रुग्णपरिचर्या अर्थात नर्सिग या संज्ञेत खूप अर्थ सामावलेला आहे. आजारी व्यक्तीची सर्वतोपरी काळजी घेणे, रुग्णाच्या शारीरिक, मानसिक क्षमतेचे रक्षण करणे, आजाराच्या निदानानुसार औषधोपचार देणे, आजारपणात होणाऱ्या वेदना सहन करण्यासाठी रोग्याला व त्याचबरोबर त्याच्या कुटुंबियांना धीर देणे, या सर्व गोष्टी म्हणजे रुग्णसेवा. या बहुमोल जबाबदाऱ्यांमुळे रुग्णपरिचारक हा रुग्णाच्या कुटुंबाचा आणि समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक ठरतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुग्णपरिचर्या या पेशाला पुरातन परंपरा आहे. एका उदात्त ध्येयाने भारलेला हा पेशा, फ्लोरेन्स नाइटिंगेल या इंग्लिश परिचारिकेच्या सेवाभावी कार्यामुळे लोकप्रिय झाला. पुढे हीच सहृदय परिचारिका ‘आधुनिक परिचय्रे’ची जननी मानली जाऊ लागली.

रुग्णसेवेत मुख्यत्वे रुग्णाची शारीरिक व मानसिक काळजी घेणे अपेक्षित असते. रुग्णसेवकाला रुग्णाचे सतत काळजीपूर्वक निरीक्षण करावे लागते. ठरावीक कालावधीनंतर औषधोपचाराचे परिणाम पडताळून त्याची नोंद नियमितपणे ठेवावी लागते. शस्त्रक्रियांच्या वेळीही रुग्णसेवक शल्यविशारदांना विविध उपकरणे हाताळण्यासाठी मदत करतात. इतकेच नव्हे तर गंभीर आजारातून बाहेर पडलेल्या रुग्णांची शुश्रुषा करण्यासाठी तसेच दैनंदिन कामे करता यावीत, यासाठी परिचारिकांची गरज भासते. सर्वसाधारण रुग्णसेवेव्यतिरिक्त सुलभ प्रसूतीसाठी, हृदयरोग, अतिदक्षता, अस्थिरोग, बालरोग अशा निरनिराळ्या क्षेत्रांत रुग्ण्सेवेतील विशेषज्ञ म्हणूनही काम करण्याची संधी मिळू शकते. वैद्यकशास्त्रात होणाऱ्या नित्यनवीन तांत्रिक सुधारणांबद्दल रुग्णपरिचारिकांनी सजग असणे आवश्यक आहे.

प्रशिक्षित रुग्णसेवकांना शुश्रूषेव्यतिरिक्त रुग्णपरिचर्या विद्यालयातून प्रशिक्षक, व्यवस्थापक, संशोधक अशा संधीही मिळू शकतात. रुग्ण परिचर्या क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग अधिक असला तरी आजकाल पुरुषही करिअरसाठी हा पर्याय निवडू लागले आहेत.

सेवा करण्याची इच्छा आणि क्षमता असलेल्या व्यक्तींना रुग्णसेवेतील करिअर हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कोणत्याही ‘हेल्थकेअर टीम’मध्ये रुग्णसेवक-सेविकांचा मोठा व महत्त्वपूर्ण वाटा असतो. दिवसाच्या कोणत्याही वेळी, कोणत्याही वयोगटाच्या आणि समाजातील कोणत्याही थरातील रुग्णासाठी परिचारकाची गरज भासू शकते.

एकूण काय, जर तुम्ही मनाने प्रेमळ, परोपकारी वृत्तीचे असाल तर हा रुग्णसेवेचा व्यवसाय तुम्हाला नक्कीच आवडेल. यासोबतच तुम्ही मनाने खंबीर असणेही गरजेचे आहे. या क्षेत्रात विविध प्रकारच्या संधी जशा आहेतच, तशी भरपूर जबाबदारीही आहे.

रुग्णसेवक डॉक्टरांच्या सान्निध्यात काम करतात, त्यांनी केलेले निदान, औषधयोजना, त्याची अंमलबजावणी करणे, त्याचे रुग्णाच्या शरीरावरील परिणाम पडताळणे या सर्व गोष्टींवर सेवकाला रुग्ण पूर्ण बरा होईपर्यंत लक्ष ठेवावे लागते. डॉक्टरांपेक्षा, रुग्णसेवकच रुग्णाच्या अधिक संपर्कात असतो. आजारी माणसाच्या देहाला, मनाला आराम पडेल याची काळजी रुग्णसेवकाला घ्यावी लागते.

