मी बीएच्या दुसऱ्या वर्षांला आहे. मला नेट आणि सेट परीक्षेविषयी माहिती मिळेल का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मच्छिंद्र मुथे

नेट म्हणजे नॅशनल इलिजिबिटी टेस्ट आणि सेट म्हणेज स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट. या दोन्ही परीक्षा अध्यापन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतात. ही परीक्षा उत्तीर्ण होणारे विद्यार्थी सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्र ठरू शकतात. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांने संबंधित विषयाचे ज्ञान कशारीतीने ग्रहण केले आहे. याची चाचणी घेतली जाते. त्यामुळे या दोन्ही परीक्षांसाठी विद्यापीठीय परीक्षांपेक्षा अधिक

सखोल व परिपूर्ण तयारी करणे आवश्यक ठरते. संबंधित विषयासाठी विद्यापीठांनी सुचवलेली पुस्तके व संदर्भग्रंथ संपूर्णरीत्या वाचायला हवेत.

विद्यापीठ अनुदान आयोगासाठी नेट परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाते.

तर सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेतली जाते. या विद्यापीठास या परीक्षेसाठी राज्याची संस्था (एजन्सी) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

मी राज्य बोर्डाची १०वी परीक्षा देत आहे. मला एव्हिएशन किंवा एरोस्पेस इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. १० वीनंतर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश मिळेल काय?

मंदार राणे

बीएस्सी एव्हिएशन किंवा बी.ई/बी.टेक एरोस्पेस इंजिनीअरिंग या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १२वीची परीक्षा भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे तू आधी विज्ञान शाखेतून १२वी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतरच या करिअरकडे तुला वळता येईल. तूर्तास तू दहावीच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर.

मी आता बी.कॉमच्या शेवटच्या वर्षांला आहे. माझे अकाउंट आणि कॉस्टिंग हे विषय आहेत. हे विषय मला आवडतात. त्यात मला रस आहे. भविष्यात व्यवसाय करण्याच्या दृष्टीने सीए आणि आयसीडब्ल्यूए हे अभ्यासक्रम सोडून कोणते अभ्यासक्रम कोणत्या संस्थेतून करावेत? याव्यतिरिक्त काही हटके अभ्यासक्रम असल्यास तेही सुचवावे.

नेहा गोडसे

तुम्ही बी.कॉमनंतर इंटिग्रेटेड कंपनी सेक्रेटरीशिप हा अभ्यासक्रम करू शकता. हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम केल्यावर उत्तमोत्तम करिअर संधी मिळू शकते. हा अभ्यासक्रम द इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरी या संस्थेने सुरू केला आहे. चाळणी परीक्षेद्वारे या अभ्यासक्रमास प्रवेश दिला जातो. संपर्क- http://www.icsi.edu/

बॉम्बे स्टॉक एक्सेंजने पदव्युत्तर पदविका, पदविका, प्रमाणपत्र असे विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यामध्ये मास्टर्स इन फायनान्शिअल टेक्नॉलॉजी, मास्टर्स इन ग्लोबल फायनान्शिअल मार्केट, मास्टर ऑफ अप्लाइड फायनान्स, पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन बँकिंग अँड फायनान्स, सर्टिफिकेट प्रोग्रॅम ऑन कॅपिटल मार्केट यांचा ठळकरीत्या उल्लेख करता येईल. हे अभ्यासक्रम वित्तीय व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

संपर्क- http://www.bsebti.com

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.