करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना सतावत असतात. या व्यासपीठावर तुमच्या प्रातिनिधिक आणि निवडक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
करिअर मंत्र.  अभ्यासक्रमांसंदर्भातील तुमच्या शंका आम्हांला कळवा. तुमचे प्रश्न, शंका आम्हाला career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर जरूर कळवा अथवा करिअर वृत्तान्त, लोकसत्ता, संपादकीय विभाग, ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१० या पत्त्यावर लिहून पाठवा.
मला  सायबर आणि नेटवर्क सिक्युरिटी या विषयांमध्ये रस असून या क्षेत्रात मला करिअर करायचे आहे?
– सागर बागूल.
सायबर सिक्युरिटीशी संबंधित अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
१. पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायबर लॉ – नॅशनल लॉ इन्स्टिटय़ूट युनिव्हर्सिटी, भोपाल या संस्थेने हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा आहे.
पत्ता- नॅशनल लॉ इन्स्टिटय़ूट युनिव्हर्सिटी, भोपाल आणि राजीव गांधी प्रौद्योगिकी विश्वविद्यालय, भोपाळ ४६२०४४.
वेबसाइट- http://www.nliu.ac.in
२. मास्टर ऑफ सायन्स इन सायबर लॉ अ‍ॅण्ड इन्फम्रेशन सिक्युरिटी – नॅशनल लॉ इन्स्टिटय़ूट युनिव्हर्सिटी, भोपाल या संस्थेनं पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायबर लॉ हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षांचा आहे.
३. मास्टर ऑफ सायन्स इन सायबर लॉज अ‍ॅण्ड इन्फम्रेशन सिक्युरिटी- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फम्रेशन टेक्नालॉजी, अलाहाबाद या संस्थेनं हा अभ्यासक्रम सुरू केलाय. अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन वष्रे. अर्हता- बीई, बीटेक, एलएल. बी. अभ्यासक्रम सुरू केला आहे. संपर्क- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी, देवघाट, अलाहाबाद २११०१२. मेल- anurika@iiita.ac.in वेबसाईट- http://www.iiita.ac.in
४. पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी – इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी या संस्थेनं हा अभ्यासक्रमसुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही शाखेतील पदवीधरांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षांचा आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधराला हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशचाचणी घेतली जात नाही.
पत्ता- आयएमटी सेंटर फॉर डिस्टन्स एज्युकेशन लìनग, ए- १६, एसआयटीई-३, यूपीएसआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, मीरत रोड, गाझियाबाद. मेल- admission@imtcdl.ac.in  किंवा cybersecurity@imtcdlac.in
वेबसाइट – http://www.imtcd.ac.in
याच संस्थेने एमएस इन सायबर लॉ अ‍ॅण्ड सिक्युरिटी- दोन वष्रे आणि पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायबर लॉ अ‍ॅण्ड सिक्युरिटी- एक वर्ष कालावधीचे अभ्यासक्रमसुद्धा सुरू केले आहेत.
५. डिप्लोमा इन सायबर लॉ- देशातील सर्वात जुन्या असलेल्या मुंबई येथील शासकीय विधी महाविद्यालयाने डिप्लोमा इन सायबर लॉ हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात ऑनलाइन शेअर ट्रेिडग, ऑनलाइन बँकिंग, ऑनलाइन टिकेट बुकिंग, क्रेडिट कार्ड ट्रान्झ्ॉक्शन, ई-फििलग ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न्‍स, ई-फििलग ऑफ कंपनी रिटर्न्‍स, डिजिटल सिग्निचर, हॅॅकिंग, सायबर पोर्नोग्रॉफी, म्युझिक पायरसी, सॉफ्टवेअर पायरसी, सायबर क्राइम आणि डिजिटल एव्हिडन्स, सायबर स्पेस, ई कॉमर्स आणि लीगल इश्युज, फंडामेंटल ऑफ सायबर लॉ यावर भर देण्यात आला आहे.  
