माझे बी.ई. पूर्ण झाले आहे. पण आमच्या महाविद्यालयात कॅम्पस रिक्रुटमेन्टसाठी कंपन्या आल्या नाहीत. मी पुढे काय करू?
– सविता जवांजकलकर
अनेक विद्यार्थ्यांना या प्रश्नाला सामोरं जावं लागतं. कॅम्पस नियुक्तीसाठी येणाऱ्या कंपन्या या महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता, पूर्वपरंपरा अशा विविध बाबींचा विचार करतात. त्यामुळेच खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना पालक-विद्यार्थ्यांनी याची काळजी प्रारंभीच घेतलेली बरी. तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे- तुम्ही ‘गेट’ देऊन एम.टेक्. किंवा एम.ई. करू शकता. त्यानंतर संशोधन वा शैक्षणिक क्षेत्रात करिअर करता येऊ शकते. एम.बी.ए. करून कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांच्या व्यवस्थापकीय कार्यासाठी निवड होऊ शकते. मात्र एम.बी.ए. दर्जेदार महाविद्यालयांमधूनच करायला हवे. त्यासाठी ‘सीईटी’मध्ये उत्तम गुण मिळवणे आवश्यक आहे.
मी आता दूर शिक्षणाद्वारे बी.ए. (अर्थशास्त्र) करतोय. मला शेअर मार्केटिंगमध्ये एम.बी.ए. करायचंय. त्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत? एम.बी.ए.ला प्रवेश घेण्यासाठीचे
निकष कोणते?
– अभिजीत पवार
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इन्स्टिटय़ूटने (बीएसई) एम.बी.ए. इन फायनान्शिएल मार्केट्स हा दोन वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम बी.एस.ई.च्या परिसरात शिकवला जातो. वित्तीय बाजारपेठेविषयी विविध प्रकारची माहिती या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना दिली जाते. येत्या तीन वर्षांत देशाला या क्षेत्रातील चार लाखांहून अधिक तज्ज्ञांची गरज भासण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
एम.बी.ए. अभ्यासक्रमासाठी अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण पदवीधर या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र आहे. प्रवेशासाठी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटच्या विविध कॅम्पससाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेचे गुण ग्राह्य़ धरले जातात किंवा संस्थेतर्फे होणाऱ्या प्रवेशपरीक्षेला विद्यार्थ्यांना बसावे लागते. या परीक्षेमध्ये अॅनालिटिकल रिझिनग, लॉजिकल रिझिनग, क्वॉन्टिटेटिव्ह अॅप्टिटय़ूूड, व्हर्बल अॅप्टिटय़ूड या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
संपर्क- बीएसई इन्स्टिटय़ूट लिमिटेड, १८ वा मजला, पी. जे टॉवर्स, दलाल स्ट्रीट, मुंबई-४००००१
ईमेल- admissions@bseindia.com
पुण्याच्या सिम्बॉयसिस संस्थेने ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनान्शियल मॅनेजमेंट’ हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. भारती विद्यापीठाने दोन वष्रे कालावधीचा ‘एम.बी.ए. इन फायनान्शियल मार्केट्स’ हा अभ्यासक्रम सुरू
केला आहे.
मला दहावीच्या परीक्षेत ६८.८० टक्के पडले असून मला अंतराळ संशोधन या विषयाचा अभ्यास करायचा आहे. मला कोणत्या विद्याशाखेत प्रवेश घ्यावा लागेल?
– शुभम चौघुले
तुम्ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित घेऊन बारावी विज्ञान शाखेची परीक्षा उत्तम मार्कानी उत्तीर्ण व्हा. जेईई-मेन आणि जेईई-अॅडव्हान्स्ड या दोन्ही परीक्षांमध्ये चांगले मार्क मिळवा. तुम्हाला आय.आय.टी. किंवा इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी या संस्थेत अंतराळ संशोधन या विषयाशी निगडित वेगवेगळे अभ्यासक्रम करता येतील.
मी अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आहे. मला सॉफ्टवेअर इंजिनीअिरगमध्ये करिअर करायचे आहे. मी पुढे काय करू?
