माझे बी.ई. पूर्ण झाले आहे. पण आमच्या महाविद्यालयात कॅम्पस रिक्रुटमेन्टसाठी कंपन्या आल्या नाहीत. मी पुढे काय करू?
– सविता जवांजकलकर
अनेक विद्यार्थ्यांना या प्रश्नाला सामोरं जावं लागतं. कॅम्पस नियुक्तीसाठी येणाऱ्या कंपन्या या महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता, पूर्वपरंपरा अशा विविध बाबींचा विचार करतात. त्यामुळेच खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना पालक-विद्यार्थ्यांनी याची काळजी प्रारंभीच घेतलेली बरी. तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे- तुम्ही ‘गेट’ देऊन एम.टेक्. किंवा एम.ई. करू शकता. त्यानंतर संशोधन वा शैक्षणिक क्षेत्रात करिअर करता येऊ शकते. एम.बी.ए. करून कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांच्या व्यवस्थापकीय कार्यासाठी निवड होऊ शकते. मात्र एम.बी.ए. दर्जेदार महाविद्यालयांमधूनच करायला हवे. त्यासाठी ‘सीईटी’मध्ये उत्तम गुण मिळवणे आवश्यक आहे.
मी आता दूर शिक्षणाद्वारे बी.ए. (अर्थशास्त्र) करतोय. मला शेअर मार्केटिंगमध्ये एम.बी.ए. करायचंय. त्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत? एम.बी.ए.ला प्रवेश घेण्यासाठीचे
निकष कोणते?
– अभिजीत पवार
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इन्स्टिटय़ूटने (बीएसई) एम.बी.ए. इन फायनान्शिएल मार्केट्स हा दोन वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम बी.एस.ई.च्या परिसरात शिकवला जातो. वित्तीय बाजारपेठेविषयी विविध प्रकारची माहिती या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना दिली जाते. येत्या तीन वर्षांत देशाला या क्षेत्रातील चार लाखांहून अधिक तज्ज्ञांची गरज भासण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
एम.बी.ए. अभ्यासक्रमासाठी अर्हता- कोणत्याही विद्याशाखेतील ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण पदवीधर या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र आहे. प्रवेशासाठी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटच्या विविध कॅम्पससाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेचे गुण ग्राह्य़ धरले जातात किंवा संस्थेतर्फे होणाऱ्या प्रवेशपरीक्षेला विद्यार्थ्यांना बसावे लागते. या परीक्षेमध्ये अॅनालिटिकल रिझिनग, लॉजिकल रिझिनग, क्वॉन्टिटेटिव्ह अॅप्टिटय़ूूड, व्हर्बल अॅप्टिटय़ूड या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
संपर्क- बीएसई इन्स्टिटय़ूट लिमिटेड, १८ वा मजला, पी. जे टॉवर्स, दलाल स्ट्रीट, मुंबई-४००००१
ईमेल- admissions@bseindia.com
पुण्याच्या सिम्बॉयसिस संस्थेने ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनान्शियल मॅनेजमेंट’ हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. भारती विद्यापीठाने दोन वष्रे कालावधीचा ‘एम.बी.ए. इन फायनान्शियल मार्केट्स’ हा अभ्यासक्रम सुरू
केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा