मी बारावी उत्तीर्ण आहे. मला बांधकाम पर्यवेक्षक होण्यासाठी काय करावे लागेल? कोणत्या क्षेत्रात जावे लागेल?

रोहन कोठावळे

राज्य शासनाच्या व्होकेशनल एज्युकेशन बोर्डाने बिल्डिंग साइट सुपरवायझर, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन सुपरवायझर, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, बेसिक सिव्हिल इंजिनीअरिंग, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर, कन्स्ट्रक्शन सव्‍‌र्हेइंग, हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम केल्यानंतर तुम्हाला अपेक्षित संधी मिळू शकते. रुस्तमजी अकॅडमी फॉर ग्लोबल करिअर या संस्थेने अंशकालीन स्वरूपाचा कन्स्ट्रक्शन साइट सुपरवायझर हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.

संपर्क – रुस्तम इराणी मार्ग, रुस्तमजी एकर्स, दहिसर पश्चिम, मुंबई-४०००६८,

दूरध्वनी- ०२२-६५२८०२११,

संकेतस्थळ-  http://www.ragc.in/

ईमेल- info@website.com

माझे बी.कॉम. झाले आहे. पण मला आता डी.फार्म. करायचे आहे. त्यासाठी बारावी विज्ञान अशी अर्हता आहे. तर आता मी काय करू?

सचिन झाडे

स्पष्टच सांगायचे झाल्यास बी.कॉम. झाल्यावर उलटा प्रवास करण्यात काही हशील आहे, असे वाटत नाही. त्यामुळे वेळ व पैसा दोन्ही वाया जातील. औषधीनिर्माण शास्त्रामध्येच करिअर करण्याची इच्छा असेल तर मग या क्षेत्रात करिअर करू इच्छित असशील तर तू आता एमबीए इन फार्मास्युटिकल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम करणे अधिक सयुक्तिक ठरेल. हा अभ्यासक्रम दोन वर्षे कालावधीचा आहे. हा अभ्यासक्रम देणाऱ्या काही संस्था-

१)     नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स, स्कूल ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट, मुंबई. तू बी.कॉम. असल्याने तुला अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी घेणे आवश्यक आहे.

२)     इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मास्युटिकल मार्केटिंग – मास्टर्स डिप्लोमा इन बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन फार्मास्युटिकल मार्केटिंग, अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. संपर्क- http://www.iipm.co.in

३)     डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी- एमबीए इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री मॅनेजमेंट, अर्हता-कोणत्याही विषयातील पदवी. संपर्क- http://www.dypatil.edu/schools/management/mba-in-pharmaceutical-industry-management

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)

Story img Loader