो-

(१) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अप्लाइड स्टॅटिस्टिक्स/ कालावधी- किमान एक वर्षे/ कमाल- तीन वर्षे. संपर्क-स्कूल ऑफ सायन्सेस, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, मैदान घारी-नवी दिल्ली- ११००६८,

संकेतस्थळ – ignou.ac.in

ईमेल -sos@ignou.ac.in

(२) मुंबई विद्यापीठ -पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अप्लाइड स्टॅटिस्टिक्स विथ सॉफ्टवेअर,

संकेतस्थळ- http://mu.ac.in/

(३) इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्टॅटिस्टिकल मेथड्स अँड अ‍ॅनालिटिक्स, अ‍ॅनालिटिक्स,

संकेतस्थळ – http://www.isical.ac.in

  • मी संख्याशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. माझ्यासाठी पुढील शिक्षणाच्या संधी कोणत्या असतील? तसेच या विषयासंबंधाने काही सरकारी नोकरीच्या संधी मला मिळतील का? – दीपक प्रकाश पाटील

दीपक तू, इंडियन इकॉनॉमिक अँड स्टॅटिस्टिकल एक्झामिनेशन देऊ शकतोस. त्याद्वारे भारत सरकारच्या वित्त व सांख्यिकी विभागात उच्चश्रेणीची नोकरी मिळवू शकतोस. ही परीक्षा दरवर्षी संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाते. तू तुझ्या विषयात पदव्युत्तर पदवी आणि पुढे संशोधन केलेस तर नि:संशय तुला करिअरच्या अनेकानेक उत्तमोत्तम संधी मिळू शकतील