मी इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षांला आहे. मला जर्मनीमध्ये एम.एस. करायचे आहे. पण जर्मनीतील दोन वर्षांच्या वास्तव्याचा खर्च मला परवडणारा नाही. एम.एस.चा किमान खर्च दरमहा ५ ते ६ लाख रुपये आहे. इतर खर्च धरून २० लाख रुपयांपर्यंत तो पोहोचतो. मी शैक्षणिक कर्जाबाबत चौकशी केली आहे. पण माझ्या वडिलांचा बेसिक पगार दरमहा २० हजार रुपये इतकाच आहे. त्यामुळे मला मोठय़ा रकमेचे शैक्षणिक कर्ज मिळणार नाही. मी काय करावे? एखाद्या शिष्यवृत्तीबद्दल माहिती द्यावी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रसाद मंद्रूपकर

इतर कोणत्याही देशांपेक्षा जर्मनीमधील उच्चशिक्षण हे महागडे नाही. त्यातही शासनाच्या साहाय्याने चालवण्यात येणाऱ्या शिक्षण संस्था आणि विद्यापीठांमध्ये तर खर्च अल्प आहे. खासगी संस्थांमध्ये मात्र अधिक खर्च लागू शकतो. तथापि तू मिळवलेल्या माहितीपेक्षा कमी खर्चातही तुझे शिक्षण होईल. शिवाय तेथे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या रूपाने आर्थिक साहाय्यसुद्धा केले जाते. संपर्क ँ३३स्र्://६६६.२३४८्रिल्लॠ-्रल्ल-ॠी१ेंल्ल८.१ॠ. तुला जितके शक्य असेल तितके शैक्षणिक कर्ज घेऊन तू जर्मनीला जाऊ शकतोस. तुला जर्मनीच्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळाला असेल आणि तू राखीव संवर्गात येत असशील तर भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फतही तुला शिष्यवृत्ती मिळू शकते. संपर्क  http://socialjustice.nic.in/SchemeList

मी सध्या मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्गाला आहे. मला उपजिल्हाधिकारी बनावयाचे आहे. परंतु मला सध्या एमपीएससीच्या अभ्यासासाठी वेळ मिळत नाही. मी काय करू?

मयूर गायकवाड

मयूर, सध्या तुझ्या मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या अभ्यासावरच अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कारण बी.ई.ची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यास तुला तुझ्या महाविद्यालयातील प्लेसमेंट सेलच्या साहाय्याने चांगली नोकरी मिळू शकते. त्यामुळे तुझा प्लॅन बी तयार राहील. मग तू निश्चिंत मनाने एमपीएससीची तयारी करू शकशील. सध्या दोन्ही बाबींचा अभ्यास करण्याने एकालाही नीट न्याय देता येणार नाही. त्याचा परिणाम दोन्हीच्या यशावर होऊ  शकतो. तशी शक्यता अधिक आहे. तथापि तुला तुझ्या क्षमतेवर संपूर्ण विश्वास असेल आणि प्लॅन बीची गरज वाटत नसेल तर आत्तापासूनही तयारी करायला हरकत नाही.

करिअरसंबंधीचे प्रश्न पाठवा career.vruttant@expressindia.com