ANM  (ओक्झिलीअरी नìसग मिड्वायफरी) आणि GNM (जनरल नìसग मिड्वायफरी) या अभ्यासक्रमांशिवाय बीएस्सी नìसग हा शिक्षणक्रम अनेक महाविद्यालयात सुरू आहे. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्रजी या विषयांसह विज्ञान शाखेतून ४५टक्क्यांसह बारावी उत्तीर्ण झालेल्या, कमीत कमी १७ वष्रे वयाच्या विद्यार्थ्यांला यासाठी प्रवेश मिळू शकतो. बीएस्सी नìसग (पोस्ट बेसिक) या शिक्षणक्रमासाठी विद्यार्थी दूरस्थ शिक्षणाचा पर्यायही निवडू शकतात. या शिक्षणक्रमाच्या पात्रतेसाठी बारावी व जीएनएम शिक्षणक्रमाची पूर्तता व दोन वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव आवश्यक आहे. सध्या या क्षेत्रात हा शिक्षणक्रम उच्च दर्जाचा मानला जातो.

भारतीय संरक्षण दलात (आम्र्ड फोस्रेस), बी.एस्सी नìसग शिक्षणक्रमासाठी १७ ते २४ वयोगटातील अविवाहित महिला उमेदवारांना प्रवेश दिला जातो. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्रजी या विषयांसह विज्ञान शाखेतून ४५ टक्क्यांसह बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे असते. शिवाय इच्छुक विद्यार्थ्यांना वैद्यकीय तपासणी, लेखी परीक्षाही पार करावी लागते. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थीना सन्य दलातील सेवेसाठी पाच वर्षांचे हमीपत्र देणे मात्र अनिवार्य असते.

वरील सर्व शिक्षणक्रमांपकी जीएनएम किंवा बीएस्सी ही शैक्षणिक पात्रता कोणत्याही वैद्यकीय सेवा संस्थेत नोकरी मिळवण्यासाठी पुरेशी असते. रुग्णसेवक किंवा सेविकांची नोंद ठेवणारी प्रत्येक राज्याचे एक स्वतंत्र मंडळ असते. नìसगमधील शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना येथे नोंदणीकृत केले जाते.

एखाद्या विशिष्ट वैद्यकीय शाखेतील रुग्णसेवेचे ज्ञान मिळवण्यासाठी  ‘पोस्ट बेसिक स्पेशियालिटी’ हा एक वर्षांचा पदविका अभ्यासक्रमही करता येतो.

अनुभव आणि प्रशिक्षणाच्या आधारे या क्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. वैद्यकीय सेवा क्षेत्रात अनेक वेगवेगळ्या कार्यप्रणाली व उद्दिष्टांसाठी काम करण्याची संधी मिळते. त्यातील काही खालीलप्रमाणे आहेत-

अ‍ॅडल्ट नस्रेस  

या प्रकारचे रुग्णसेवक/सेविका वयाने मोठय़ा तसेच तरुण रुग्णांकडे लक्ष देतात. आरोग्यविषयक तसेच विशिष्ट रोगासंबंधी सल्ला, औषधोपचाराबद्दल मार्गदर्शन, रुग्णांची काळजी, निरोगी व आनंदी आयुष्यासाठी रुग्णांना सक्षम बनवणे या गोष्टी पार पाडाव्या लागतात. या सेवा पुरविणाऱ्या नस्रेसना रात्र व दिवस अशा दोन वेळा काम वाटून घ्यावे लागते. 

मेन्टल हेल्थ नस्रेस

मनोरुग्ण व्यक्तींना रुग्णसेवा पुरवणे हे खरोखरच गुंतागुंतीचे आणि धर्याचे काम म्हणावे लागेल. या प्रकारच्या नस्रेस जनरल फिजिशिअन (सर्व रोगांवर साधारण उपचार करणारा), मनोविकृती चिकित्सक, मानसशास्त्रज्ञ यांच्या मदतीने मानसिक रुग्णांची काळजी घेतात.

चिल्ड्रन नस्रेस

या प्रकारच्या रुग्णपरिचारिकांना मुलांच्या आजारासोबत मुलांच्या कलाने घेत, त्यांची सेवा करावी लागते. जन्मत: हृदयरोग असलेल्या बालकापासून ते खेळता खेळता हातपाय मोडून घेतलेले लहान वयाचे मुलगे-मुलीे. फक्त आजारी मूलच नव्हे तर त्याच्या भविष्याच्या चिंतेने ग्रासलेल्या कुटुंबियांना धीर देण्याचे कामही त्यांना पार पाडावे लागते.

