न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये फायरमनच्या १२ जागा : अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व अवजड वाहनचालनाचे परवानाधारक असायला हवेत. याशिवाय त्यांनी अग्निशमन विषयक प्रशिक्षण घेतलेले असावे व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व इतर माहिती आणि तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या १५ ते २१ सप्टेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जाहिरात पाहवी. अथवा कॉर्पोरेशनच्या http://www.upcil.nic.aisa  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने अर्ज करून त्याची प्रत डेप्युटी मॅनेजर (एचआरएम), कारापार-गुजरात साइट, पोस्ट – अनुमाला, व्यारा, द्वारा, (जि. तापी), गुजरात-३९४६५१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०१२.
अणू संशोधन विभागात साहाय्यक-संशोधक (सिव्हिल) पदाच्या ८ जागा : उमेदवारांनी सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदविका कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली अणू-संशोधन विभागाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या तपशिलासह असणारे अर्ज डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी, हेवी वॉटर प्लँट (कोटा), पोस्ट- अणुशक्ती, कोटा-३२३३०३ (राजस्थान) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०१२.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रॉक मेकॅनिकमध्ये सायंटिफिक असिस्टंटच्या ५ जागा : अर्जदार बी.एस्सी. पदवीधर असावेत अथवा त्यांनी इंजिनीअरिंगमधील पदविका घेतलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या २२ ते २८ सप्टेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेकॅनिकची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.nirm.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज रजिस्ट्रार, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रॉक मेकॅनिक, चॅम्पियन रिफस्, कोलार गोल्ड फील्ड्स, कोलार-५६३११७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०१२.
इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमीतील अभ्यासक्रमासाठी ८० जागा : अर्जदार विद्यार्थ्यांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा गणित व भौतिकशास्त्र हे विषय घेऊन व ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी  व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा १७ वर्षांहून अधिक. या अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या १५ ते २१ सप्टेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमीची जाहिरात पाहावी अथवा अकादमीच्या http://www.igrua.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज दि डायरेक्टर, इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमी, फुरसतगंज एअरफिल्ड, छत्रपती शाहू महाराज नगर, रायबरेली (उ.प्र.) २२९३०२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०१२.
महाराष्ट्र सदन-दिल्ली येथे मल्टिटास्किंग एक्झिक्युटिव्हच्या ४ जागा : उमेदवार बारावी उत्तीर्ण असायला हवेत व त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट, हाऊसकीपिंग, कॅटरिंग, फ्रंट ऑफिस मॅनेजमेंट, फूड प्रॉडक्शन यासारख्या विषयातील पात्रता पूर्ण केलेली असायला हवी व त्यांना संबंधित कामाचा एक वर्षांचा अनुभव असायला हवा. मराठीशिवाय हिंदी व इंग्रजीचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा ४० वर्षे. यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी महाराष्ट्र सदन, दिल्लीच्या http://www.maharashtrasadan.org  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज अपर निवासी आयुक्त, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०१२.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा