या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माझे बी.ए. झाले आहे. एमएसडब्ल्यू केल्यानंतर करिअरच्या संधी मिळतील का?

अक्षय भगत

अक्षय, तुला एमएसडब्ल्यू केल्यावर नक्कीच चांगल्या करिअर संधी मिळू शकतात. मात्र हा विषय तू स्वत:च्या मनाने घेत आहेस की मित्रमंडळी सांगतात म्हणून घेत आहेस हे स्पष्ट झाले पाहिजे. शिवाय एमएसडब्ल्यूची पदवी मिळाल्याबरोबरच लगेच पुढच्या क्षणाला नोकरी दारात हजर होईल असे संभवत नाही. हा अभ्यासक्रम एखाद्या चांगल्या, नामवंत आणि दर्जेदार संस्थेमधून केल्यास अशा संधी लवकर मिळतात. विविध सामाजिक क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या एनजीओ, संघटना, संस्था, कॉर्पोरेट्समधील कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी विभाग, शासनाचा समाज सामाजिक न्याय विभाग यामध्येही करिअर संधी आहेत.

मी बी.एस्सी.च्या दुसऱ्या वर्षांला आहे. मला तिसऱ्या वर्षांसाठी वनस्पतीशास्त्र किंवा प्राणीशास्त्र यापैकी एक विषय घ्यायचा आहे. हे विषय घेतल्यानंतर मला करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध होतील?

प्रफुल्ल माने

प्रफुल्ल, साधारणत: बी.एस्सी. केल्यावर लगेच चांगली संधी मिळण्याची शक्यता नसते. तुला प्राणीशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र या विषयातच पुढे करिअर करायचे असल्यास या दोनपैकी कोणत्याही एका विषयात पदव्युत्तर पदवी घ्यावीस. त्यानंतर पीएचडी करावी. त्यामुळे उच्चश्रेणीच्या विविध संधी मिळू शकतील. बी.एस्सी. या शैक्षणिक अर्हतेवर तू केंद्र आणि राज्य शासनाच्या नोकऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेस बसू शकतोस.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)