गणितात रुची आणि गती असेल तर त्यासंबंधित विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. किंबहुना काही अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना गणित उत्तम येणे आवश्यक ठरते. गणिताशी संबंधित क्षेत्रे आणि अभ्यासक्रमांची माहिती –
मित्रमत्रिणींनो, गणित हा विषय शालेय आयुष्याच्या सुरुवातीपासूनच आपण शिकत असतो. ज्यांना तो जमतो त्यांना त्याचे आकर्षण असते, तर न जमणाऱ्या बऱ्याच जणांना मात्र त्या विषयाचे दुष्ट दडपण वाटते. मात्र, गणित विषयातील प्रशिक्षणक्रम व संधींचा वेध घेतला तर लक्षात येते की, करिअरसंबंधी प्रकाशित होणाऱ्या वर्ल्ड अल्मनॅक बुक्स, न्युयॉर्कमधील माहितीनुसार जागतिक स्तरावर प्रथम दर्जाच्या पहिल्या पाच करिअर क्षेत्रांसाठी गणित विषयाचा पाया प्रकर्षांने मजबूत असण्याची गरज असते. ती आघाडीची क्षेत्रे म्हणजे, सॉफ्टवेअर इंजिनीअर, अॅक्च्युअरी, कॉम्प्युटर सिस्टीम अॅनालिस्ट, कॉम्प्युटर प्रोग्रामर आणि गणितज्ज्ञ.
गणिताचा अभ्यास आवश्यक असणारी क्षेत्रे
अॅक्च्युअरी (विमा शास्त्रज्ञ), गणिताचे प्राध्यापक किंवा शिक्षक, रिसर्च अनालिस्ट (विश्लेषक), संख्या शास्त्रज्ञ (स्टॅटिस्टिशिअन), गणित संशोधक, संगणक शास्त्रज्ञ, मालसाठय़ाचे व्यवस्थापन, क्रिप्टोलॉजिस्ट (गुप्त लिपीशास्त्र),अर्थशास्त्रज्ञ, रोबोटिक्स इंजिनीअर, पर्यावरण विषयक गणितज्ज्ञ, भू-भौतिक शास्त्रातील शास्त्रज्ञ, भू-गणितज्ज्ञ, फोटोग्रामेट्रिस्ट (फोटो भू-मापनशास्त्र) इत्यादी.
गणितातील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या व्यक्तींना देश-परदेशात सरकारी किंवा खासगी क्षेत्रातील खालील आस्थापनांत/उद्योगांत नोकरीच्या संधी मिळू शकतात-
विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठांतर्गत महसूल विभाग, जनगणना विभाग, विमा उद्योग, जागतिक संगणक विज्ञान संस्था, विमान कंपन्या, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर कंपन्या, देशांतर्गत संशोधन संस्था, अंतराळ विज्ञान संशोधन संस्था, ऊर्जा विभाग, भूसर्वेक्षण विभाग, वित्त कंपन्या वगरे.
गणितातील पदव्युत्तर दर्जाचे शिक्षण देणारी देशात १३५ विद्यापीठे आहेत.
गणितातील एम.एस्सी.-पीएच.डी.
हा शिक्षणक्रम उपलब्ध असलेल्या अग्रगण्य संस्था पुढीलप्रमाणे आहेत. या तीनही संस्थांमध्ये लेखी चाचणी आणि मुलाखतीला सामोरे जावे लागते.
* टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च, मुंबई
* इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथॅमॅटिकल सायन्सेस, चेन्नई (प्रवेशासाठी नॅशनल बोर्ड ऑफ हायर मॅथॅमॅटिक्स परीक्षेत यश मिळवणे आवश्यक)
* हरिश्चंद्र रिसर्च इन्स्टिटय़ूट, अलाहाबाद
० मास्टर ऑफ फिलोसॉफी इन मॅथेमॅटिक्स
* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर, (एक वर्ष)
० पीएच.डी. फिलोसॉफी इन मॅथॅमॅटिक्स
पात्रता- पदव्युत्तर शिक्षण, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सटि, नागपूर. (दोन ते पाच वष्रे)
० एम.एस्सी. (मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स) हा शिक्षणक्रम चालविणाऱ्या महाराष्ट्रातील संस्था-
* इंडिअन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी, पवई, मुंबई.
