नॅशनल एअरोस्पेस लॅबोरेटरीज, बंगळूरु

कर्नाटकमधील बंगळुरू येथे असलेली नॅशनल एअरोस्पेस लॅबोरेटरीज (एनएएल) ही एअरोस्पेस म्हणजेच विमानांची निर्मिती व त्यातील संशोधन करणारी संस्था आहे. एअरोस्पेस व संबंधित विषयांमधील प्रगत संशोधनावर लक्ष केंद्रित करताना अद्ययावत आणि अतिशय उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरणाऱ्या जगातील मोजक्या संशोधन संस्थांमध्ये नॅशनल एअरोस्पेस लॅबोरेटरीजला गणले जाते. भारतात नागरी विमानांची निर्मिती करण्याची मुख्य जबाबदारी या संस्थेकडे आहे. एनएएल एकाच वेळी विमान व अवकाशक्षेत्रातील जागतिक दर्जाची संशोधन संस्था व व्यावसायिकदृष्टय़ा कंपनी म्हणूनही काम करते.

Forest Minister Ganesh Naik assurance regarding the name of Navi Mumbai International Airport
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव; वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Helpline launched for injured birds on the occasion of Makar Sankranti mumbai news
पक्ष्यांवर ‘संक्रांत’… जखमी पक्ष्यांसाठी मदत क्रमांक सुरू
Investiture Ceremony Indian Army , Indian Army,
व्यावसायिकतेत लष्कर शिखरावर
Gold, charas, ganja, Mumbai airport,
मुंबई विमानतळावर सोने, चरस, गांजा जप्त
Permission , robotic parking lot, Mumbadevi,
मुंबादेवीतील अत्याधुनिक रोबोटिक वाहनतळाच्या कामाला परवानगी द्यावी, मुंबई महापालिकेचे राज्य सरकारला साकडे
pune Municipal Corporation plans to open Pimpri flyover by March
पिंपरी : डेअरी फार्म येथील उड्डाणपूल मार्चअखेर खुला?
Indian Armed Forces are undergoing bold transformation and consolidation of services.
सशस्त्र दलातील सुधारणांचे वारे कसे असणार ?

संस्थेविषयी –

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने  (सीएसआयआर) नॅशनल एअरोस्पेस लॅबोरेटरीज (एनएएल) या संशोधन संस्थेची स्थापना १९५९ साली दिल्ली येथे केली. नंतर १९६० मध्ये या संस्थेला बंगळुरू येथे हलविण्यात आले. एनएएल ही संस्था एअरोस्पेस या शाखेमध्ये संशोधन आणि विकसाचे (आर अँड डी) कार्य करणारी व सीएसआयआरशी जोडली गेलेली देशामधील एकमेव शासकीय प्रयोगशाळा तसेच देशातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. (पहिल्या क्रमांकाची कंपनी असलेली हिंदुस्तान एरोनॉटिक्स -एचएएल ही शासकीय कंपनी असून सीएसआयआरशी संलग्न संस्था नाही)

भारतात नागरी विमानांची निर्मिती करण्याची मुख्य जबाबदारी या संस्थेकडे असून ही संस्था एचएएल, डीआरडीओ आणि इस्रो या जागतिक दर्जाच्या संशोधन संस्थांबरोबर काम करते. एअरोस्पेसमधील दर्जात्मक व गुणात्मकदृष्टय़ा सरस असलेले संशोधन व तंत्रज्ञान विकसित करणे, लघु व मध्यम आकाराच्या नागरी विमानांची बांधणी व निर्मिती करणे, राष्ट्राच्या एअरोस्पेस क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य देणे या हेतूंनी एनएएलची स्थापना केली गेली. संस्थेचे सुरुवातीचे नाव नॅशनल एरॉनॉटिकल लॅबोरेटरी असे होते. नंतर भारतीय अवकाश कार्यक्रमात तिचा सहभाग वाढावा व बहुआयामी कामगिरी जागतिक स्तरावर दाखवता यावी म्हणून या संशोधन संस्थेचे नाव बदलण्यात आले. भारताची एकमेव नागरी एरोस्पेस प्रयोगशाळा असलेली ही संस्था आपल्या एकूण १५०० कर्मचाऱ्यांच्या सर्वोत्कृष्ट क्षमतेसह आपली वाटचाल करत आहे ज्यामध्ये तब्बल साडेतीनशे जागतिक दर्जाच्या शास्त्रज्ञांचा समावेश आहे.

