*  माझा मुलगा मार्च २०१७मध्ये १२वीची परीक्षा देणार आहे. त्याला बॅचलर ऑफ डिझाइन या विषयात आवड आहे. त्याला या विषयातील अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळे महाविद्यालय आणि विद्यापीठांची प्रवेश परीक्षा द्यायची आहे. डिझाइन क्षेत्रातील विविध शाखा आणि  संधींची माहिती द्याल का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

– रवी रानडे

डिझाइन क्षेत्रात इंटिरिअर डिझाइन, टॉय डिझाइन, प्रॉडक्ट डिझाइन, अ‍ॅनिमेशन अँड व्हिडीओ डिझाइन, एक्झिबिशन डिझाइन, फíनचर डिझाइन अशा विविध शाखा आहेत. डिझाइन या विषयाला सध्या खूप संधी आहे. पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांस ज्या विषयात गती आणि आवड निर्माण होईल त्यामध्ये स्पेशलायझेशन करणे उचित ठरेल. संबंधित विद्यार्थी डिझाइनचे ज्ञान प्रत्यक्षात कसे वापरू शकतो, यावर त्याच्या करिअरचे यश अवलंबून राहील, ही बाब लक्षात ठेवावी.

*   विधी क्षेत्र हे करिअरसाठी उत्तम आहे का?

–  गौरव जाजू

गौरव, सध्या आपल्याकडे अनंत प्रश्न, समस्या, वादविवाद, तंटे-बखेडे निर्माण होत आहेत. त्याची संख्या कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. उलट ही संख्या वाढतच जाणारी आहे. या वादविवादांची सोडवणूक करण्यासाठी न्यायालयाकडे धाव घेण्याच्या संख्येतही याच प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे चांगले, अभ्यासू आणि योग्य प्रकारे  सल्ला देऊ शकणारे वकील या क्षेत्रात उत्तम करिअर घडवू शकतात.

*  मी, बीएस्सी पदवीधर आहे. आता सध्या एमपीएससीची तयारी करत आहे. मला महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचे अर्थशास्त्र या विषयावरील इंग्रजी पुस्तकांची नावे सांगाल का?

– विवेक धानोरे

विवेक, एमपीएससीची परीक्षा मराठीतून देता येते, याची तुला माहिती असेलच. त्यामुळे विविध विषयांच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी तू मराठीतूनच अभ्यासाचे साहित्य वाचावे, असे मला वाटते. अभ्यासाची तयारी करताना एमपीएससीने तयार केलेला त्या त्या विषयाचा अभ्यासक्रम काळजीपूर्वक नजरेखालून घालणे आवश्यक आहे. त्यामुळे तू राज्य शिक्षण बोर्डाच्या १२वी पर्यंतची इंग्रजीमधील भूगोल,

अर्थशास्त्र या विषयाची पुस्तके अभ्यासावीत. विद्यापीठाने बी.ए आणि एम.एम.पदवी अभ्याक्रमांच्या तयारीसाठी जी इंग्रजी पुस्तके सुचवलेली असतील त्याचेही वाचन करावे. या पुस्तकांमध्ये संदर्भग्रंथांची सूचीही दिलेली असते. वेळ मिळाल्यास त्यांचेही अध्ययन करावे. तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न

career.vruttant@expressindia.com  या पत्त्यावर पाठवा.