लìनग डीसअ‍ॅबिलिटी नस्रेस

आकलनशक्तीचा अभाव किंवा कमी आकलन शक्ती असलेल्या रुग्णांच्या समस्या शारीरिक किंवा मानसिक स्वरूपाच्या असू शकतात. या प्रकारातील नस्रेस रुग्णाच्या कुटुंबाच्या मदतीने तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. मुख्यत्वे करून अशा रुग्णांना लवकरात लवकर मानसिक व शारीरिकदृष्टय़ा सक्षम, स्वावलंबी बनवून समाजात सामावून घेणे हे या मागील उद्दिष्ट असते.

निओनॅटल नस्रेस

जन्मत:च आजारी किंवा अपुऱ्या दिवसांच्या नवजात अर्भकांची काळजी या     

 

प्रकारच्या रुग्णसेविका घेतात. अशा बालकांना श्वसनाच्या समस्येसारख्या आजारपणांचा सामना करावा लागतो. अशा वेळी डोळ्यात तेल घालून मुलांच्या उपचारांवर सतत लक्ष ठेवावे लागते. या अर्भकांना अन्न देण्याची प्रक्रियाही एका विशिष्ट नियंत्रित उबदार तापमानात करावी लागते.

हेल्थ व्हिजिटर

या प्रकारच्या नस्रेस नोंदणीकृत असतात किंवा प्रशिक्षित सुईणी असतात. काही विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात राहून आरोग्य सेवा देण्याचे शिक्षणही त्यांनी घेतलेले असते. त्या त्या विभागातील लहान मुलांचे आरोग्य सुरक्षित राहावे, एकूणच परिसरात राहणाऱ्या व्यक्ती निरोगी व सुदृढ राहण्यासाठी मदत करणे हे यांचे मुख्य काम असते.

प्रिझन नस्रेस

तुरुंगातून काम करणाऱ्या नस्रेस या नोंदणीकृत असतात. त्या तुरुंग प्रशासनाकडून  किंवा एनएचएस (नॅशनल हेल्थ सíव्हस)कडून नेमल्या जातात. तुरुंगातील बरेच कैदी व्यसनाधीन किंवा मनोरुग्ण असतात. तुरुंगाच्या वातावरणात गुन्हेगार रुग्णांची काळजी घेणे म्हणजे फारच कठीण काम. अशा रुग्णाची शारीरिक व मानसिक क्षमता उत्तम ठेवून त्यांना पुन्हा गुन्हेगार होण्यापासून परावृत्त करणे हेही या परिचारिकांसमोरील एक आव्हान असते.

थिएटर नस्रेस

या प्रकारातील रुग्णसेवक/सेविका प्रशिक्षित व अनुभवी असतात. शल्यचिकित्सालयात तसेच रिकव्हरी रूममध्ये त्या कार्यरत असतात. महत्त्वपूर्ण शस्त्रक्रियेनंतरच्या शुश्रूषेचे काम पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. याबाबतचे विशेष प्रशिक्षण या नस्रेसनी घेतलेले असते.

हेल्थ केअर असिस्टन्ट

या प्रकारच्या नस्रेस ‘नìसग ऑक्जिलिअरीज’ असेही म्हटले जाते. हे प्रशिक्षित नसले तरी रुग्णसेवकांच्या हाताखाली मदतनीस म्हणून काम करतात. रुग्णांची काळजी घेण्याचे, त्यांचे मानसिक आरोग्य सांभाळण्याचे काम करतात.

या क्षेत्रात उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर विद्यार्थी एम.एस.सी, एम.फिल, पीएच.डी अशा शिक्षणक्रमांना प्रवेश घेऊ शकतात.

नìसग या सेवा क्षेत्रात नोकरीतील स्थिरता आणि सुरक्षा या जमेच्या बाजू मानायला हव्यात. तसेच या कार्यक्षेत्रात परोपकाराची संधी आणि ‘कर्म करता धर्म’ साधल्याचे समाधानही मिळते. शिवाय नोकरीची ठिकाणे, कामाचे स्वरूप आणि निरनिराळी आव्हाने यांतून विविध प्रकारचा अनुभव गाठीस येतो. विशेष प्रशिक्षण घेतलेल्या रुग्णसेवकांना हेल्थ टीमचे नेतृत्व करण्याची किंवा व्यवस्थापनातील आíथकदृष्टय़ा आकर्षक संधीही मिळू शकतात.

या व्यवसायाचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. लायक परिचारिकांची कमतरता असल्याने कामाचे प्रचंड दडपण हे तर नित्याचेच. शिवाय सलग महिनाभर किंवा १५ दिवस रात्रपाळीत काम करणे. नेहमीच रोगग्रस्त व काळजीग्रस्त वातावरणात वावरणे हे समजतो, तितके सोपे नक्कीच नाही.