संशोधनातील योगदान –

एनएएल ही असैनिकी विमाने निर्मिती व संशोधन, अवकाश संशोधन व ग्लोबल पोझिशनिंग या क्षेत्रांमध्ये संशोधन करणारी संस्था आहे. संस्थेने विकसित केलेले ‘हंस’ हे अतिशय कमी वजनाचे प्रशिक्षण विमान, ‘सरस’ हे देखील किमान वजनाचे व चौदा आसनक्षमता असलेले बहुपर्यायी विमान तसेच वैयक्तिक वापराकरता अतिमहत्त्वाच्या व्यक्तींकडून वापरले जाणारे व फक्त पाच आसनांची क्षमता असलेले ‘एनएम ५’ हे विमान-  ही सर्व विमाने जगभरात नावाजली गेली आहेत.

या संशोधनाबरोबरच संस्थेने आंतरविद्याशाखीय संशोधनाला (Interdisciplinary research) प्राधान्य देत इतर शाखांमधील मूलभूत संशोधनाशी योग्य समन्वय साधलेला आहे. त्यामुळेच एनएएलमध्ये एअरोस्पेस व विमान निर्मिती क्षेत्राबरोबरच करोजन अँड ट्रायबॉलॉजी, एनर्जी, फंक्शनल मटेरियल्स, नॅनोस्केल, आर्किटेक्चर, सेन्सर्स, स्ट्रर्ड सिरॅमिक्स इत्यादी विषयांत दर्जात्मक व गुणवत्तापूर्ण संशोधन चाललेले असते. एअरोस्पेसमधील ठरावीक उत्पादन विकसित झाल्यानंतर त्याच्या चाचणीसाठी एनएएलमध्ये एअरोस्पेस या विषयातील अनेक प्रगत चाचणी सुविधा आहेत. या केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम चाचण्यांच्या दर्जाच्या आहेत. त्यातील अनेकांना राष्ट्रीय सुविधा म्हणून ओळखले जाते.

विद्यार्थ्यांसाठी संधी –

एनएएलने विद्यार्थ्यांसाठी पदवी, पदविका, पदव्युत्तर व पीएचडी या प्रत्येक स्तरावर स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केलेला आहे. सीएसआयआरच्या तत्त्वप्रणालीनुसार एनएएलमध्ये Academy of Scientific & Innovative Research (अूरकफ) च्या अंतर्गत पदव्युत्तर, पीएचडी व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. एनएएल भारतातील अनेक विद्यापीठांशी मूलभूत विज्ञानातील व इतर आंतरविद्याशाखीय संशोधनासाठी किंवा तत्सम अभ्यासक्रमासाठी संलग्न आहे. दरवर्षी गुणवत्ताप्राप्त अनेक जेआरएफ वा एसआरएफ विद्यार्थी एनएएलमध्ये पीएचडीचे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतात. थोडक्यात शेकडो विद्यार्थी त्यांचे पदवी, पदव्युत्तर, पीएचडी किंवा त्यापुढील स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इथे येत असतात.

संपर्क –

नॅशनल एअरोस्पेस लॅबोरेटरीज, एचएएल एअरपोर्ट रोड,  बंगळुरु, कर्नाटक -५६० ०१७.

दूरध्वनी – (कोडीहळ्ळी कार्यालय) ९१-८०-२५२७ ३३५१/५२/५३/५४.

(बेळूर कार्यालय) ९१-८०-२५२२ ३३५१/५२/५३/५४.

संकेतस्थळ  –  https://www.nal.res.in/

itsprathamesh@gmail.com

 

Story img Loader