हा अभ्यासक्रम सायबर कॅफेचे मालक, नेटीझन्स, अभियांत्रिकी, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेचे विद्यार्थी, बँक कर्मचारी, कंपनी सचिव, लेखा परीक्षक, नेटवर्क आणि सिस्टीम अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, आयटी सिक्युरिटी प्रोफेशनल्स, पोलीस, आयटी प्रोफेशनल्स, कायदा अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि वकील यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. पत्ता- शासकीय विधी महाविद्यालय, ए रोड चर्चगेट मुंबई- ४०००२०. ई-मेल- info@asianlaws.org. वेबसाइट- http://www.glc.edu  आणि एशियन स्कूल ऑफ सायबर लॉ, वेबसाइट- http://www.asianlaws.org अर्ज व माहितीपत्रक वेबसाइटवर ठेवण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम शासनमान्य आहे. या अभ्यासक्रमासाठी ओपन बुक एक्झामिनेशन ही पद्धत अवलंबण्यात येते. आठवडय़ातून फक्त शुक्रवारी हा अभ्यासक्रम शिकवला जातो.
६. एम एस इन सायबर लॉ अ‍ॅण्ड सिक्युरिटी – नालसार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ या संस्थेनं हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्ष. हा अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील पदवीधराला करता येतो. पत्ता- द को-आíडनेटर एनएएलएसएआर बरकतपुरा, हैद्राबाद २७, मेल-admission@nalsar.org, वेबसाइट – http://www.nalsar.ac.in  
७. गुजरात फोरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी-  या संस्थेने डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. (अर्हता- ५५ टक्के गुणांसह कला/ वाणिज्य/ विज्ञान/ तंत्रज्ञान/ अभियांत्रिकी विषयातील पदवी/ कालावधी- सहा महिने), पत्ता-गुजरात फोरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी, सेक्टर-१८, ए, डीएफएस-पोलीस भवन, गांधीनगर. वेबसाइट- http://www.gfsu.edu.in
८. सर्टििफकेट कोर्स इन सायबर सिक्युरिटी अ‍ॅण्ड कॉम्प्युटर फोरेन्सिक – हा अभ्यासक्रम नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फायनान्शिएल मॅॅनेजमेंट या संस्थेनं सुरू केला आहे. ही संस्था केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहे. कालावधी- तीन महिने/ अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी/ निवड-चाळणी परीक्षेद्वारे. पत्ता- नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फायनान्शिएल मॅनेजमेंट, फरिदाबाद- हरियाणा.
वेबसाइट- http://www.nifm.ac.in
प्रश्न- मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचे आहे?    
– रोशन राजपूत
उत्तर- चित्रपट दिग्दर्शनाचा अभ्यासक्रम पुणे येथील फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया येथे शिकवला जातो. या अभ्यासक्रमाला प्रवेशपरीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो.
पत्ता-लॉ कॉलेज रोड, पुणे- ४११००४.
वेबसाइट- http://www.ftiindia.com
सुभाष घई यांनी मुंबई येथे सुरू केलेल्या व्हिसिलग वूड या संस्थेतही दिग्दर्शनाचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. पत्ता- व्हीसिलग वूड्स इंटरनॅशनल, फिल्मसिटी कॉम्प्लेक्स,
गोरेगाव (पूर्व) मुंबई-४०००६५.
ई-मेल- counselor@ whistlingwoods.net  वेबसाइट-  http://www.whistlingwoods.net
मी सध्या अकरावी सायन्समध्ये शिकत आहे. मला अभ्यासाचे नीट नियोजन करता येत नाहीए.  अभ्यासाचं नियोजन कसं असावं याबद्दल मार्गदर्शन कराल का?
-राहुल खेडकर, गेवराई, जि. बीड.
