बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता (पहिली ते आठवीच्या व्यवस्थापन, सर्व मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित/ विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांसाठी) ही परीक्षा यंदापासून अनिवार्य करण्यात आली आहे. या पुस्तकात या परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा – बालमानसशास्त्र व शिक्षणशास्त्र (अध्यापन), मराठी भाषा, व्याकरण व अध्यापनशास्त्र, इंग्लिश लँग्वेज अॅण्ड मेथडोलॉजी, गणित व अध्यापनशास्त्र – विज्ञान, पर्यावरण, इतिहास – नागरिकशास्त्र व भूगोलासह या विषयांच्या घटक व उपघटकांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. गुण विभागणीनुसार प्रत्येक घटकांवर स्पष्टीकरणासह सराव प्रश्नसंचही देण्यात आले आहेत. परीक्षार्थीना आगामी परीक्षेच्या स्वरूपाची नेमकी कल्पना यावी, यासाठी तीन सराव प्रश्नसंचही देण्यात आले आहेत.
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र – शैक्षणिक व बालमानसशास्त्र, शैक्षणिक मूल्यमापन, शैक्षणिक व्यवस्थापन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व प्राथमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, प्राथमिक शिक्षण आणि समाजाचा सगभाग, नव्या सहस्रकातील प्राथमिक शिक्षण, कृतिसंशोधन प्रक्रिया व नवे उपक्रम या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. मराठी भाषा, व्याकरण व अध्यापनशास्त्रात आकलन, संवाद कौशल्य, मराठीच्या पाठय़पुस्तकांचे ज्ञानशास्त्रीय विश्लेषण, संबोधांची मांडणी, अध्यापनाच्या पद्धती व तंत्रे, भाषा विषयाची विशिष्ट अध्ययन पद्धती, अध्यापनाचे नियोजन व मूल्यमापन, सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न, भाषा व व्याकरण.
इंग्लिश लँग्वेज अॅण्ड मेथडोलॉजी – इंग्रजी भाषा शिकवण्याच्या अध्ययन पद्धती व तंत्रे, दृष्टिकोन, संवाद लेखन, उतारा लेखन, संभाषण, व्याकरण शिकविण्याच्या पद्धती, भाषा कौशल्य, वाचन कौशल्य अवगत होण्यासाठीच्या पद्धती इत्यादी.
गणित व अध्यापनशास्त्र – गणिताचा अभ्यास करण्याचे सूत्र, विभाज्यतेच्या कसोटय़ा, बैजिक राशीची सूत्रे, क्षेत्रफळ, घनफळ व महत्त्वाची सूत्रे, दशांश अपूर्णाक व व्यवहारी अपूर्णाक, घन व घनमूळ, घातांक, वर्ग व वर्गमूळ, काळ, काम व वेग, मसावि व लसावि, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, शेकडेवारी, नफा-तोटा सरासरी, वयवारी, बँका, पोस्टाचे व्यवहार, शेअर बाजार, विक्रीकर, आयकर, मूल्यवर्धित कर, बीजगणित, भूमिती, गणित व अध्यापनशास्त्र.
परिसर अभ्यास आणि अध्यापनशास्त्रामध्ये परिसर अभ्यास, पर्यावरण, सामान्य विज्ञान, महाराष्ट्रातील संत, शिवाजी व शिवकाल, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल – महाराष्ट्र, भारत, जग व अवकाश, परिसर अभ्यास प्रश्नसंच.
शिक्षक पात्रता परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या परीक्षार्थीना हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल, अशी याची रचना करण्यात आली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा – गोपाल दर्जी, प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव, मूल्य – ४४० रु.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा