या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. सध्या मी प्रथम वर्षांला शिकत आहे. मी आता यूपीएससीची तयारी करतो आहे. मुक्त विद्यापीठातील पदवीमुळे यूपीएससी किंवा एमपीएससीच्या मुलाखतीमध्ये काही समस्या येईल का?

अविनाश जाधव

अविनाश, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा दर्जा हा कोणत्याही अधिकृत विद्यापीठाच्या समकक्ष आहे. त्यामुळे तू काळजी करण्याचे कारण नाही. तुला कोणत्याही प्रकारच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही. राहता राहिली मुलाखतीची गोष्ट. त्याची तयारी करण्यासाठी तू यूपीएससी, एमपीएससीविषयीची पुस्तके वाचू शकतोस. करिअर वृत्तांतमधील स्तंभातूनही तुला याबद्दल माहिती मिळू शकते.

मी ३१ वर्षांचा आहे. भारतीय रेल्वेमध्ये मी कनिष्ठस्तरीय पदावर काम करत आहे. मी बी.कॉम केले आहे. मला आता एमपीएससी द्यायची आहे. त्यासाठी उत्कृष्ट पुस्तकांची नावे सुचवा. तसेच अभ्यासासाठी दृक्श्राव्य साहित्य कुठे मिळेल?

राकेश गणवीर

राकेश, तुमची जिद्द कौतुकास्पद आहे. ही जिद्द अशीच कायम ठेवा. तुम्ही एमपीएससीच्या अभ्यासक्रमामधील विषयानुसार १०वी, १२वी आणि पदवीपर्यंतची मूळ पुस्तके वाचावीत. कोणत्याही खासगी शिकवणी वर्गाची पुस्तके वा नोट्स एमपीएससी परीक्षेत यश मिळवून देण्याची हमी देत नाही.

तसेच या पुस्तकातील माहिती, दर्जा आणि गुणवत्तेबाबत खात्रीही देता येत नाही. त्यामुळे यातील कोणती पुस्तके निवडावीत, हे तुम्हीच ठरवा. दुकानांमध्ये या विषयावर अनेक लेखकांची पुस्तके उपलब्ध आहेत. त्याचा लाभ घ्यावा.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)