अभ्यासाचं नीट नियोजन करणं तसं सोपं आहे. पुढील करिअरच्या दृष्टीने अकरावी-बारावीचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे या दोन वर्षांत कोणत्याही प्रकारे वेळ वाया जाणार नाही, हे बघायला हवे. सिनेमा, टीव्ही, हुंदडणे, व्हॉट्स-अप, फेसबुक या साऱ्यांवर फुली मारायला हवी. सहा तास झोप अवश्य घ्यावी आणि अर्धा तास व्यायाम करावा. दिनक्रमातील आवश्यक बाबी वगळता अधिकाधिक वेळ अभ्यासासाठी द्यायला हवा. शाळा- शिकवणी सोडून जर वेळ उपलब्ध होत असेल तर किमान सहा-सात तास अभ्यास करायला हवा. अभ्यासाचे वेळापत्रक लिहून काढावे. वेळापत्रकातील विषयांवर त्या-त्या वेळेस लक्ष केंद्रित करावे. कोणताही भाग वगळू नये. ज्या विषयाची किंवा अभ्यासक्रमाची भीती वाटते,  तो समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा. मुख्य म्हणजे पाठांतरापेक्षा संकल्पना स्पष्टपणे समजून घ्याव्यात. त्यात थोडा अधिक वेळ गेला तरी सार्थकी लागला, असे समजावे. सुटी मिळेल तेव्हा किमान १२ ते १४ तास अभ्यास करावा. सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी वेळ काढावा.
 गरजू विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावेसे वाटते. कृपया मार्गदर्शन करावे?
– अमृता सुरवसे
गरीब वस्तींमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करता येईल. तुमच्या घराजवळील शाळेत जाऊन मुख्याध्यापकांच्या परवानगीने दहावी वा इतर इयत्तांच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करता येईल.
प्रश्न- मी टीवायबीएस्सी मायक्रोबॉयलॉजी या विषयाची विद्याíथनी आहे. मला सर्व सत्रांमध्ये प्रथमश्रेणी मिळालेली आहे. पण या क्षेत्रात करिअरच्या अत्यल्प संधी असल्याने मी एमएसस्सी किंवा संबधित विषयांमध्ये पुढील शिक्षण घेण्यास उत्सुक नाही. त्यामुळे  मी ह्य़ुमन रिसोर्स मॅनेजमेंट या विषयात पदविका करू इच्छिते.
हा विषय माझ्यासाठी मायक्रोबायोलॉजीपेक्षा फायदेशीर किंवा उपयुक्त ठरू शकेल का?
  – शलाका कदम.                              
कोणताही विषय कमी अथवा जास्त महत्त्वाचा नसतो. आपल्याला कशात रस आहे, हे कळणं आवश्यक ठरतं. कुणाच्या सांगण्यावरून या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असेल तर आता एक वर्ष झाल्यावर निश्चितपणे आपण विषय समजून घेण्यात कितपत पाण्यात आहोत, हे लक्षात आले असेलच. तुम्हाला सर्व विषयांत प्रथमश्रेणी मिळाली, याचा अर्थ तुम्हाला हा विषय नक्कीच समजत असावा आणि त्यात तुम्हाला गोडीही निर्माण झालेली असावी. अशा स्थितीत पुन्हा नवा विषय घेण्यात काही हशील दिसत नाही. शिवाय मायक्रोबॉयलॉजीमध्ये पुढे संधी नाही, असे मानण्याचे अजिबातच कारण नाही. आज प्रत्येक विषयातील चांगल्या तज्ज्ञ आणि प्रशिक्षित व्यक्तींची गरज भासतेच भासते, ही बाब कायम लक्षात ठेवावी. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा अभ्यासक्रमही करिअरच्या संधी उपलब्ध करून देतो. पण असे अनंत विषय आहेतच की. प्रत्येक वेळेस एक विषय सोडून दुसरा विषय धरायचा हेसुद्धा योग्य ठरणारे नाही.
career.vruttant@expressindia.com

Story img Loader