मला बीएस्सी. कृषी अभ्यासक्रम करायचा आहे. अकोला विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांची तसेच प्रवेश प्रक्रियेची माहिती द्यावी.                                          
 – प्रणय जोल्हे
पंजाबराव कृषी विद्यापीठांतर्गत आठ शासकीय आणि २० विनाअनुदानित कृषी महाविद्यालयांचा समावेश होतो. शासकीय महाविद्यालये पुढीलप्रमाणे आहेत –
० कृषी महाविद्यालय, अकोला- ४४४१०४
० कृषी महाविद्यालय,
नागपूर- ४४४००१
० कृषी महाविद्यालय सोनापूर, गडचिरोली- ४४२६०५
० श्री शिवाजी कृषी महाविद्यालय,
अमरावती- ४४४४०३
० आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा जिल्हा,
चंद्रपूर- ४४२९१४
० उद्यानविद्या महाविद्यालय, अकोला- ४४४१०४
० वनशास्त्र महाविद्यालय, अकोला- ४४४१०४
० कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय,
अकोला- ४४४१०४
 बीएस्सी. (कृषी) हा अभ्यासक्रम चार वर्षे कालावधीचा असून तो आठ सत्रांमध्ये विभाजित केलेला असतो. अर्हता- बारावी विज्ञान परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी हे विषय घेणे आवश्यक आहे.
संकेतस्थळ- http://www.mcaer.org किंवा maha-agriadmission.in
यंदाची प्रवेश प्रक्रिया २५ जून २०१४ रोजी संपली आहे. प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन मंडळ, पुणेमार्फत राबवली जाते. पत्ता : १३२- बी, भांबुर्डा, भोसलेनगर, पुणे- ४११००७

मी यशवंतराव मुक्त विद्यापीठामधून बी.कॉम. करत आहे. मी एम.बी.ए. करू का?
– अजित गौरव
तुम्ही एम.बी.ए. करू शकता. मात्र चांगल्या, नामांकित संस्थेमध्ये प्रवेश मिळायला हवा. अन्यथा प्लेसमेंट मिळणे जवळपास अशक्य असते. बी.कॉम. करत असताना अकौंटन्सी या विषयाचे परिपूर्ण ज्ञान मिळवल्यास अकौंटंट म्हणूनही करिअर करता येऊ शकते. एम.कॉम. आणि पुढे नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन प्राध्यापकसुद्धा होता येईल. राज्य आणि लोकसेवा आयोगाच्या परीक्षासुद्धा देता येतील. मात्र त्यासाठी परिश्रम करणे आवश्यक ठरते.

  मी बी.टेक्. कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमाला आहे. मला न्युरोसायन्स क्षेत्रात रस आहे. या विषयात एम.टेक्. आणि एम.एस. करण्यासाठी कोणत्या संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकेल?
– विवेक सालेय, नांदेड</strong>
न्युरोसायन्स हा विषय वैद्यकीय शास्त्राशी निगडित आहे. आपल्याला या टप्प्यावर या विषयांमध्ये प्रवेश मिळू शकणार नाही.

 माझा पाल्य या वर्षी पाचवीमध्ये आहे. त्याला रोबोटिक्समध्ये आवड आहे. दहावी किंवा बारावीनंतर त्याने कुठल्या विद्याशाखेची निवड करावी?
– मनोज जगदाळे
रोबोटिक्सचा अभ्यासक्रम हा पदवी आणि पदव्युत्तर पातळीवरील आहे. त्यामुळे त्याला बारावीनंतर उत्तम अभियांत्रिकी संस्थेमध्ये प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करावा. भौतिकशास्त्र आणि गणितामध्ये गती असलेले विद्यार्थी रोबोटिक्समध्ये उत्तम करिअर करू  शकतात.