– व्यंकटेश उदावंत
बारावीमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या विषयांत किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. शिवाय ‘जेईई-मेन’मध्ये चांगले गुण मिळवल्यास शासकीय अभियांत्रिकी किंवा दर्जेदार खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सामायिक प्रवेश प्रक्रियेद्वारे कॉम्प्युटर इंजिनीअिरग अथवा इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांना प्रवेश
मिळू शकेल.
मी कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक्. करीत आहे. मला प्रोग्रॅिमगमध्ये रस आहे. पण अनेकांचे सांगणे आहे की, कॉम्प्युटरमध्ये काही संधी नाही. भविष्यात प्रोग्रॅिमग या विषयात नोकरीच्या संधी आहेत का?
– मयूर मोरे
यासंदर्भात मी असे म्हणेन की, ऐकावे जनाचे करावे मनाचे. जर तुम्हाला प्रोग्रॅिमगमध्ये रस असेल तर या विषयात तुम्ही नक्कीच प्रगती करू शकाल. सर्वच विषयांना उत्तम संधी असते, हे लक्षात ठेवावे. मात्र आपले त्या विषयातील ज्ञान खणखणीत हवे. तसे नसेल तर कशालाच संधी नाही, हेही तितकेच खरे.
मी फार्मसीमध्ये पदवी घेतली प्राप्त केली आहे. या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची माहिती द्याल का? ‘एम.बी.ए. फार्मा’ हा अभ्यासक्रम मुंबईतील कोणत्या महाविद्यालयांमध्ये शिकवला जातो?
– श्वेता घाग
फार्मसीच्या विविध शाखा (उदा. फार्माकॉलॉजी, फार्मास्युटिक्स, फार्माकोग्नॉसी, फार्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजी या विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेता येईल. नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स या संस्थेने ‘एम.बी.ए. इन फार्मा’ हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वष्रे असून अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नरसी मोनजी मॅनेजमेंट अॅप्टिटय़ूड टेस्ट द्यावी लागते. वेबसाइट- nmat.org.in
माझी मुलगी वैद्यकीय शाखेमध्ये करिअर करू इच्छिते. मात्र तिला प्रवेश परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाले नाहीत. वैद्यक क्षेत्राशी संबंधित अन्य अभ्यासक्रमांची माहिती द्याल का?
– वीरेन ठेंगे, अंबरनाथ
आपल्या मुलीला वैद्यकीय क्षेत्रातच करिअर करायचे असल्यास, एम.बी.बी.एस. व्यतिरिक्त अनेक क्षेत्रे उपलब्ध आहेत. उदा- बी.ए.एम.एस. (आयुर्वेद), बी.एस.एम.एस. (होमिओपथी), बी.डी.एस. (दंतवैद्यक), फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन, बी.एस्सी.- नìसग, फार्मसी या अभ्यासक्रमांचा विचार करता येईल. या सर्व अभ्यासक्रमांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय घेऊन बारावी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो.
आपल्या मुलीला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असल्याने तिने जीवशास्त्र हा विषय घेतला असावा. त्यामुळे बी.एस्सी.- जीवशास्त्र या शाखेत प्रवेश घेऊन पुढे एम.एस्सी. प्राणीशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र या विषयांमध्ये करता येते. शिवाय या विषयांतर्गत स्पेशलायझेशनचा विषय निवडल्यास पीएच.डी.सुद्धा करता येते. एम.एस्सी. पीएच.डी. असेही अभ्यासक्रम आता सुरू झाले आहेत. त्यासाठी केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीही आहेत. विविध संशोधन प्रकल्प, प्रयोगशाळांमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. जीवशास्त्रासोबतच गणित हाही विषय जर घेतला असेल तर बी.एस्सी. बायोटेक्नॉलॉजी आणि त्यांनतर याच विषयात एम.एस्सी.सुद्धा करता येते. बी.ई. इन बायोटेक्नॉलॉजी हासुद्धा पर्याय आहेच. मात्र तिला नेमके काय शिकायला आवडेल, याची खात्री करून नंतरच अभ्यासक्रम निश्चित करावा.
(आपले करिअर निवडीसंबंधीचे अथवा अभ्यासक्रमांविषयीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवावेत.)