* एन.एम.आय.एम.एस. युनिव्हर्सटि, व्ही. एल. मेहता रोड, पाल्रे ,मुंबई.
* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सटि, नागपूर.
* संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सटि, अमरावती.
* सोलापूर युनिव्हर्सटिी, सोलापूर. युनिव्हर्सटि ऑफ मुंबई. युनिव्हर्सटि ऑफ पुणे.
५५ % गुणांसह गणितातील पदवी धारण केलेले विद्यार्थी वरील शिक्षणक्रमास प्रवेशास पात्र असतात. लेखी परीक्षा ही अनिवार्य आहे.
० पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन कॉम्प्युटेशनल मॅथेमॅटिक्स अॅण्ड स्टॅटिस्टिक्स
हा शिक्षणक्रम चालविणारी देशातील संस्था –
* युनिव्हर्सटि ऑफ मद्रास,चेन्नई,
* अन्नामलाई युनिव्हर्सटि, तामिळनाडू,
* उस्मानिया युनिव्हर्सटि ,हैदराबाद,
* दिब्रुगढ युनिव्हर्सटि, आसाम
० स्टॅटिस्टिक्स डिप्लोमा कोस्रेस
* डिप्लोमा कोर्स इन स्टॅटिस्टिक्स- विक्रम युनिव्हर्सटि, उज्जैन, कालावधी एक वर्ष
* डिप्लोमा कोर्स इन हेल्थ स्टॅटिस्टिक्स- ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ हायजीन अॅण्ड पब्लिक हेल्थ, कोलकाता, कालावधी एक वर्ष
* डिप्लोमा ऑप्थेल्मिक टेक्नोलॉजी इन मॅथेमॅटिक्स- प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निक, एस.एन.डी.टी. विमेन युनिव्हर्सटि, मुंबई, कालावधी- तीन वष्रे
० बी.कॉम. (बिझिनेस मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स)
* बजबज कॉलेज, कोलकाता, वेस्ट बेंगाल. कॅनरा कॉलेज, मंगलोर, कर्नाटक. माउंट कान्रेल कॉलेज, बंगलोर, कर्नाटक.
० बॅचलर ऑफ स्टॅटिस्टिक्स बॅचलर ऑफ मॅथेमॅटिक्स
* इंडिअन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट, बंगलोर इंडिअन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट, कोलकाता
० बॅचलर ऑफ मॅथेमॅटिक्स
* इंडिअन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटूट, बंगलोर
गणित विषयातील काही निवडक प्रशिक्षणक्रम व ते राबविणारी विद्यालये यांचा समावेश या यादीत केला आहे. या यादीत राज्यातील शिक्षणसंस्थांचा प्रामुख्याने अंतर्भाव करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही, एखादी महत्त्वपूर्ण संस्था किंवा शिक्षणक्रम यांचा उल्लेख अनवधानाने राहिला असल्यास तसे जरूर निदर्शनास आणून द्यावे, जेणेकरून वाचक विद्यार्थ्यांना करिअर संधी निवडताना उपयोग होईल.
या व्यतिरिक्त आय.आय.टी., टी.आय.एफ.आर., होमी भाभा सायन्स सेंटर या विज्ञान संस्थांच्या संकेतस्थळांच्या संपर्कात राहिल्यास या संस्थांमध्ये नियमितपणे आयोजित केल्या जाणाऱ्या गणित व विज्ञान विषयक कार्यक्रमांची माहिती या विषयांत विशेष रूची असणाऱ्या विद्यार्थी-पालकांना मिळू शकेल.
संग्रहित लेख, दिनांक 6th May 2013 रोजी प्रकाशित
गणित विषयातील करिअर संधी
गणितात रुची आणि गती असेल तर त्यासंबंधित विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. किंबहुना काही अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना गणित उत्तम येणे आवश्यक ठरते. गणिताशी संबंधित क्षेत्रे आणि अभ्यासक्रमांची माहिती -
First published on: 06-05-2013 at 12:49 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career oppoturnity in mathematical field