नìसगच्या शिक्षणक्रमाचा खर्च संस्थेगणिक बदलत जातो. सरकारी अनुदानित शिक्षण संस्थांतून बी.एस.सी नìसगचा खर्च मर्यादित असला तरी खासगी संस्थांतून हा खर्च वर्षांला ५० हजार ते १,८० हजारांपर्यंत असू शकतो. त्याचप्रमाणे जीएनएम नìसग कोर्सचा खर्च वर्षांला ४५ हजार ते १,४० हजार एवढा असतो.

रुग्ण परिचय्रेचे शिक्षण घेतलेल्या व्यक्तींना कधी बेकारीची समस्या भेडसावत नाही. सरकारी किंवा खासगी इस्पितळ, अनाथालये, वृद्धाश्रम, आरोग्यधाम, सन्यदल यांतून त्यांना सहज नोकरी मिळू शकते. तसेच इंडिअन रेड क्रॉस सोसायटी, इंडिअन नर्सिंग कौन्सिल, स्टेट नर्सिंग कौन्सिल यांतूनही नोकरीच्या संधी मिळतात. ANM नर्सिंग कोर्स केलेल्या व्यक्तीही प्रार्थमिक आरोग्य केंदता सेवा देऊ शकतात.

रुग्ण परिचय्रेतील शिक्षण घेतलेल्या व्यक्तींना वैद्यकीय महाविद्यालयांतून व नìसग विद्यालयांतून प्रशिक्षकाच्या, व्यवस्थापनातील नोकरीच्या संधी मिळू शकतात. उद्योजक वृत्तीच्या व्यक्ती या शिक्षणाद्वारा रुग्ण परिचर्या केंद्र सुरू करू शकतात.

देशातील प्रगतीच्या संधीबरोबरच, रुग्णसेवक/सेविकांना परदेशातही नोकरीच्या संधी मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असतात.

प्रशिक्षित पण कमी अनुभव असलेल्या रुग्णपरिचारिकांना मासिक रु ७ हजार ते रु १७ हजार एवढी प्राप्ती होऊ शकते. कामाच्या पुरेशा अनुभवानंतर हीच रक्कम १८ हजार ते रु. ३७ हजार एवढय़ावर पोहचते. भरपूर अनुभव असलेल्या नस्रेस रु. ४८ हजार ते रु. ७२  हजारांपर्यंत मासिक वेतन मिळवू शकतात. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, अरब देशांत उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्यांत वेतनाची ही आकडेवारी आणखी जास्त असते.

निरोगी जीवनशैली आणि आरोग्य सेवांबद्दलची वाढती जागरूकता लक्षात घेता, रुग्णसेवेतील करिअरचा भविष्यकाळ उज्ज्वल असेल हे नक्की. या कार्यक्षेत्रातील विकासाबाबत सरकारही सकारात्मक भूमिका घेताना दिसते आहे. १३०हून अधिक विद्यालयांतून एएनएम, जीएनएम शिक्षणक्रम राबविण्याची त्याचबरोबर देशभरात काही नवीन नìसग महाविद्यालये स्थापन करण्याची योजना सरकारच्या विचाराधीन आहे.

काही विशिष्ट रुग्णालयातून एम.एस.सी नìसग शिक्षणक्रम चालविण्यास सरकारने अनुमती दिली आहे. मुख्य म्हणजे नìसग शिक्षणक्रमांतून प्रवेश घेण्यासाठीच्या अटी शिथिल करण्यात आल्याने आता विवाहित महिलांना या कोस्रेसना प्रवेश घेणे शक्य झाले आहे.

अनुभवी आणि कुशल रुग्णसेवक/सेविकांना परदेशात फार मोठी मागणी आहे. भारतातून खूप मोठय़ा प्रमाणावर त्यांची गरज भागविली जाते. आकर्षक कमाई आणि उत्तम राहणीमान यासाठी अनुभवी परिचारिका परदेशातील नोकरी स्वीकारण्यास उत्सुक असतात; परंतु यामुळे आपल्या देशात मात्र अनुभवी नस्रेसची नेहमी चणचण भासते.

तेव्हा मित्र-मत्रिणींनो, जर तुम्हाला दुसऱ्याला मदत करणे आवडत असेल, दुसऱ्याची सेवा करण्याचा मानवतावादी दृष्टिकोन आणि उत्तम निरीक्षण शक्ती असेल, तुमची शारीरिक व मानसिक मेहनत घेण्याची तयारी असेल तर रुग्णसेवेतील करिअर संधी स्वीकारायला काहीच हरकत नाही.     (अनुवाद – गीता सोनी)

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career opportunities in nursing
Show comments