हॉटेलात शिरतानाच आपल्याला दिसते ते फ्रंट ऑफिस किंवा दर्शनी विभाग कार्यालय. मोठय़ा दरवाज्यापासून ते रिसेप्शन काऊंटपर्यंतचा आणि त्यामागचाही सर्व व्याप सांभाळणारे हे फ्रंट ऑफिस अत्यंत महत्त्वाचे असते. हॉटेलची प्रतिमा सांभाळणे, हे मुख्य काम असते. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यापासून ते त्यांना निरोप देण्यापर्यंत सगळे काही हे फ्रंट ऑफिस सामावून घेत असते.

हॉटेलच्या मुख्य दारातून प्रवेश केल्यावर जो भाग असतो त्याला लॉबी म्हणतात. मोठे हॉटेल असेल तर दरवाजा उघड-बंद करायला दारवान असू शकतो. हल्ली तर सुरक्षिततेसाठी आणि त्याच्या तपासणीसाठी चक्क सुरक्षारक्षक असतात.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

लॉबीमध्येच असते रिसेप्शन काऊंटर जिथे अभ्यागत नोंदणी करू शकतात. त्यानंतर त्यांना खोली दिली जाते. रिसेप्शन काऊंटर आणि दरवाजा या दोन्हीच्यामध्ये एक बेल डेस्क असते. इथे राज्य असते, बेल कॅप्टनचे. त्याच्या हाताखाली बेल बॉइज काम करत असतात. नोंदणी झालेल्या पाहुण्यांचे सामान त्यांच्या खोलीपर्यंत पोहोचवणे हे बेल बॉयचे मुख्य काम. नोंदणी झाल्यावर रिसेप्शनिस्ट,

सामान घेऊन जायच्या इशाऱ्यासाठी जी बेल

वाजवते, ती बेल कॅप्टनच्या टेबलपाशी वाजते.

म्हणून या जागेला बेल डेस्क म्हणतात. सर्व

बेल-बॉइजच्या हालचालींचे नियंत्रण बेल-कॅप्टनकडे असते.

पंचतारांकित हॉटेल्सच्या लॉबीमध्ये ट्रॅव्हल किंवा हॉस्पिटॅलिटी डेस्कही असतात. ट्रॅव्हल डेस्कवर आपल्याला त्या शहरात फिरण्यासाठी गाडीची किंवा तिकिटांची सोय केली जाऊ शकते. तर हॉस्पिटॅलिटी डेस्कचे काम असते, आलेल्या अभ्यागतांचा उत्कृष्ट पाहुणचार करणे, त्यांना काही तासांकरता मुले सांभाळण्यासाठी मदतनीस हवे असल्यास ते उपलब्ध करून देणे, अतिविशिष्ट पाहुणे येणार असतील तर त्यांच्या स्वागताची, हार-तुरे,आरती आदींची सोय करून ठेवणे.

रिसेप्शन काऊंटरच्या एका बाजूला कॅशिअर्स काऊंटर असतो. इथे बिलांचे काम चालते. सोबतच परदेशी चलनाची देवाणघेवाण, सेफ-डिपॉझिट लॉकर्सचे काम बघणे आदी गोष्टीही कॅशिअरला कराव्या लागतात.

फ्रंट ऑफिसमधले काही विभाग कधीच नजरेला पडत नाहीत. त्यातील एक म्हणजे आरक्षण. हॉटेलातील सर्व खोल्या आरक्षित करण्याचे काम इथेच केले जाते. दुसरे म्हणजे एअरपोर्ट-पिकअप. विमानतळावरून पाहुण्यांना गाडी पाठवणे आणि त्यांची सुखरूप ने-आण करणे. अर्थात, हे काम करणारे कर्मचारी क् वचितच हॉटेलमध्ये दिसतात.

संपूर्ण फ्रंट ऑफिसचा कर्ताधर्ता म्हणजे, फ्रंट मॅनेजर. एका जागी उभे राहून, संपूर्ण लॉबीवर घारीसारखी नजर ठेवून कुठे काय चालले आहे, यावर फ्रंट मॅनेजरचे बारीक लक्ष असते. यासाठी अनुभवी नजर गरजेची आहे. दिसायला सोपे असले तरी हे काम अत्यंत जबाबदारीचे आहे.

हॉटेलमध्ये कोणत्या व्यक्ती येतात, त्या कुठे बसतात, काय करतात, फ्रंट ऑफिसकडून अभ्यागतांना सर्वतोपरी मदत मिळते आहे ना, हे फ्रंट मॅनेजरचे मुख्य काम असते.

हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी हे फ्रंट ऑफिसवर साहाय्यक म्हणून नोकरीला लागतात. पुढे काही वर्षांनी पुरेसा अनुभव गाठीशी बांधल्यावर फ्रंट ऑफिस मॅनेजर बनू शकतात. या वाटचालीचा अवधी हॉटेल आणि व्यक्तीनुसार बदलतो. फ्रंट ऑफिसमध्ये काम करण्यासाठी उत्तम संपर्क कौशल्याची गरज असते. पंचतारांकित हॉटेलात काम करायचे तर सफाईदार इंग्रजी हवे. अनेक भारतीय, परदेशी भाषा बोलता येणे कधीही फायद्याचेच ठरेल. लोककेंद्रित आणि शांत स्वभाव असला की हे काम सोपे जाते. शिवाय तासन्तास उभे राहण्यासाठी तब्येतही उत्तम हवी.

फ्रंट ऑफिसमध्ये काम केलेल्या व्यक्तींना हॉटेलपलीकडे कोणत्याही ग्राहक सेवा संबंधित नोकरीत वाव आहे. निरनिराळ्या व्यक्तींशी कसे बोलावे, कसे वागावे, याचे उत्तम प्रशिक्षण मिळाल्याने बीपीओ, पर्यटन व्यवसाय, विक्री आणि मार्केटिंग, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आदी क्षेत्रांत या व्यक्ती सहज काम करू शकतात.

Story img Loader