*  माझ्या भावाला विज्ञान विषयात प्रचंड रस आहे. तो लहानपणापासून त्यातच रमलेला असतो. त्याच्यासाठी आम्ही घरीच एक प्रयोगशाळा उभारली आहे. तो सध्या नववीत आहे. त्याला त्याची आवड जपता येईल आणि अधिक वाढवता येईल, अशा कोणत्या संधी आहेत?  संशोधन कार्य करणाऱ्या कोणत्या संस्था आहेत? त्यासाठी त्याने काय तयारी करायला हवी? दहावीनंतर त्याने नेमके काय करायला हवे?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

– गार्गी पाटील

गार्गी, संशोधनात इतका आकंठ बुडालेला विद्यार्थी मिळणे विरळाच! त्यामुळे तुझ्या भावाचे आणि त्याला अशी प्रयोगशाळा उभारून देणाऱ्या तुझ्या आई-बाबांचे विशेष अभिनंदन. सध्या भारत सरकारने संशोधन अभ्यासक्रमास खूप महत्त्व दिले आहे. त्यासाठी इंडियन इन्स्टिटय़ूट सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) या संस्थेची स्थापना केली आहे. त्या ठिकाणी संशोधन कार्यास वाव आणि चालना देणारे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत.  शिवाय अत्याधुनिक सोयी व उपकरणांनी युक्त अशा प्रयोगशाळाही उभारल्या आहेत. या संस्थेत बीएस-एमएस हा पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी JEE-ADVANCED परीक्षा किंवा किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना परीक्षेतील गुणांवर आधारित थेट प्रवेश दिला जातो. अथवा विद्यार्थ्यांला आयसर टेस्ट द्यावी लागते. नॅशनल इलिजिबिलिटी स्क्रीनिंग टेस्टद्वारे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च भुवनेश्वर आणि डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटोमिक एनर्जी (सेंटर ऑफ एक्सलन्सेस इन बेसिक सायन्सेस) आणि मुंबई विद्यापीठाने सुरू केलेल्या इंटिग्रेटेड एम.एस्सी अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेत JEE  – ADVANCED  मधील गुणांवर आधारित बी.एस्सी अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. त्यासाठीचा कालावधी ४ वर्षांचा आहे. या सर्व ठिकाणी संशोधन कार्यास उत्तेजन दिले जाते. तुझ्या भावाने सध्या १२वी विज्ञान शाखेतील विषयांचा पाया पक्का करून मग या संस्थांमध्ये प्रवेश मिळवावा असे वाटते.

पुढे पदव्युत्तर पदवीनंतर देशातील महत्त्वाच्या संस्थांमध्ये त्याला संशोधक म्हणून कार्य करण्याची संधी मिळू शकते. त्याला आणखी प्रगत संशोधनाच्या संधीही मिळू शकतात. आयआयटी, आयसर, राष्ट्रीय प्रयोगशाळा, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स आदी संस्थांमध्ये पीएच.डी. वा पोस्ट डॉक्टरल संशोधन अशा संधी मिळू शकतात. संशोधन अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना चांगले विद्यावेतनही दिले जाते. तुझ्या भावास परदेशातही संशोधन अभ्यासक्रम करण्याची संधी मिळू शकते.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com  या पत्त्यावर पाठवा.