मी गणित विषयात उच्च पदवी घेतलेली आहे. मला अध्यापन सोडून इतर काय संधी आहेत ते सांगू शकाल का?

नितीन खाकाळ

तुमच्या गणितीय ज्ञानकौशल्याच्या बळावर अकाऊंटंट, स्टॅटिशिएन, ट्रेझरी मॅनेजमेंट स्पेश्ॉलिस्ट, डेमोग्राफर, क्वांटिटेटिव्ह डेव्हलपर, स्टॅटिस्टिकल प्रोग्रॅमिंग, क्वांटिटेटिव्ह रिस्क अ‍ॅनालिस्ट, इक्विटी क्वांटिटेटिव्ह अ‍ॅनालिस्ट अशा संधी मिळू शकते. एचडीएफसी, आयसीआयसीआय अशा खासगी बँका, विमा कंपन्या, ओरॅकल, मायक्रोसॉफ्ट, गुगल, इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा आदीसारख्या सॉफ्टवेअर कंपन्यांत अशा संधी आहेत. तसेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, नॅशनल अ‍ॅरोनाटिक्स लिमिटेड, इलेक्ट्रॉनिक ट्रान्झक्श्ॉन अँड सिक्युरिटी, मुंबईस्थित टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट, चेन्नईस्थित द इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्स, अलाहाबादस्थित हरिश्चंद्र रिसर्च  इन्स्टिटय़ूट डिपार्टमेंट ऑफ ऑटोमिक रिसर्च, आयबीएम या संस्थांमध्ये चांगल्या गणितज्ज्ञांना संधी मिळू शकतात. सार्वजनिक बँकांमधील प्रोबेशनरी ऑफिसर आणि स्पेश्ॉलिस्ट ऑफिसर पदांसाठीच्या परीक्षांध्ये गणित विषयावर प्रभुत्व असणाऱ्या उमेदवारांना चांगले यश मिळू शकते. चांगल्या संस्थांमध्ये (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, एस.पी.जैन, एक्सएलआरआय, जमनालाल बजाज मॅनेजमेंट अँड रिसर्च इत्यादी) या संस्थांमधील एमबीए प्रवेशासाठीच्या परीक्षांमध्ये गणितावर प्रभुत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम संधी राहू शकते. या संस्थांमधील एमबीए फायनान्स हा अभ्यासक्रम चांगले करिअर घडवू शकतो. इंडियन इकॉनॉमिक सव्‍‌र्हिस/इंडियन स्टॅटिस्टिकल सव्‍‌र्हिस या परीक्षा देऊन भारत सरकारच्या वित्त विभागात उच्च श्रेणीचे पद मिळवणे शक्य आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधून मी अर्थशास्त्र या विषयात पदवी मिळवलेली आहे. मला कोणत्या क्षेत्रात नोकरीच्या संधी आहेत?

अजय तायडे

अर्थशास्त्र या विषयातील पदवी या अर्हतेवर थेट उत्तम संधी मिळणे सहज शक्य नाही. तथापी तू सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा (सार्वजनिक बँकांच्या प्रोबेशनरी ऑफिसर्स/ लिपिक संवर्ग, राज्य लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित अधिकारी/ विक्रीकर निरीक्षक/ मंत्रालयीन साहाय्यक/ पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी होणाऱ्या परीक्षा, संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा, स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा) देऊ  शकतोस.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.

Story img Loader