मी पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांला आहे. मला राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबद्दल विस्तृत माहिती द्याल का?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
– सारंग खोटे
राज्य शासनाच्या वर्ग १ ते वर्ग ३ पदांच्या नियुक्तीसाठी राज्य लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेतल्या जातात. तुझ्या प्रश्नावरून तुला राजपत्रित अधिकारी पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेविषयी माहिती हवी असल्याचे दिसून येते. राज्य सेवा परीक्षेद्वारे उपजिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, विक्रीकर अधिकारी, पोलीस उपअधीक्षक अशा विविध पदांसाठी तीन टप्प्यांमध्ये सामाईक परीक्षा घेतली जाते. प्राथमिक परीक्षेद्वारे मुख्य परीक्षेसाठी निवडक उमेदवारांची निवड केली जाते. पदांच्या संख्येनुसार साधारणत: १० पटींमध्ये उमेदवार मुलाखतीसाठी निवडले जातात. मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमधील गुणांचे एकत्रीकरण करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते. पदांची संख्या, उमेदवारांचा गुणानुक्रम आणि त्याने दर्शवलेला पसंतीक्रम लक्षात घेऊन उमेदवारांची अंतिम निवड केली जाते. या सर्व प्रक्रियेस एक वर्षांचा कालावधी लागू शकतो. दरवर्षी प्रत्येक पदाची भरती केली जातेच असे नाही.
मी बी.ए. करत आहे, पण मला क्राइम डिपार्टमेंटमध्ये काम करायचे आहे. त्यामुळे मी बी.ए.नंतर नेमके काय करू?
– भागवत वाघ
तुला क्राइम डिपार्टमेंट म्हणजे गुन्हेगारांना पकडणाऱ्या विभागात काम करायचे आहे, असे तुझ्या प्रश्नावरून वाटते. त्यामुळे तू पोलीस विभागात जाणे श्रेयस्कर ठरेल. त्यासाठी तुला चार मार्ग आहेत.
(१) थेट पोलीस भरती. ही भरती पोलीस विभागामार्फत केली जाते.
(२) पोलीस उपनिरीक्षक- या भरतीसाठी राज्य लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेतली जाते.
(३) पोलीस उपअधीक्षक- या पदासाठी राज्य सेवा लोकसेवा आयोगाची सामाईक परीक्षा द्यावी लागेल. राजपत्रित अधिकारी पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेच्या अंतर्गत मुख्य परीक्षा आणि मुलाखत यावर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. पोलीस उपअधीक्षक पदांची उपलब्धता, गुणवत्ता यादीतील क्रमांक आणि उमेदवारांनी दर्शवलेला सेवेचा पसंतीक्रम या बाबींचा विचार करून अंतिम निवड केली जाते.
(४) संघ लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवा परीक्षेद्वारे भारतीय पोलीस सेवेसाठी निवड होऊ शकते. या चार प्रकारे गुन्हेगारांना पकडणाऱ्या पोलीस यंत्रणेत वेगवेगळ्या दर्जाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळू शकते.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)