मी बी.डी.एस. केले आहे. मला ‘मेडिकल टुरिझम’ या विषयात अभ्यासक्रम करायचा आहे. त्यासाठी राज्यातील तसेच आणि इतर राज्यातील चांगल्या विद्यापीठांची माहिती द्यावी.
– दीप्ती मुसमाडे
मेडिकल टुरिझम हा विषय पर्यटन आणि स्पेशलाइज्ड वैद्यकीय सेवेशी संबंधित आहे. भारतासारख्या देशात उत्तम आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा विकसित देशांच्या तुलनेत कमी किमतीमध्ये उपलब्ध असल्याने वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येणाऱ्या रुग्ण-पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि मोठय़ा खासगी रुग्णालयांनी मेडिकल टुरिझमला प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे तज्ज्ञ आणि स्पेशलाइज्ड डॉक्टरांकडे परदेशातील रुग्ण उपचारांसाठी येऊ शकतात. आपण आपल्या विषयामध्ये स्पेशलायझेशन केल्यास आपल्याला अधिक उत्तमोत्तम संधी प्राप्त होऊ शकतात. आपण खास असा ‘मेडिकल टुरिझम’चा अभ्यासक्रम करण्याची गरज नाही. तथापि, ‘इंडियन क्लिनिकल रिसर्च इन्स्टिटय़ुट’ने ‘सर्टििफकेट इन मेडिकल टुरिझम’ हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा तीन महिने कालावधीचा अभ्यासक्रम आहे. पत्ता- सी ९, सेंट्रल रोड नंबर २२, एमआयडीसी इंडस्ट्रिअल एरिआ, मरोळ, अंधेरी पूर्व,
मुंबई- ४०००९३. वेबसाइट- http://www.icriindia.com  

 इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च (्र२ी१) च्या प्रवेशप्रक्रियेची माहिती देता येईल का?
– विवेक सातपुते, चिपळूण
इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च या  संस्थेची अ‍ॅप्टिटय़ुड टेस्ट २० जुल २०१४ रोजी पुणे येथे घेतली जाईल. या संस्थेचा अभ्यासक्रम बी एस-एम एस या नावाने ओळखला जातो. हा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला दरमहा पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. या संस्थेचे कॅम्पस कोलकाता, पुणे, भोपाळ, मोहाली आणि थिरुवनंतपुरम येथे आहेत. या संस्थांमध्ये एकूण ९५० प्रवेशजागा आहेत. पत्ता- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, पहिला मजला, सेंट्रल टॉवर, ट्रिनिटी, साई बििल्डग, गरवारे सर्कल, सुतारवाडी, पाषाण, पुणे- ४११०२१.
वेबसाइट-www.iiserpune.ac.in        
ई-मेल- webmaster@iiserpune.ac.in

मी २०११ साली बी.बी.ए. केले. त्यानंतर मी स्पर्धापरीक्षेसाठी तयारी करत आहे. पण यश मिळाले नाही. आता मी कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ, म्हणजे मला नोकरी मिळू शकेल?
– चेतन चव्हाण, अमरावती</strong>
तुम्ही बी.बी.ए. केल्यावर चांगल्या नामांकित संस्थेमधून एम.बी.ए. करणे गरजेचे होते. चांगल्या संस्थांमध्ये प्लेसमेंटच्या अनेक संधीही उपलब्ध होतात. तुम्ही तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षा देत असूनही यश मिळत नाही, याचा अर्थ तुमची तयारी योग्यरीतीने होत नाही, असाच होतो. सध्या पारंपरिक पद्धतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची संधी कमीच आहे. आपला जो कोणता विषय असेल त्याच्या संकल्पना संपूर्णपणे समजून घेतल्या नाही तर प्रश्न सोडवणे कठीण जाऊ शकते. स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीही गेल्या काही वर्षांत बदललेल्या आहेत. वस्तुनिष्ठ पद्धतीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये चार पर्यायांपकी आता चारच्या चारही योग्य उत्तरे दिली जातात. त्यातून अधिक अचूक पर्याय निवडावा लागतो. पाठांतरापेक्षा विषयाचे आकलन, तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता, अचुकता याकडे लक्ष दिले जाते. अभ्यास करताना दर्जेदार साहित्यसामग्री मिळवून त्याचे व्यवस्थित वाचन, मनन करावे लागते. तुम्ही ‘आता नवा कोणता अभ्यासक्रम केल्यास नोकरी मिळू शकेल,’ असे विचारले आहे. कोणताही अभ्यासक्रम उत्तमच असतो. मात्र त्यात आपण पूर्णपणे ज्ञान मिळवले असेल तरच संधी मिळू शकते. विद्यापीठाने किती टक्के गुण दिले हे महत्त्वाचे ठरत नाही. ही बाब लक्षात ठेवावी. आपल्या आíथक आणि बौद्धिक क्षमतेचे आपण स्वत: वस्तुनिष्ठपणे मूल्यमापन करावे. हे मूल्यमापन सकारात्मक असल्यास आपल्याला अर्हतेनुसार दर्जेदार संस्थेमध्ये एमबीएसाठी प्रवेश मिळतो का, यासाठी प्रयत्न करावा.   
(आपले करिअर निवडीसंबंधीचे अथवा अभ्यासक्रमाविषयीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com
या पत्त्यावर पाठवावेत.)

Story img Loader